विशेष विद्यार्थिनीच्या हस्ते जिद्दी प्राध्यापकाचा काव्यसंग्रह प्रकाशित
ठाणे/प्रतिनिधी गेल्या दहा महिन्यांपासून मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलेसिसवर असलेले अंबरनाथ येथील प्रा. उदय क्षीरसागर यांच्या ‘सहज सुचले म्हणून’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अलीकडेच शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात ठाण्यातील जिद्द शाळेची राष्ट्रपती पारितोषिक विजेती माजी विद्यार्थिनी मनाली कुलकर्णी हिच्या हस्ते झाले.
ठाणे / प्रतिनिधी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयकर विभागातील माया चव्हाण या महिला अधिकारीस सीबीआयच्या मुंबई पथकाने दीड लाखांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी पकडले आहे.
‘ब्रह्मकमळ’ पुस्तकाचे प्रकाशन शैलजा नामजोशी यांच्या ‘ब्रह्मकमळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मोडक सभागृहात अलीकडेच पार पडले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पुष्पा लिमये उपस्थित होत्या.
कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक नेतेही अंधारात? कल्याण/ भगवान मंडलिक - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२ येत्या सहा महिन्यांत कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महापौरांची अडीच वर्षांची मुदत संपत असल्याने या पदावर दावा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक नेत्यांना अंधारात ठेवून वरिष्ठ पातळीवर मोठय़ा हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते. ठाणे पालिकेत शिवसेनेने निवडणुकीनंतर मनसेला दिलेला धोबीपछाड विचारात घेऊन, तसेच जिल्ह्य़ातील शिवसेनेचे अस्तित्व खिळखिळे करण्याचा विडा उचललेल्या जिल्ह्य़ातील काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचाही मनसेच्या या सुप्त हालचालींमध्ये तुरळक सहभाग असल्याचे बोलले जात आहे.
ठाणे / प्रतिनिधी धर्मवीरनगर तसेच तुळशीधाम येथील मालमत्ता करापोटी जप्त करण्यात आलेल्या गाळेधारकांनी मालमत्ता कराची थकबाकी भरण्यास तयारी दर्शविली असून ठाणे महापालिका प्रशासनाने त्यांना त्यांचे गाळे परत देण्याविषयी प्रस्ताव तयार केला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला आहे.