ठाणे / प्रतिनिधी कारची खोटी कागदपत्रे तयार करून त्याची परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून नौपाडा पोलिसांनी सुनील अमृते यांच्याविरोधात सुमारे दहा वर्षांपूर्वी गुन्हा दाखल केला होता.
आयटी पार्कच्या प्रस्तावाला वेग कल्याण/ प्रतिनिधी मुंबई, नवी मुंबई शहरांचा झपाटय़ाने विकास होत असताना कल्याण-डोंबिवलतील माहिती तंत्रज्ञानाचे नवे केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून नव्याने उपलब्ध होत नसलेल्या आरक्षित जमिनींचा विचार करता कल्याणमध्ये उपलब्ध असलेल्या १२०० एकर हरित पट्टय़ातील जमिनीपैकी सुमारे १५० एकर जमिनीवर भव्य माहिती आणि तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव शासन दप्तरी वेगाने हालचाली करीत असल्याने कल्याणकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कल्याण/प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून कचरा वाहतुकीच्या नावाने सावळा गोंधळ असल्याने नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
गुणवंतांचा सत्कार डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे रविवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रघुवीरनगरमधील रोटरी सेवा केंद्राच्या सभागृहात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या वक्तींना ‘व्यावसायिक गुणवत्ता श्रेष्ठता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.