प्रतिनिधी - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ चाकण येथे विमानतळ करण्यासाठी पाच ते सात टक्के जागेचे अधिग्रहण शिल्लक राहिले असून, लवकरच हे काम सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. पुण्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असेही ते म्हणाले. |
आगीबाबत आयुक्तांना संशय प्रतिनिधी साखर आयुक्त विजय सिंघल यांची शिवाजीनगर येथील मोटार पहाटेच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत आढळून आली. याबाबत पोलिसांनी ही मोटार शॉटसर्कीटमुळे जळाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, साखरआयुक्त सिंघल यांनी ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचे दिसत नसल्याचे म्हणत याबाबत संशय व्यक्त केला आहे. |
प्रतिनिधी महापालिकेच्या विविध खात्यांमधील कामे कंत्राटी स्वरूपात करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांच्या दिवाळी बोनसची रक्कम संबंधित ठेकेदार गायब करत असल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यंदाही कंत्राटी कामगारांना अद्याप बोनस देण्यात आलेला नसून त्यांना ही रक्कम दिवाळीपूर्वी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. |
पिंपरीतून मूल चोरणाऱ्या महिलेचा खुलासा िपपरी / प्रतिनिधी मूल होत नसल्याने मी बाळ पळवल्याची कबुली देणाऱ्या ‘त्या’ आरोपी महिलेने शुक्रवारी आणखी धक्कादायक खुलासा केला. मूल पळवण्याच्या यापूर्वी झालेल्या घटना, त्याच्या पेपरला आलेल्या बातम्या व टीव्हीवरून होणाऱ्या प्रसारणाची चर्चा मी ऐकली होती. |
प्रतिनिधी ‘‘बारावी पंचवार्षिक योजना ही आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणारी असून कुपोषण, महिलांचे प्रश्न, बालकांच्या आरोग्याचे प्रश्न या मुद्दय़ांवर भर देण्यात आला आहे. या पंचवार्षिक योजनेनुसार राष्ट्रीय सकल उत्पन्नापैकी २.५ टक्के उत्पन्न हे आरोग्य क्षेत्रावर खर्च करण्यात येणार आहे,’’ असे नियोजन आयोगाच्या सदस्य डॉ. सय्यदा हमीद यांनी शुक्रवारी सांगितले. |
सकाळी नऊ ते एक दरम्यान सर्वाधिक घटना प्रतिनिधी शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीच्या घटना दुपटीने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान २४७ घटना घडल्या होत्या. यंदा याच कालावधीत तब्बल ४११ घटना घडल्या असून साखळीचोरांनी ज्येष्ठ महिलांनाच टार्गेट केले असून सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना या सकाळी नऊ ते दुपारी एक दरम्यान घडल्याचे दिसून आले आहे. |
प्रतिनिधी बिबवेवाडी परिसरात भरदुपारी केबल व्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी सातजणांस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ९ जून २०१० रोजी अप्पर इंदिरानगर येथे ही घटना घडली होती. |
दीड तास वाहतूक ठप्प प्रतिनिधी कात्रजच्या नव्या बोगद्यामध्ये एका ट्रकला आग लागण्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. आग विझवून ट्रक बोगद्याच्या बाहेर काढण्यात आल्यानंतर संध्याकाळी वाहतूक सुरळीत झाली. |
पथारीवाल्यांची बाजू प्रतिनिधी ‘‘फुटपाथ आणि वॉकिंग प्लाझामध्ये पथाऱ्या पसरल्याने वाहतूक व्यवस्थापनात जे प्रश्न निर्माण होतात, त्याबाबत सहकार्यास आम्ही तयार आहोत. महापालिकेने आम्हाला व्यवसायासाठी पर्यायी जागा द्यावी, त्याचे भाडे भरण्यास आम्ही तयार आहोत. पण आमच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेऊ नका!’’ अशी प्रतिक्रिया पथारी व्यावसायिक पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केली. |
प्रतिनिधी बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध कंपन्यांची मोबाईलची सीमकार्ड विकणाऱ्या एका विक्रेत्याला दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. न्यायालयाने या आरोपीला १४ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. |
प्रतिनिधी बिबवेवाडी येथे एका शिक्षण संस्थेच्या शाळेमधील मुख्याध्यापिकेने शाळेच्याच आवारात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने शाळेत एकच खळबळ उडाली असून, मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असली, तरी संबंधित मुख्याध्यापिकेने अद्याप याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही. |
प्रतिनिधी राज्यातील सर्व अध्यापक महाविद्यालयांची डिसेंबरअखेपर्यंत पाहणी करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी करण्यात येणार आहे. |
सणस मैदान यापुढे फक्त अॅथलेटिक्ससाठीच देणार प्रतिनिधी महापालिकेचे सणस मैदान यापुढे फक्त अॅथलेटिक्सचा सराव व त्याच क्रीडा प्रकारातील स्पर्धासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय क्रीडा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. विविध प्रशिक्षण शिबिरांसह इतर अनेक कार्यक्रमांसाठी हे मैदान उपलब्ध करून दिले जात होते. यापुढे मात्र मैदान फक्त अॅथलेटिक्ससाठीच दिले जाईल. |
बाळासाहेब जवळकर आर्थिक वर्षांत करावयाच्या विकासकामांचा अंदाज घेऊन त्यासाठी अपेक्षित खर्चाची तजवीज अंदाजपत्रकात केलेली असताना नियोजित कामांच्या त्या पैशांची वर्गीकरणाच्या नावाखाली थेट ‘पळवापळवी’ करण्याचा उद्योग िपपरी महापालिकेत बिनबोभाट सुरू आहे. |
प्रतिनिधी रक्तपेढय़ांच्या राष्ट्रीय संघटनेकडून (आयएसबीटीआय) प्रस्तावित असलेल्या रक्तपिशव्यांच्या दरवाढीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने विरोध दर्शविला आहे. या दरवाढीला राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेची मंजुरी मिळालेली नसतानाही काही पेढय़ांनी रक्तपिशवीचा दर ८५० रुपयांवरून १३५० रुपयांवर नेला आहे, ही बाब बेकायदेशीर आहे, असा आरोप ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश टाकळकर यांना पत्रकार परिषदेत केला. |
प्रतिनिधी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना धमकावल्याच्या प्रकरणात ‘संबंधितांवर तुम्ही काय कारवाई केली याचे प्रतिज्ञापत्र सादर करा’, असा आदेश उच्च न्यायालयाने आयुक्तांना दिला आहे. या आदेशाबाबत तसेच निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या कारवाईच्या आदेशाबाबत आता आयुक्तांनी ठोस कृती केली नाही, तर आयुक्तांच्या विरोधातच आंदोलन करावे लागेल, |
पिंपरी / प्रतिनिधी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून नवजात बालक पळवण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी सकाळीच रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेची माहिती घेत सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले. दुपारी स्थायी समितीच्या बैठकीत याच विषयावरून प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले. |
प्रतिनिधी ‘‘स्वातंत्र्य आणि सुधारणा हा वाद स्वातंत्र्यपूर्व काळात चर्चेत होता. आज देशाला समाज सुधारणेची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आवश्यकता देशभक्तीची भावना रूजविण्याची आहे. जाती, धर्म, भाषा, भौगोलिक प्रांत या भूमिका हल्ली इतक्या प्रकर्षांने मांडल्या जातात की यातून सवड मिळाली तर आपण आपल्या देशाचे असतो, ’’ असे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले. |
प्रवासात कोठेही गाडी थांबवून तपासणी करण्याची योजना प्रतिनिधी अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुणे- लोणावळा लोकलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तिकीट तपासणीस गायब झाले असून, तिकिटांची तपासणीच होत नसल्याने लोकलमध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी रेल्वेच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसत आहे. |
प्रतिनिधी लोकमान्य टिळक प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी (९ नोव्हेंबर) अनाथ व गरजू मुलांसाठी शनिवार वाडा पटांगणात ‘दीपावली आनंद मेळाव्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्याच वेळी मंत्रालयाच्या आगीच्या वेळी जीव धोक्यात घालून भारतीय ध्वज काढणारे कर्मचारी आणि एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकांचाही या वेळी सत्कार करण्यात येणार आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 1 of 18 |