आमदार निम्हण यांचा दावा पिंपरी / प्रतिनिधी बाणेर येथील जमिनीसंदर्भात काही नागरिकांनी खोटय़ा तक्रारी करून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा आमदार विनायक निम्हण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांचे चिरंजीव नगरसेवक सनी निम्हण उपस्थित होते. |
‘देणं समाजाचं’ कृतज्ञता सोहळा चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पुणे शाखेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ‘देणं समाजाचं’ या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. |
पुणे/प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा सादर होऊन तो मंजूर करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीकडून, तर आराखडय़ाला सर्वतोपरी विरोध करण्याचे प्रयत्न भाजप, शिवसेना व मनसेकडून सुरू असले, तरी आराखडय़ाबाबत काँग्रेसची भूमिका मात्र अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे आराखडय़ाबाबत पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. |
वादग्रस्त विकास आराखडा पुणे/प्रतिनिधी विमानतळ परिसरातील क्षेत्रामध्ये निवासी बांधकाम करताना पुणे विमानतळ अधिकाऱ्यांमार्फत संरक्षण खात्याची परवानगी आवश्यक असताना विकास नियंत्रण निमयावलीतील ही महत्त्वाची तरतूद रद्द करण्याची उपसूचना विकास आराखडय़ात देण्यात आली आहे. त्यावर देशाच्या संरक्षणाशीच खेळण्याचा हा प्रकार असल्याची हरकत घेण्यात आली असून या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. |
पुणे / प्रतिनिधी नेत्रदानाविषयी जनजागृती होण्यासाठी ‘विराग आर्टिस्ट ट्रस्ट’ आणि प्रा. प्रकाश दळवी यांच्या पथकाद्वारे पुणे जिल्ह्य़ातील बारा तालुक्यांमध्ये ‘नेत्रदान जनजागृती मोहीम’ व चित्रकला स्पर्धा राबविण्यात आली. |
पुणे / प्रतिनिधी आदर्श शिक्षण मंडळाच्या बी.एड. कॉलेजच्या माजी प्राचार्य व लेखिका डॉ. शकुंतला लाटकर (वय ८७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. |
पिंपरी / प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्ष कुसुम भानुदास कांबळे (वय ७२) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. |
प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
थोरल्या साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामतीच्या मोरोपंतनगरी येथे होणाऱ्या आगामी नाटय़संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची माळ अखेर ‘दादां’च्या गळय़ात पडली. ‘दादा’ की ‘ताई’ हा प्रश्न समयसूचकतेने सोडवून नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना संमेलनाच्या काळात दादांना तीन दिवस बारामतीमध्ये गुंतवून ठेवण्यामध्ये यश आले आहे. |
पिंपरी / प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या काही बडय़ा व ‘उद्योगी’ अधिकाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. |
बकर ईदमुळे पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शनिवारी (२७ ऑक्टोबर) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. |
सत्तेच्या मस्तीत राहू नका, मुंबईत बाबा आहेत- बापट प्रतिनिधी सर्वसामान्य पुणेकर नाही, तर बिल्डर हा केंद्रबिंदू ठेवून तयार झालेल्या पुणे शहराच्या विकास आराखडय़ाची मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक चौकशी करावी, अशी मागणी आमदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. बहुमताच्या मस्तीत कोणी राहू नये. |
विकास आराखडय़ाचे कवित्व प्रतिनिधी शहरातील डोंगरमाथा व डोंगरउतारावरील आरक्षणे उठवण्याचा निर्णय तसेच इमारतींची उंची वाढवण्याची परवानगी आणि एफएसआयची लयलूट पाहता शहराच्या विकास आराखडय़ाला घाईगर्दीने मंजुरी दिली जाऊ नये. |
प्रतिनिधी पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखडय़ात अनेक धक्कादायक बदल करण्यात आल्याचा आरोप करून कोणत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असा प्रश्न पुणे जनहित आघाडीने शहर सुधारणा समितीला जाहीरपणे विचारला आहे. |
आळंदी ते पंढरपूरचा ४०० किलोमीटरचा जलप्रवास प्रतिनिधी या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे ‘जलदिंडी’ मोहिमेतर्फे प्रवासातील गावांना जलस्वावलंबनाविषयी प्रबोधन केले जाणार आहे. जलस्वावलंबन हा स्वभाव बनावा यासाठी नदीखोऱ्यांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे, असे मत जलदिंडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वास येवले यांनी व्यक्त केले. |
प्रतिनिधी पुणे शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटपर्यंत निवासी बांधकामासाठी चार एफएसआय उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विकास आराखडय़ात मांडण्यात आला असून त्यापेक्षा कमी एफएसआय वापरता येणार नाही आणि जागा दोन वर्षांपेक्षा अधिक काळ बांधकामाविना रिकामी ठेवता येणार नाही, असेही बंधन घातले जाणार आहे. |
दोन हजार पोलिसांना हेल्मेटचे वाटप प्रतिनिधी दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे सक्तीचे असल्यामुळे प्रथम पोलिसांपासून हेल्मेट सक्तीला सुरूवात करून नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून देत हळूहळू सर्वाना हेल्मेट सक्ती केली जाईल, असे सांगत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी शहरात हेल्मेट सक्तीची पुन्हा अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले. |
पिंपरी / प्रतिनिधी विनोदाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना टेनिस व बुद्धिबळ खेळायला खूप आवडायचे. |
प्रतिनिधी क्षेत्रीय सैन्य भरती कार्यालयातर्फे येत्या २ ते ९ नोव्हेंबर दरम्यान उस्मानाबाद येथील पोलीस परेड मैदानावर खुला भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. |
प्रतिनिधी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचतगटांच्या चळवळीला बळ देण्याची गरज आहे. महाराष्ट्र बचतगटांचे राज्य म्हणून नावारूपाला आले पाहिजे, अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. |
प्रतिनिधी लोहमार्गाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने पुणे- लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दोन लोकल २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत चिंचवड ते पुणे या स्थानकादरम्यान अंशत: रद्द करण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 7 of 18 |