पिंपरी / प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
पाण्याचे राजकारण करू नका, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पुण्यातील अधिवेशनात केले. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी पालिकेनेच पक्षीय राजकारणातूनच आळंदीला पिण्यासाठी पाणी देण्यास स्पष्टपणे नकारघंटा दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कथनी व करणीतील फरक उघडपणे दिसून आला आहे. |
प्रतिनिधी पुणे शहराचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करण्यापूर्वी आराखडय़ाला ज्या उपसूचना नगरसेवकांनी दिल्या आहेत, त्यातील अनेक उपसूचना धक्कादायक असून त्या शहर हिताच्या नाहीत, तर त्या काही हितसंबंधितांचा लाभ करून देणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे. |
प्रतिनिधी ‘तुमच्या दुचाकीच्या चाकाचा नट ढिला झालाय, तुम्ही पडाल. मी मॅकेनिक आहे, गाडी दुरुस्त करून देतो,’ असे सांगत एखादा ‘मेकॅनिक’ जवळ आला तर.. महिलांनो सावधान! कारण हाच मेकॅनिक ‘ट्रायल बघतो’ म्हणून दुचाकी घेऊन पसार होईल. |
प्रतिनिधी चित्रपट, नाटय़, संगीत, साहित्य व कलेचा उत्सव असणाऱ्या पुलोत्सवात दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. ‘पु.ल.स्मृती पुरस्कार’ यंदा अभिनेते परेश रावल यांना, ‘पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांना, तर ‘पुलोत्सव : कृतज्ञता पुरस्कार’ यावर्षी डॉ. अभय बंग व राणी बंग यांना प्रदान करण्यात येणार आहे. |
पुणे / प्रतिनिधी ‘संगणक, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा भारतामध्ये विकास करण्यासाठी जे काम करू शकलो त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या कामाने देशाची जगात नवी ओळख निर्माण झाली. त्याचा मला अभिमान वाटतो,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. |
पुणे/ प्रतिनिधी अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना २७०० कोटी रुपयांच्या प्राप्तिकरातून सवलत मिळावी या मागणीसाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. |
महिलेसह दोघांना अटक प्रतिनिधी मंत्राने सिद्ध केलेली रुद्राक्षाची माळ देऊन मानसिक आजार बरा करण्याचा दावा करून एका तरूणीकडून पैसे घेऊन तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. |
पोलीस हवादलार व पोलीस पथकाचा आयुक्तांकडून सत्कार प्रतिनिधी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराच्या चाणाक्षपणामुळे स. प. महाविद्यालय चौकात रविवारी सकाळी एका हल्ल्याचा कट उधळून तिघांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. |
१५० बचत गटांचा सहभाग पिंपरी / प्रतिनिधी पवनाथडी जत्रेच्या धर्तीवर यशस्विनी सामाजिक अभियान व सुनेत्रा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १२ नोव्हेंबपर्यंत चिंचवडला ‘महाराष्ट्राची जत्रा’ हे राज्यस्तरीय बचत गट व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरणार आहे. |
प्रतिनिधी कोणत्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली, अपघात किंवा मिरवणुकीमुळे कोणता रस्ता बंद आहे, अशी वाहतूकविषयक माहिती देणारी ‘एसएमएस गपशप सेवा’ विजयादशमीपासून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत सध्या सहा हजार ग्राहक सहभागी झाले आहेत. |
९० कोटी रु पये खर्चातून प्रकल्पाची निर्मिती पुणे / प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ९० कोटी रु पये खर्चातून उभारलेल्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २४ ऑक्टोबरला होणार आहे. |
पुणे / प्रतिनिधी गुडलक चौकात लॅपटॉप व मोबाईल चोरीच्या गुन्ह्य़ात दिल्ली येथील तिघांना शनिवारी सायंकाळी डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून या प्रकारचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. |
प्रतिनिधी सांगवी येथील सराफांना गंडा घालून सोने चोरून नेणाऱ्या एका चोरटय़ास मोबाईलच्या लोकेशनवरून माग काढत अहमदाबाद येथे सांगवी पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून आठ लाख ३१ हजार रूपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. |
पिंपरी / प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ‘आयबीएम’ कंपनीतर्फे आयोजित रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २० व २१ ऑक्टोबरला निगडीत झालेल्या या मेळाव्यासाठी देशभरातून ४५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. |
‘लायन्स-विलक्स जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर स्व.दादासाहेब कुदळे जन्मशताब्दी समितीच्या वतीने लायन डॉ.दीपक कुदळे यांच्या हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ‘लायन्स-विलक्स जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘लायन्स-विलक्स सुवर्ण गौरव पुरस्कार’ देऊन विविध क्षेत्रातील ११ व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. |
पुणे / प्रतिनिधी, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२ नवीन वीज मीटर मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला शनिवारी सकाळी हडपसर येथील हांडेवाडी कार्यालयात लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. |
पुणे / प्रतिनिधी ‘फक्त नवी निर्मिती करणे, संशोधन करणे पुरेसे नसून आपले संशोधन प्रचलित करण्याकडेही उद्योजकांनी लक्ष देणे गरजेचे आहे,’ असा मंत्र मेरिको लिमिटेडचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर हर्ष मरिवाला यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या ‘औद्योगिक मान पुरस्कार’ सोहळ्यात शुक्रवारी दिला. |
पुणे / प्रतिनिधी सातारा येथील आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक तरुणांकडून पैसे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन तरुणास अटक केली असून त्यांनी आतापर्यंत सहाजणांस १६ लाखांना फसविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. |
पुणे / प्रतिनिधी निगडी येथील यमुनानगर येथे घरात खेळत असताना चौदा महिन्याची चिमुरडी टबमध्ये पडून तिचा मृत्यू झाला. वाणीकुमारी नितेश कुमार (वय- चौदा महिने, रा. यमुनानगर, निगडी) असे त्या चिमुरडीचे नाव आहे. |
पुणे / प्रतिनिधी समाजात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या युवकांना इंदिरा ग्रुप च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘युथ क्रांती अॅवॉर्ड्स’ ची नुकतीच घोषणा करण्यात आली. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 10 of 18 |