प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्याजवळील बालेवाडी येथे २० व २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले असून राज्यभरातून सहा हजार प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती बुधवारी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. |
चिंचवड येथे २१ ऑक्टोबपर्यंत खुले पिंपरी / प्रतिनिधी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आयटीपीओ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे वाहनांच्या सुटय़ा भागांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून गुरुवारी त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. येत्या २१ ऑक्टोबपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. |
महापालिकेचे ग्राहकांना आवाहन प्रतिनिधी शहरात सदनिका खरेदी करताना ग्राहकांनी फक्त मंजूर ले-आऊट न पाहता संबंधित बांधकामाचे महापालिकेने मंजूर केलेले नकाशेही आवर्जून पाहावेत तसेच मंजूर नकाशांची पूर्ण खात्री करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने केले आहे. |
प्रतिनिधी ‘‘विद्यार्थ्यांना औद्योगिक वातावरणात काम करण्याचा अनुभव मिळावा यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय वाढला पाहिजे,’’ असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. |
‘ज्योतीची निजज्योती’ पुस्तकाचे प्रकाशन विश्वशांती केंद्र (आळंदी) आणि माईर्स एमआयटीच्या वतीने प्रयागअक्का कराड यांच्या जीवनावरील ‘ज्योतीची निजज्योती’ या ओवीबद्ध चरित्रग्रंथाचे मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. |
पुनर्मूल्यांकनातही हस्तक्षेप केल्याचे ठोस पुरावे डमी विद्यार्थी पुरविण्याचे प्रकरण प्रतिनिधी परीक्षेला डमी विद्यार्थी पुरविण्याचे ‘रॅकेट’ चालविणाऱ्यांनी पुणे विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनातही फेरफार केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकरणी परीक्षा विभागातील किमान तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध ठोस पुरावेसुद्धा हाती आले आहेत. |
प्रतिनिधी भारती विद्यापीठ परिसरात एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलेले प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे व इतर चार मराठी कलाकार लिफ्टमध्ये अडकल्याची घटना बुधवारी पावणे तीनच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही मिनिटांमध्ये त्यांना सुखरूप बाहेर काढले. |
प्रतिनिधी थांब्याबर बस येऊन थांबताच प्रवाशांचा लोंढा बसकडे धावतो.. काही चपळ प्रवासी आधीच भरलेल्या बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा पटकावतात.. उरलेले प्रवासी अर्धे शरीर बसच्या बाहेर असलेल्या अवस्थेत पायऱ्यांवर अक्षरश: लटकतात.. एखाद्या सूटकेसमध्ये सामान कोंबावे तसे कोंबून भरलेल्या प्रवाशांचा प्रवास सुरू होतो.. पुण्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर गर्दीच्या वेळी दिसणारे हे चित्र! |
प्रतिनिधी गर्दी असल्याने पीएमपीएल बसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या तरुणाच्या डोक्याला रस्त्याकडेच्या सिग्नलाचा खांब लागल्याने मृत्यू झाला. स्वारगेट येथील व्होल्गा चौकात घडलेल्या या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. |
आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा प्रतिनिधी शहरात पुढील काळात ‘सीएनजी’चा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर महाराष्ट्र नॅचरल गॅस व पंपांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ऑईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सीएनजी पुरवठय़ाविषयीच्या आढावा बैठकीत दिला. रिक्षा पंचायतीच्या वतीने ही माहिती बुधवारी देण्यात आली. |
प्रतिनिधी लष्कराच्या आर्म फोर्सेस मिलिटरी कॉलेजच्या (एएफएमसी) नर्सिग कॉलेजमधून पदवी घेतलेल्या चाळीस विद्यार्थिनींच्या पासिंग आऊट परेडचा कार्यक्रम बुधवारी उत्साहात पार पडला. नर्सिगची पदवी पूर्ण केल्याने चाळीस विद्यार्थिनींना एएफएमसीचे संचालक एअर मार्शल जी. एस. जोनेजा यांनी ‘लेफ्टनंट’ पदवी देऊन सन्मानित केले. |
प्रतिनिधी पु. ल. देशपांडे यांच्या कारकिर्दीचे पैलू उलगडत, कलेच्या विविध क्षेत्रांतील नावीन्याचा वेध घेणाऱ्या ‘पुलोत्सवा’चे यंदा दहावे वर्ष आहे. या वर्षी ४ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग) येथे हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती ‘पु.ना. गाडगीळ अँड सन्स’ आणि ‘आशय सांस्कृतिक’ यांच्या वतीने देण्यात आली. |
प्रतिनिधी पुस्तक प्रकाशक आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे माजी कार्याध्यक्ष विश्वास दास्ताने (वय ६५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई असा परिवार आहे. |
प्रतिनिधी ‘मेक माय ड्रीम फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने निधी संकलनासाठी ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचे गायन व गप्पांच्या ‘स्वरदक्षिणा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीरंग भावे, प्रज्ञा देशपांडे आणि सई टेंभेकर हे तरूण गायकही कार्यक्रमात गाणी सादर करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. |
प्रतिनिधी शिर्डीसाठी वातानुकूलित व्होल्वोची सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने घेण्यात आला असून, शिवाजीनगर-शिर्डी या मार्गावर व्होल्वो गाडीची सेवा गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. |
प्रतिनिधी
‘पिया तू अब तो आजा’ या गीतावर हेलन यांनी अदा सादर करताच टाळ्या-शिट्टय़ांच्या साथीने रसिकदेखील फिदा झाले. ‘मला बोलण्याची भीती वाटते. माझे पायच बोलतात’ ही भावना व्यक्त करीत हेलन यांनी श्रोत्यांनाजिंकले. हेलन याच केंद्रिबदू असलेल्या पुणे नवरात्र महोत्सवाचे विविधरंगी कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मंगळवारी उद्घाटन झाले. पुणे नवरात्र महोत्सवाचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संगीतकार अजय-अतुल, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, लावणी नृत्यांगना रेश्मा मुसळे-परितेकर, नाटय़ अभिनेते चेतन दळवी आणि नाटय़ परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांना लक्ष्मीमाता कला-संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. |
प्रतिनिधी
शनिवार वाडा ते विश्रामबाग वाडा दरम्यानच्या विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव लाभलेल्या वास्तूंची ओळख करून देणाऱ्या ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी समारंभपूर्व करण्यात आले. महापालिका स्तरावर अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. पुण्यातील विविध वास्तूंचा आणि त्यांच्या जडणघडणीचा इतिहास, कलेच्या दृष्टीने या वास्तूंचे महत्त्व, तसेच लष्करीदृष्टय़ा असलेले या वास्तूंचे तत्कालीन महत्त्व, या वास्तूंची स्थापत्यरचना, पुण्याची तत्कालीन संस्कृती, इतिहास यांची ओळख करून देणारा ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम पुणे महापालिकेने सुरू केला आहे. |
* पुनर्मूल्यांकनही ‘मॅनेज’ केल्याचा संशय * आतापर्यंत सोळा विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे उघड * विद्यापीठाकडूनही चौकशी समिती स्थापन प्रतिनिधी डमी विद्यार्थी पुरविणाऱ्यांचे हात लांबच लांब असल्याचे तपासाद्वारे सष्ट झाले असून, हे ‘रॅकेट’ चालविणाऱ्यांनी डमी विद्यार्थी पुरविण्याबरोबरच विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनही ‘मॅनेज’ केल्याची शक्यता आहे. पोलीसही त्या दृष्टीने तपास करत आहेत. दरम्यान, या टोळक्याने सोळा विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. |
पुणे/प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेला होर्डिगच्या परवानगीचा निर्णय होर्डिग व्यावसायिकांचा फायदा करणारा आणि महापालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान करणारा असल्यामुळे या निर्णयाला त्वरित स्थगिती द्यावी तसेच मूळ धोरण मंजूर करावे, अशी मागणी काँग्रेससह शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. |
लोकलच्या वेळांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी प्रतिनिधी पुणे- लोणावळा लोकलच्या बदललेल्या वेळापत्रकावर अनेक प्रवाशांकडून आक्षेप नोंदविण्यात येत असून, गरजेच्या वेळेला लोकल नसल्याने काही प्रवाशांना नाईलाजास्तव वाहतुकीचा इतर पर्याय निवडावा लागत असल्याने लोकलच्या प्रवाशांची संख्या काही प्रमाणात घटल्याचे बोलले जात आहे. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>
|
Page 12 of 18 |