प्रतिनिधी दुसरा पर्याय नसल्यामुळे खासगी कंपनीकडून वीज खरेदी करण्यात आली असल्याचे ऊर्जा मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. टोपे म्हणाले, ''सध्या राज्यातील वीज निर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता कमी झाली आहे. |
प्रतिनिधी तळजाई पठार येथील बेकायदा इमारत कोसळल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी लहू ऊर्फ धिरेंद्र बापू सावंत (वय २९, रा. धनकवडी) यास सहकारनगर पोलिसांनी साताऱ्यातून मंगळवारी अटक केली. या प्रकरणात माजी नगरसेवक संजय नांदे याला पूर्वीच अटक केली आहे. |
पिंपरी / प्रतिनिधी संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आध्यात्मिक गरिबी प्राप्त होते. कोणताही मनुष्य एकाच वेळी देवाची व धनाची चाकरी करू शकत नाही, असे प्रतिपादन पुणे धर्मप्रांताचे बिशप अँड्रय़ू राठोड यांनी केले. |
प्रतिनिधी शाळेत शिकवण्याचे माध्यम इंग्रजी असले, तरी बारावीची शास्त्र शाखेची परीक्षा मराठीतूनही देता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी बारावी शास्त्र शाखेची परीक्षा मराठी माध्यमातून द्यावी, असे आवाहन समर्थ मराठी संस्थेतर्फे करण्यात आले आहे. याबाबत समर्थ भारत संस्थेचे अनिल गोरे यांनी सांगितले, ''शास्त्र शाखेची परीक्षा मराठी माध्यामातून देता येऊ शकते. |
प्रतिनिधी मोरया प्रकाशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त ‘काश्मीर- धुमसते बर्फ’, ‘गोष्टी आपल्या सुख-दु:खाच्या’ आणि ‘कर्म सिद्धांत- सफल जीवनाचा दीपस्तंभ’ अशा तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. केसरीवाडय़ातील लोकमान्य सभागृहात २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. |
लोहगड प्रतिष्ठानच्या वतीने लोकसत्ताच्या ‘ यशस्वी भव’ पुस्तिकेचे मोफत वितरण लोणावळा येथील लोहगड प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा नगर पालिकेच्या पंडित नेहरू विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना लोकसत्ताच्या ‘दहावी अभ्यासक्रम यशस्वी भव’ पुस्तिकेचे मोफत वितरण माजी नगराध्यक्ष अरूण मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. |
पुणे / प्रतिनिधी - रविवार, १४ ऑक्टोबर २०१२ ग्रामीण भागातील गरिबांच्या दारापर्यंत न्यायव्यवस्थेची प्रक्रिया नेण्यास मेडिएशन (मध्यस्थी) ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर न्यायदानाची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी मध्यस्थी उपक्रम हा न्यायव्यवस्थेचा एक भाग होण्याची गरज असून त्यासाठी वकील, न्यायाधीश यांनी या उपक्रमात सहभागी होण्याची आवश्यकता आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. एस. निज्जर यांनी व्यक्त केले. |
पुणे / प्रतिनिधी सिप्ला परिहार सेवा केंद्राच्या वतीने ‘जागतिक परिहार सेवा दिना’ निमित्त अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर्स, नर्सेस, विद्यार्थी, विविध क्लब्ज व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा या पदयात्रेत समावेश होता. |
पुणे / प्रतिनिधी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत अतिशय वाईट आहे. मात्र याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, असे मत ‘बंगलोरच्या इन्स्टिटय़ूट फॉर सोशल अॅण्ड इकॉनॉमिक चेंज’ या संस्थेचे संचालक व शेतितज्ज्ञ डॉ. राम देशपांडे यांनी व्यक्त केले. |
पुणे / प्रतिनिधी ‘‘ शिवाजी महाराज आणि गुरू गोविंदसिंग या दोन्ही महापुरुषांच्या चरित्रांत खूप साम्य आहे. या दोघांनाही कुणी ‘गॉडफादर’ नव्हता. आपला गॉडफादर आपला विवेक आणि क्षमता हाच असतो, हे आजच्या पिढीला सांगण्यासाठी या महापुरुषांची चरित्रे पथदर्शक आहेत.’’ असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले. |
पुणे / प्रतिनिधी रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाचा भाग म्हणून ‘यामहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सुरक्षित वाहन चालविण्याच्या विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे पुण्यातही आयोजन करण्यात आले आहे. प्रामुख्याने मुलांमध्ये लहान वयातच सुरक्षित वाहन चालविण्याचे विज्ञान रुजावे या उद्देशाने खडकी येथे दोन दिवसांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. |
शहर सुधारणा समितीची नुसतीच हूल पुणे/प्रतिनिधी - शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२ शहरातील सर्व छोटी बेकायदेशीर बांधकामे दंड आकारून नियमित करण्याचा तसेच संपूर्ण शहराला गावठाणाचे नियम लावण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ठराव करून असा कोणताही निर्णय समितीने घेतलेला नाही, तर समितीच्या बैठकीत तशी फक्त चर्चा झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. प्रशासनाने सुरू केलेली कारवाई थांबवण्यासाठीच या निर्णयाची हूल उठवण्यात आल्याच्या आरोपाला या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे. |
पुणे / प्रतिनिधी पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींनी कासारवाडीत वास्तव्य केल्याची माहिती उघड झाल्यानंतर या भागात दुसऱ्या दिवशीही खळबळ होती. दहशतवादविरोधी पथकाने चौकशी सुरू केली असून एका इस्टेट एजंटसह काही नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यात महिलांचाही समावेश आहे. संशयित दहशतवादी वास्तव्यास असलेला फ्लॅट नेमका कोणत्या इमारतीत आहे, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही. मात्र, येथील दोन इमारतींवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचे समजते. |
पुणे/प्रतिनिधी पुण्यातील प्राचीन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वास्तूंची ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी महापालिकेतर्फे शनिवारवाडा ते विश्रामबागवाडा दरम्यान ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम सुरू केला जात असून, त्याचा उद्घाटन समारंभ घटस्थापनेच्या दिवशी (मंगळवार, १६ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला आहे. महापौर वैशाली बनकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्री कसबा गणपती, शनिवारवाडा, लाल महाल, विश्रामबागवाडा, नानावाडा, महात्मा फुले मंडई यासह पुण्यात ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या अडीचशेहून अधिक वास्तू आहेत. |
पिंपरीतील महिला सदस्यांची अजब मागणी पिंपरी / प्रतिनिधी स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी विश्वासात घेत नाहीत, हिशेबात घोळ करतात, अशी महिला सदस्यांची तक्रार आहे. त्यावर ‘समाधान’ करणारा तोडगा न निघाल्याने स्थायीच्या ‘प्री’ बैठकीत पतीराजांना बसू द्यावे, अशी अजब मागणी त्यांनी शेट्टी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे स्थायीच्या कारभाराला वेगळेच ‘वळण’ मिळण्याची चिन्हे आहेत. |
विद्यापीठाची आज अधिसभा पुणे / प्रतिनिधी विद्यापीठाची २०१२ मधील दुसरी अधिसभा शनिवारी (१३ ऑक्टोबर) होणार असून, विद्यापीठाच्या परीक्षांच्या दरम्यान लासलगाव येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानीच कस्टोडियन व वरिष्ठ पर्यवेक्षक ही पदे खोटी दाखवून या पदांसाठी देण्यात येणारे साधारण पन्नास हजार रुपये मानधन घेतले असून अधिसभेमध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अधिसभेप्रमाणे या अधिसभेतही विद्यापीठाचा परीक्षा विभाग गाजणार आहे. |
पुणे / प्रतिनिधी कर्वेनगर येथे मृत्युंजय मंदिराजवळ रस्त्यावर टाकलेल्या चिखलामुळे अपघात होऊन तरुणीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या बीएसएनएलच्या ठेकेदारासह बसचालकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. बीएसएनएलचा ठेकेदार महेंद्र पाटील (वय २८) आणि बसचालक शिवनाथ वाघमोडे (वय ३६, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत प्रियंका सुनील शेटे (वय २०, रा. शिवामृतकृपा सोसायटी, कर्वेनगर) या तरुणीचा मृत्यू झाला होता. |
पुणे / प्रतिनिधी पुणे विद्यापीठातील २४ तदर्थ अभ्यास मंडळांची वर्षभरात एकही बैठक झाली नसून यातील बहुतेक अभ्यासमंडळांची बैठक ही अध्यक्षांनी बोलावलीच नसल्यामुळे झालेली नाही. याबाबत अधिसभेचे सदस्य डॉ. विठ्ठलसिंह ढाकरे यांनी विद्यापीठाला प्रश्न विचारला आहे. |
महायुतीत सर्वाधिक तणाव; गोपीनाथ मुंडे यांनाच शह? पिंपरी / बाळासाहेब जवळकर विधानसभा निवडणुकांना बराच वेळ असूनही पिंपरी मतदारसंघावरून राजकीय डावपेचांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पिंपरी-भोसरी मतदारसंघ अदलाबदली करण्याच्या वादग्रस्त विषयावर चर्चा झाली. भाजपकडील पिंपरी शिवसेनेला देऊन त्यांच्याकडील भोसरी मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप शहराध्यक्षच आग्रही असून शिवसेना व गोपीनाथ मुंडे समर्थकांना हादरा देण्याचा दुहेरी डाव त्यामागे आहे. पिंपरीसाठी रिपाइंची प्रतिष्ठा लागणार असून राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ खेचण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच फिल्डिंग लावल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. |
पुणे / प्रतिनिधी बेकायदा बांधकामांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या कारवाईत गुरुवारी वडगाव धायरी आणि बिबवेवाडी येथील ३४ हजार ९०० चौरसफूट बांधकाम व शेड पाडण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिकांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध झाल्यानंतरही ११ ठिकाणची कारवाई पूर्ण करण्यात आली. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>
|
Page 13 of 18 |