पिंपरी / प्रतिनिधी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहातील दुरवस्थेची अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी गंभीर दखल घेतली असून यापुढे नाटय़गृहातील कामांमध्ये निष्काळजीपणा न करण्याची तंबी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. चिंचवडच्या नाटय़गृहात भरत जाधव यांच्या ‘पुन्हा, सही रे सही’ या नाटकाच्या वेळी साऊंड व एसीची यंत्रणा खराब झाल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घालण्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. त्यामुळे प्रयोग अर्धा तास थांबवण्यात आला होता. त्याचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रसिध्द केले व त्याची दखल कदम यांनी घेतली. |
पुणे / प्रतिनिधी ब्रिटिश राजवटीविरोधातील संघर्षमय परिस्थितीची पाश्र्वभूमी असलेल्या अनुराग कश्यप निर्मित बेदाप्रत पेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘चिटगाँग’ या चित्रपटात पुण्याच्या देल्झाद हिवाळे या युवा अभिनेत्याची प्रमुख भूमिका आहे. मनोज वाजपेयी, बॅरी जॉन, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासमवेत देल्झादची भूमिका असलेला हा चित्रपट शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) प्रदर्शित होत आहे. |
डॉ. आर. एस. देशपांडे यांचे मत पुणे / प्रतिनिधी रोजगार निर्मितीवर भर देत स्थैर्य राखणे, हेच अर्थव्यवस्थेपुढील मोठे आव्हान असल्याचे मत बंगळुरू येथील ‘इन्स्टिटय़ूट फॉर सोशल अॅन्ड इकॉनॉमिक चेंज’ या संस्थेचे संचालक डॉ. आर. एस. देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. वित्तीय तूट कमी करण्यावर भर दिला नाही,तर १९९० च्या अर्थव्यवस्थेची वेळ पुन्हा एकदा आपल्यावर येईल, अशी भीती त्यांनी बोलून दाखविली. |
पुणे / प्रतिनिधी नॅनो तंत्रज्ञान या विषयावरील ‘नॅनोकॉन २०१२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे भारती विश्वविद्यालयातर्फे आयोजन करण्यात आले असून १८ व १९ ऑक्टोबरला ही परिषद होणार असल्याची माहिती विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. नॅनो तंत्रज्ञानातील माहिती, नवे शोध अशा मुद्दय़ांवर या परिषदेमध्ये विविध देशांमधील तज्ज्ञांमध्ये चर्चा होणार आहे. |
पुणे / प्रतिनिधी शहरातील अतिरेकी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर भाडेकरू व जुन्या वाहनांची खरेदी करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले असून, जागेची खरेदी-विक्री व सदनिका भाडय़ाचे देण्याचे काम करणाऱ्या एजंटलाही हे सक्तीचे करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या वतीने देण्यात आली. |
शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२
कोण आहे फिरोज सय्यद? जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अटक केलेला आरोपी फिरोज ऊर्फ हमजा अब्दुल हमीद सय्यद (वय ३८, रा. शुक्रवार पेठ) याचे लष्कर भागातील जान महंमद स्ट्रीट येथे कपडय़ाचे ऑप्शन नावाचे दुकान आहे. मोहसीन बागबान याच्या सोबत पार्टनरशिप मध्ये हे दुकान गेल्या चार वर्षांपासून चालवत आहे. |
पुणे / प्रतिनिधी
इंडियन मुजाहिदिन (आयएम) या नावाने दहशतवादी कृत्ये करणारी संघटना ही पुण्यात अजूनही मोठय़ा प्रमाणातच सक्रिय असल्याचे पुण्यात १ ऑगस्ट रोजी झालेले साखळी बॉम्बस्फोटांची घटना आणि या घटनेच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. हा संपूर्ण कट रचणे, त्याची तयारी आणि त्याची कार्यवाहीसुद्धा याच संघटनेच्या लोकांनी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. |
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील मॅकडोनल्ड रेस्टॉरंट, देना बँक, गरवारे भुयारी मार्गाजवळ आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या फाटकाजवळ एक ऑगस्ट रोजी रात्री साडेसात ते साडेआठ दरम्यान चार कमी तीव्रतेचे साखळी बॉम्बस्फोट झाले होते, तर एक बॉम्ब निकामी करण्यात बॉम्बशोधक व नाशक पथकला यश आले होते.
|
पुणे / प्रतिनिधी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा ‘इंडियन मुजाहिदीन’चा संशयित दहशतवादी मोहम्मद कतिल मोहम्मद जफिर सिद्दीकी (वय २७, रा. दरभंगा, बिहार) याचा ८ जून २०१२ रोजी येरवडा कारागृहातील अतिसुरक्षित अंडा सेलमध्ये स्थानिक गुंड शरद मोहोळ व त्याचा साथीदार अलोक भालेराव यांनी खून केला होता. |
बॉम्बस्फोटातील आरोपी पकडल्यानंतरही पोलिसांचा खुलासा नाही पुणे / प्रतिनिधी जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील एकमेव जखमी व संशयीत म्हणून पोलिसांनी सखोल चौकशी केलेल्या दयानंद पाटीलचे नेमके काय झाले, हे अद्यापही गूढच आहे. |
पुणे/प्रतिनिधी पाणी नियोजनाबाबत नुकतीच झालेली कालवा समितीची बैठक हा ग्रामीण भागातील उसाच्या शेतीसाठी पाणी पळवण्याचा रीतसर डाव होता, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. |
पुणे / प्रतिनिधी लक्ष्मी रस्त्यावरील पु. ना. गाडगीळ सराफी पेढीच्या दुकानाला आता सहा मजली पुणेरी वाडय़ाचे रूप मिळाले असून, त्याचे उद्घाटन घटस्थापनेच्या दिवशी (१६ ऑक्टोबर) होणार आहे. याच दिवशी पेढीच्या ऑनलाईन खरेदी सुविधेचाही प्रारंभ करण्यात येणार आहे. |
पुणे / प्रतिनिधी प्रसिद्ध नट व नाटककार कै. बाबुराव गोखले यांच्या पत्नी अचला गोखले (वय ९२) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. |
पुणे / प्रतिनिधी उद्योगपती अविनाश वारदेकर (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. |
केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कार केसरी-मराठा संस्थेच्या वतीने केसरीचे माजी विश्वस्त-संपादक व साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकासाठी यंदा अभिराम भडकमकर लिखित ‘असा बालगंधर्व’ आणि अच्युत गोडबोले व डॉ.माधवी ठाकूर देसाई यांनी लिहिलेल्या ‘नॅनोदय’ या दोन ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. |
मुकुंद संगोराम, गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राहायला जागा नाही, म्हणून कितीतरी र्वष वणवण सुरू आहे माझी.. आजूबाजूच्या अनेकांनी दिसेल तिथं घरं बांधूनही टाकली. त्या बेकायदा घरात राहणारे माझे मित्र पाहिले की मन खट्टू व्हायचं. त्यांना आपण काही चूक केलीये, असं वाटायचं नाही. पण ते भले मजेत दिसायचे. |
पिंपरी / प्रतिनिधी
स्थळ- चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे नाटय़गृह. वेळ- मंगळवार रात्री दहा. मराठीचा सुपरस्टार भरत जाधवच्या राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या ‘पुन्हा, सही रे सही’ नाटकाच्या प्रयोगासाठी आडदिवस असूनही नाटय़गृह रसिकांनी तुडुंब भरलेले होते. प्रयोग रंगात आला असतानाच नाटय़गृहातील दुरवस्थेने तोंड वर काढले अन् रंगाचा बेरंग झाला. |
नामांकित महाविद्यालयांमध्ये रॅकेट चालविणारा गजाआड पुणे / प्रतिनिधी शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बनावट हॉलतिकीट बनवून त्याच्या जागेवर डमी विद्यार्थ्यांला परीक्षेत बसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. |
पुणे/प्रतिनिधी जीवनावश्यक वस्तूंसह स्वयंपाकाच्या गॅसला पुणे शहरात कायमस्वरूपी जकातमाफी द्यावी, असा निर्णय महापालिकेच्या विधी समितीमध्ये बुधवारी एकमताने घेण्यात आला. या निर्णयाबरोबरच सोन्यावरील जकात शेकडा तीन रुपयांवरून पाच रुपये करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. |
पुणे/प्रतिनिधी नवक्षितिज आयोजित विशेष मुलांच्या आंतरशालेय नाटय़स्पर्धेत मोठय़ा गटात जीवनज्योत शाळेच्या ‘संत तुकाराम’ तर निगडीच्या कामायनी संस्थेच्या ‘अमूल्यरत्ने’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>
|
Page 14 of 18 |