पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पुणे वृत्तान्त
उधळपट्टी व खाबुगिरी सुरूच राहिल्यास श्रीमंत पालिकेला लवकरच ‘भिकेचे डोहाळे’ Print E-mail

पिंपरी पालिका आज ‘तिशी’ ची
पिंपरी / बाळासाहेब जवळकर
आकुर्डी, भोसरी, पिंपरी, चिंचवड ग्रामपंचायती एकत्र करून १९७० मध्ये स्थापना झालेल्या िपपरी नगरपालिकेची शहरातील औद्योगिकीकरणामुळे झपाटय़ाने वाढ होत गेली आणि १२ वर्षांतच पिंपरीत महापालिका झाली.

 
लहानग्यांसाठी पुस्तकातून उलगडणारे पर्यावरण.. Print E-mail

पुणे/श्रीराम ओक
ऐन पावसाळ्यातील पाणीकपातीनंतर पुणे शहराला पाणी मिळाले खरे, पण पुणेकरांनी त्यांची पाण्याची नासाडी करण्याची सवय सोडली नाही. पुण्याजवळच्या गावांमध्ये आजही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, याची जाणीवच आपल्याला राहिली नाही.

 
जागतिक पातळीवर परिणामकारक लशींचा अभाव- ज्युल्स हॉफमन Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
‘‘परिणामकारक लशी बनविण्यात आपल्याला अजूनही यश आलेले नाही. पण रसायनशास्त्राच्या खोलवर अभ्यासातून रेणूंचे नवीन संयोग शोधून काढता येतील. या लशी प्रभावी ठराव्यात यासाठी पूरक उपचारांचीही तितकीच गरज आहे,’’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते प्रा. ज्युल्स हॉफमन यांनी व्यक्त केले.

 
१६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान पुणे नवरात्री महोत्सवाचे आयोजन Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
कला, संस्कृती, नृत्य, गायन व वादन यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्री महोत्सव १६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे.

 
बुरुड समाजाच्या मुलांसाठी बांबूच्या वस्तूचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करणार Print E-mail

पतंगराव कदम यांची माहिती
 पुणे /प्रतिनिधी
बुरुड समाजाच्या मुलांसाठी अत्याधुनिक पद्धतीने बांबूच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करण्याचे आश्वासन वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिले आहे. ‘पुणे जिल्हा बुरुड समाजा’ तर्फे सोमवारी कदम यांचा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कदम बोलत होते.

 
आयएसी, सजग, परिवर्तनतर्फे मतदार नोंदणीची मोहीम Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
मतदारांसाठी मतदार नोंदणी सुलभ होण्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी), परिवर्तन आणि सजग नागरिक मंच या संस्थांचे कार्यकर्ते या महिनाभरात मतदार नोंदणीसाठी घराघरात जाऊन नोंदणी करणार आहेत.

 
शिक्षकांना मतदार नोंदणीची कामे देणे Print E-mail

हा तर शिक्षण हक्क कायद्याचा भंग
मनसेकडून आक्षेप
 पुणे/ प्रतिनिधी
तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी तरतूद शिक्षण हक्क कायद्यात असतानाही बहुसंख्य शिक्षकांना मतदार नोंदणीची कामे करायला लावणे हा या कायद्याचाच भंग होत असल्याचा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.

 
दिवाकर कारखानीस यांचे निधन Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
दिवाकर ऊर्फ दादा कारखानीस (वय ८३) यांचे अमेरिकेतील ह्य़ूस्टन येथे निधन झाले. ४० वर्षे ते परदेशी होते. भारताची साहित्यिक आणि सांस्कृतिक मूल्य परदेशी जपण्यात ते अग्रेसर होते.

 
धानोरी प्रभागाच्या समस्यांबाबत नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा Print E-mail

पुणे/प्रतिनिधी
नियमित पाणीपुरवठय़ासह रस्ते, भाजी मंडई, उद्यान, मैदाने आदी सुविधांचा विकास प्रभागात करावा यासह विविध मागण्यांसाठी धानोरी प्रभागातील नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढला. प्रभागातील समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त महेश पाठक यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.

 
एसटीची पुणे-दादर ‘शिवनेरी’ आता स्वारगेट स्थानकावरूनही! Print E-mail

पुणे/प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवनेरी ही पुणे-दादर मार्गावरील गाडी आता स्वारगेट स्थानकावरूनही सोडण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात या सेवेचा लाभ प्रवाशांना मिळू शकणार आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

टपाल दिनानिमित्त पोस्टमनचा सत्कार
इंटरनेट, एसएमएस आणि कुरिअरच्या जमान्यातही लोकांपर्यंत टपाल पोहोचविणाऱ्या पोस्टमन्सचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला. जागतिक टपाल दिनानिमित्त करण्यात आलेल्या या सत्कारामुळे पोस्टमन भारावून गेले. विश्रामबागवाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप काळोखे यांच्या हस्ते दररोज पायपीट करून घरोघरी जात सेवा देणाऱ्या सिटी पोस्ट आणि टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाजवळील टपाल कार्यालयातील पोस्टमन यांच्यासह अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या वेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
‘निर्णय’ लघुपटाचे प्रदर्शन
सफाई कामगारांच्या प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या ‘निर्णय’ या लघुपट सर्वाच्या भेटीला येत आहे. पुणे मनपातील सफाई कामगार सतीश लालबिगे यांची निर्मिती हे या लघुपटाचे वैशिष्टय़ आहे. ‘मेहतर समाजातील एक सफाई कामगार आणि त्याचे कुटुंब’ यांच्यावर हा लघुपट आधारित आहे. या लघुपटाचे उद्घाटनीय प्रदर्शन ११ ऑक्टोबर रोजी मंगला चित्रपटगृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सर्वासाठी मोफत खुला आहे.
‘आयएमए’ची हडपसर शाखा
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हडपसर शाखेचे उद्घाटन नुकतेच डॉ.के.एच.संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. बदलत्या काळात औषधे आणि तंत्र प्रगत झाले असले तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आजही महत्त्वाचा वाटत असून, त्याकडे डॉक्टरांनी लक्ष द्यावे असे आवाहन डॉ.संचेती यांनी या वेळी केले. डॉ.क्वाएद जोहर धारिवाल, आयएमए राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ.मििलद नाईक, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.देवेंद्र शिरोळे आदी या कार्यक्रमास उपलब्ध होते.
एड्सग्रस्त मुलांसाठी निधी
ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पामधून ‘स्पर्श बालग्राम’ संस्थेतील एचआयव्ही एड्सग्रस्त मुलांसाठी एक लाख पन्नास हजार रुपयांचा निधी देण्यात आला. या संस्थेमध्ये सध्या १६ बालके आहेत. स्पर्श बालग्रामचे सुजाता यादव यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राजन जगताप, किशोर पिंगळीकर, महेश खुरसाळे आदी या वेळी उपस्थित होते.
‘मणिरत्न शिक्षक गौरव’
पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टतर्फे ‘मणिरत्न शिक्षक गौरव’ पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. या वर्षीचा हा पुरस्कार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री वाघेश्वर विद्यालय, वाघोली येथील विज्ञान अध्यापक सुखदेव तांबे यांना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी, समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, एल. एन. जाधव, चंद्रभान भोयर, डॉ. रवींद्र भोळे आदी उपस्थित होते.
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ
केंद्र शासनाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबपर्यंत वाढवण्यात आली आहे.
केंद्र शासनाकडून मुस्लीम, पारशी, शीख, बौद्ध व ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज यावर्षी पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
इंजिनीअर यांचे व्याख्यान
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने महात्मा गांधी सप्ताहांतर्गत ज्येष्ठ विचारवंत व इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक डॉ. असगर अली इंजिनिअर यांनी ‘इस्लाम धर्म आणि अहिंसा’ या विषयावर आपले विचार मांडले. आपल्या समाजात धर्म व जातीवर आधारित निर्माण होणारी ओळख महत्त्वाची मानली जाते. पण धर्मातील खरी मूल्ये अंगीकारली तर अहिंसा प्रस्थापित होईल, असे मत डॉ. इंजिनिअर यांनी या वेळी व्यक्त केले. स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

 
सर्व बेकायदा बांधकामे दंड आकारून कायदेशीर करणार Print E-mail

महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकांची ‘कारवाई’
पुणे/प्रतिनिधी - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
* नगरसेवकांचे निर्णय दृष्टिक्षेपात..
* छोटी बेकायदा बांधकामे नियमित करा
* दुप्पट शुल्क आकारणी करा
* आजवर झालेली सर्व बांधकामे नियमित करणार
* गावठाणातील नियम संपूर्ण शहराला लागू
शहरातील बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू होताच धाबे दणाणलेल्या नगरसेवकांनी या कारवाईला खीळ बसेल असा निर्णय मंगळवारी घेतला. पाचशे ते सत्तावीसशे चौरसफुटांच्या प्लॉटवर बांधण्यात आलेली अनधिकृत बांधकामे दुप्पट शुल्क आकारून नियमित करून द्यावीत, असा धक्कादायक निर्णय शहर सुधारणा समितीने मंगळवारी घेतला.

 
फसवणुकीचा धक्का सहन न झाल्याने तरुणाचा मृत्यू Print E-mail

परदेशात नोकरीच्या बहाण्याने पावणेसहा लाखांची फसवणूक
पुणे / प्रतिनिधी
परदेशात मोठय़ा पगाराची नोकरी देण्याच्या आमिषाने पुण्यात हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण घेतलेल्या तरुणाची सुमारे सहा लाख रुपयांची फसवणूक झाली. या फसवणुकीचा धक्का सहन न झाल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

 
पादचाऱ्याला जखमीला करून रुग्णालयात नेताना रिक्षावाल्याने मध्येच टाकून दिले Print E-mail

उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू
पुणे / प्रतिनिधी
रिक्षाचालकाने पादचाऱ्याला ठोकर दिल्यानंतर रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून नेले आणि त्याला गंभीर जखमी अवस्थेत मध्येच गवतात टाकून दिले. या घटनेत या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. महंमदवाडी-हडपसर रस्त्यावर सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे.

 
पिंपरी पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून अजितदादांना वगळले! Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या अजित पवार यांचे नाव पिंपरी पालिकेच्या वर्धापनदिनाच्या निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी पालिकेत अजितदादा सर्वेसर्वा असून त्यांचे नाव नसलेल्या पत्रिका प्रथमच बाहेर पडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

 
परदेशी विद्यार्थ्यांचा ‘पुणेरी’ चौकसपणा! Print E-mail

महापालिकेला भेट देऊन केली महापौरांशी चर्चा
पुणे / प्रतिनिधी
पुण्यातील अनधिकृत बांधकामे.. कामाच्या शोधात बाहेरून आलेले लोक.. झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन.. पुण्याची वाहतूक व्यवस्था.. कचऱ्याची समस्या.. पुण्याशी संबंधित हे प्रश्न पुणेकरांनी नव्हे, परदेशी विद्यार्थ्यांनी विचारले तर?.. केवळ काही आठवडय़ांच्या पुण्यातील वास्तव्यात या शहराची अस्सल पुणेकरांइतकीच माहिती मिळविलेल्या या विद्यार्थ्यांनी पुणेकरांच्याच चौकसपणाने थेट महापौरांपुढे हे प्रश्न मांडले.

 
‘होर्डिग धोरणाच्या विषयपत्रात माझ्या नावाचा उल्लेख चुकीचा’ Print E-mail

पुणे/प्रतिनिधी
महापालिकेच्या होर्डिग धोरणासंबंधीच्या विषयपत्रात प्रशासनाने केलेला माझ्या नावाचा उल्लेख पूर्णत: चुकीचा असून त्यासाठी झालेल्या बैठकीशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे. होर्डिग धोरण निश्चित करण्यासाठी उशीर होत असल्यामुळे महापालिकेचे, पर्यायाने शहराचे जे आर्थिक नुकसान होत आहे, ते होऊ नये अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

 
लाचखोरांच्या शिक्षेच्या टक्केवारीत राज्यात पुणे विभाग आघाडीवर Print E-mail

यावर्षी ऑगस्टअखेर ८० जणांस शिक्षा
पुणे/श्रीकृष्ण कोल्हे
राज्यात गेल्या दोन वर्षांत लाचखोरांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून, यावर्षी आतापर्यंत ऐंशी लाचखोरांना शिक्षा झाली आहे. लाचखोरांना शिक्षा होण्याच्या टक्केवारीत पुणे विभागाचा पहिला क्रमांक आहे. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधकचे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे एकूण आठ विभाग आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या आठ विभागात लाचखोर अधिकाऱ्यांना शिक्षा होण्याच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

 
जकातचोरांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी Print E-mail

पुणे/प्रतिनिधी
जकात चुकवेगिरी करून जे जे वाहतूक व्यावसायिक महापालिकेचे आर्थिक नुकसान करत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, तसेच जकात चुकवेगिरी प्रकरणात सिंडिकेट ट्रान्सपोर्ट या वाहतूक व्यावसायिकाला काळ्या यादीत टाका अशी जोरदार मागणी स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली.

 
स्वत:च्या छायाचित्राचे टपाल तिकीट छापण्याची पुन्हा संधी! Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
स्वत:च्या छायाचित्राचा समावेश व आवडीची रचना असलेले टपाल तिकीट छापून घेण्याची संधी टपाल खात्याच्या पुणे विभागाने पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी ‘माय स्टॅम्प’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>

Page 15 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो