प्रतिनिधी बोलक्या बाहुल्यांचा किंवा दोरीवर हलणाऱ्या कठपुतळ्यांचा खेळ आबालवृद्धांच्या आनंदाचा ठेवा असतो. काळानुरूप या बोलक्या बाहुल्याही ‘हाय टेक’ झाल्या आहेत. आता या कापडी बाहुल्यांची जागा चक्क रोबोटने घेतली असून त्यांच्या सर्व हालचाली ‘मोशन सेन्सर’ तंत्रज्ञान वापरून करून घेणे शक्य झाले आहे. |
प्रतिनिधी गिरिकंद ट्रॅव्हल्सच्या बसची तोडफोड करत संचालक अखिलेश विश्वास जोशी (रा. डेक्कन जिमखाना) यांना मारहाण करणाऱ्या तिघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. गिरिकंद ट्रॅव्हल्सला कर्मचाऱ्यांची वाहतूककरण्याचे मिळालेले कंत्राट त्यांनी घेऊ नये, म्हणून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. |
प्रतिनिधी इग्नायटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडिया (आय टू आय)२०१२-१३ या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले असून या वर्षी या महोत्सवामध्ये देशातील विविध शहरांमधील एक हजार पाचशे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा प्रत्यय येणार आहे. |
पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी घोंगडे पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी उमेश घोंगडे यांची तर प्रतिष्ठानच्या विश्वस्त कार्यवाहपदी श्याम दौंडकर यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी योगेश कुटे आणि उपाध्यक्षपदी जयराम देसाई यांची नियुक्ती झाली आहे. |
डॉ. नरेंद्र जाधव यांची अपेक्षा पुणे / प्रतिनिधी, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२ जो आपला इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ नसतो, असे म्हटले जाते. त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रवाहांची आव्हाने असली तरी इतिहास आणि परंपरेचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे. पुरातत्त्व विद्याशाखेच्या संशोधनासाठी कार्यरत असलेली डेक्कन कॉलेज ही जगातील सर्वोत्तम संस्था व्हावी, अशी अपेक्षा केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी शनिवारी व्यक्त केली. |
पुणे/प्रतिनिधी बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत शनिवारी वारजे, कर्वेनगरमधील पाच इमारती पाडण्यात आल्या. तसेच मॉडेल कॉलनीमधील दुकानांच्या शेडवरही मोठय़ा प्रमाणावर कारवाई करण्यात आली. दिवसभरात इमारतींचे २० हजार चौरसफूट तर शेडचे तीन हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले. |
पुणे/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने १० ऑक्टोबर रोजी बडोदा येथे आयोजित केलेले राष्ट्रीय अधिवेशन हे फक्त केंद्रीय व राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांसाठीच मर्यादित असून हे राष्ट्रीय अधिवेशन असले तरी त्यात खुले अधिवेशन असणार नाही, असे पक्षाने जाहीर केले आहे. |
पुणे / प्रतिनिधी दौंड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार राजेंद्र भाऊलाल पवार (वय ५०) यांना अटक न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. |
पिंपरी / प्रतिनिधी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धडाकेबाज सुरुवात केलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची अमेरिकेतील प्रशिक्षण दौऱ्यासाठी निवड झाली व ते दोन महिन्यांच्या दौऱ्यावर गेले. |
तानाजी काळे / इंदापूर शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा ताबा देण्यास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उठवताच, शेतकऱ्यांना जमिनी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अन् यासाठी गेली ६० वर्षे दिलेल्या लढय़ाचा प्रवास कथन करताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.. त्यांना पाठिंबा देणारे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हेही या प्रसंगाचे साक्षीदार होते. |
उस्ताद फैय्याज हुसेन खॉं यांची भावना
प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२ भारतीय संगीत हा समुद्र आहे. त्यामध्ये जितके वेळा डुबकी माराल तेवढय़ा वेळेस रत्नेच आपल्या हाती लागतात. संगीत क्षेत्रातील कलाकार हा धनवान असतो. संगीतामुळे जीवनाला संजीवनी मिळाली, अशी भावना ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फैय्याज हुसेन खॉं यांनी व्यक्त केली. |
असह्य़ दरुगधी, पाणी नाही, दारे-खिडक्याही तुटक्या रसिका मुळ्ये / तृप्ती सावे पुण्यातील अनेक शाळांकडून स्वच्छतागृहासारख्या प्राथमिक गरजेकडेही गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे ‘लोकसत्ता’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. |
भरतीची नियमावली मंजूर; शेरे मारण्यावर पक्षनेते ठाम प्रतिनिधी महापालिकेतील भरतीसंबंधीच्या नियमावलीला अखेर पक्षनेत्यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. अंतिम मंजुरीसाठी ही नियमावली आता राज्य शासनाकडे पाठवली जाणार आहे. |
भूमिगत वाहिन्यांबाबत हलगर्जीपणा.. प्रतिनिधी पाच दिवसांपासून शहरात दमदार पावसाने हजेरी लावली असतानाच विजेचा खेळखंडोबाही सुरू झाला आहे. भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे शहरभर पसरविण्यात आले असले, तरी रस्त्याचे खोदकाम करणाऱ्या विविध यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे प्रामुख्याने वीज वितरणात बिघाड निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. |
प्रतिनिधी पुणे विद्यापीठ आता युरोपियन कंपन्यांबरोबर करार करणार असून या कंपन्यांच्या सहकार्याने विद्यापीठामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली. |
जकात कर्मचाऱ्यांच्या दडपशाहीचा आरोप प्रतिनिधी महापालिका जकात विभागाचे कर्मचारी दुकानाबाहेर उभे राहून ग्राहकांच्या बॅगा आणि सेल्समनचे खिसे तपासून दडपशाहीचा अवलंब करीत असल्याचा आरोप करून सराफ व्यावसायिकांनी शुक्रवारी लाक्षणिक बंद पुकारला. |
संतोष वळसे पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार संतोष वळसे पाटील यांना नुकताच देण्यात आला. |
सिलिंडर्सच्या मर्यादेमुळे पुण्यातील सेवाभावी संस्था अडचणीत
संपदा सोवनी, शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२ कुटुंबाची नेमकी व्याख्या काय? ४-६ व्यक्तींच्या कुटुंबाला असलेली गॅस सिलिंडर्सची मर्यादा पन्नास-शंभर-दोनशे जणांना जेवू घालणाऱ्या सेवाभावी संस्थांनाही लागू कशी? सिलिंडर सवलतीच्या दरात देताना सेवाभावी संस्थांमध्ये अनेक कुटुंबे सामावलेली आहेत असे मानता येणार नाही का?.. हे कळकळीचे प्रश्न आहेत, पुण्यातील अनेक सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचे. |
आणखी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता
विशेष प्रतिनिधी ऑक्टोबरच्या पहिल्या चारच दिवसांमध्ये पुण्यात तब्बल १०० मिलिमीटर पाऊस पडला असून, त्यामुळे पुण्याच्या पावसाच्या आकडेवारीत लक्षणीय भर पडली आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता पुढील दोन दिवसांतही जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. |
सर्वेक्षणाचे नियोजन अन् एक लाख परवान्यांचे ‘टार्गेट’ बाळासाहेब जवळकर उद्योगनगरी व कामगारांचे शहर अशी ख्याती असलेल्या िपपरी-चिंचवड शहरात उद्योगधंदे तसेच व्यवसायासाठी अवघे ८ हजार परवाने दिले गेले आहेत. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>
|
Page 17 of 18 |