प्रतिनिधी येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मंगळवारपासून बालगंधर्व कलादालनात सुरु झाले. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन गुरूवापर्यंत सर्वासाठी खुले राहणार आहे. |
प्रतिनिधी विजेपासून होणारे अपघात टाळणे व सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कर्मचारी व नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीबाबत टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने ‘महावितरण’ला नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला. |
- ‘नो एन्ट्री’ मधून जाणाऱ्या बसचा अपघात - गेल्या अकरा महिन्यांत पीएमपीएलचा विसावा बळी
प्रतिनिधी पीएमपीएलच्या बसचालकाच्या बेशिस्तीमुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ पादचारी महिलेला सोमवारी दुपारी जीव गमवावा लागला. चालकाने नो एन्ट्रीमध्ये बस नेल्यामुळे महापालिकेच्या समोरच्या प्रवेशद्वाराजवळ बसच्या चाकाखाली सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकास अटक केली आहे. गेल्या अकरा महिन्यांत पीएमपीएल बसने घेतलेा हा विसावा बळी आहे. |
पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू प्रतिनिधी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून पुण्यातील उमेदवाराच्या नावासंबंधी चर्चा करण्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक मंगळवारी पुण्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे. |
प्रतिनिधी शहरात तोतया पोलीस व सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून गेल्या चोवीस तासात चार सोनसाखळी चोरीच्या, तर तीन तोतया पोलिसांकडून फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण पावणे सहा लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. |
प्रतिनिधी महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्टो)यांच्यातर्फे प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (५ नोव्हेंबर) उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये राज्यभरातील साधारण दीड हजार प्राध्यापक सहभागी झाले होते. |
चोवीस तास पाणीपुरवठय़ाचा वाद प्रतिनिधी पुणेकरांना नियमित आणि चोवीस तास पाणी मिळाले पाहिजे, अशीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. पक्षाचे आमदार बापू पठारे त्या भूमिकेच्या विरोधात काही बोलले असतील, तर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्या मताशी राष्ट्रवादी अजिबात सहमत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत राष्ट्रवादीने आज आमदार पठारे यांची पाठराखण करायला ठाम नकार दिला. |
प्रतिनिधी पुणे शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा हे फक्त निवडणुकीतील आश्वासन होते, हे आमदार बापू पठारे यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीने पुणेकरांना फसवल्याचेही सिद्ध झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली. |
‘ती’ महिला सीसीटीव्हीत कैद पिंपरी / प्रतिनिधी मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरीतही नवजात बालक पळवण्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून सकाळी साडेअकराच्या सुमारास एका अज्ञात महिलेने हे बालक घेऊन पोबारा केला. |
वाढीव दराच्या निविदांमुळे ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ पिंपरी / प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व घरकुलासंदर्भात पिंपरी पालिका सभेने केलेल्या ठरावाची पाच वर्षांनंतरही अंमलबजावणी केली नसल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. |
प्रतिनिधी ‘‘मूल्यवर्धित कर (व्हॅट) हा अप्रत्यक्ष कर असल्यामुळे तो ‘एन्ड यूझर’ ने अर्थात ग्राहकानेच डीलरकडे भरणे अपेक्षित आहे. १ एप्रिल २०१० पासून बांधकाम व्यावसायिक सदनिका नोंदणीच्या वेळी ग्राहकाकडून मुद्रांक शुल्क, सेवा कर आणि मूल्यवर्धित कर जमा करून घेऊन त्याचा भरणा शासनाकडे करतात. |
शिरूर/प्रतिनिधी शिरूर येथील घोडनदीच्या सतरा कमान पुलानजीक पुणे-नगर बाह्य़ मार्गावर रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी आलेल्या आरोपींला तीन रिव्हॉल्व्हर व काडतुसासह शिरूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक लाख चारशे रुपयांचा माल जप्त केला आहे. |
पिंपरी / प्रतिनिधी आगामी २०१४ च्या निवडणुकांच्या जोरदार तयारीला लागलेल्या आणि पिंपरीचे मॉडेल राज्यभरात राबवू पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मात्र ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती आहे. |
पिंपरी / प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असून, हा गुंडांचा पक्ष असल्याचे आपण पूर्वीपासूनच निदर्शनास आणून दिले होते, असे म्हटले आहे. |
प्रतिनिधी लवासा, टाटा प्रकल्प व वांग मराठवाडी धरणग्रस्तांचे पुर्नवसन व प्रलंबित मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या ८१ आंदोलकांना सोमवारी दुपारी बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. |
प्रतिनिधी विविध विषयांवरील आणि वेगवेगळ्या भाषांतील पुस्तकांचा समावेश असलेले पुणे बुक फेअर हे ग्रंथप्रदर्शन बुधवारपासून (७ नोव्हेंबर) गणेश कला क्रीडा मंच येथे भरविण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. |
प्रतिनिधी इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने या वर्षीच्या ऊस गाळप हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन २१०० रुपये पहिला हप्ता उचल जाहीर केला, कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानदेव बनकर यांनी ही माहिती दिली. |
पिंपरी / प्रतिनिधी कासारवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सुदर्शन मंडळांचे माजी अध्यक्ष नामदेव धर्माजी शिंदे (वय ७०) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. |
वृत्तपत्र विक्रेता संघाचा कौटुंबिक स्नेहमेळावा पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या कोथरुड शाखेच्या वतीने या भागातील विक्रेत्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. विक्रेत्यांना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तूंचे वाटपही करण्यात आले. |
सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला पुणे / प्रतिनिधी, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ तळवडे येथील बर्फ बनविणाऱ्या श्री स्वामी समर्थ कारखान्यात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाईप तुटल्यामुळे अमोनियम वायूची गळती झाली. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 3 of 18 |