पुणे/प्रतिनिधी महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनामध्ये या महिन्यापासून अपर जिल्हाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या संबंधीच्या शासन आदेशाचे गेल्या तेरा वर्षांत पालन होत नव्हते, ही वस्तुस्थितीही माहिती अधिकारातून उघड झाली आहे. |
पुणे / प्रतिनिधी राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये नव्याने २४८ शिक्षकांची पदे निर्माण करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन यांनी दिली. |
पुणे / प्रतिनिधी दिवाळीच्या कालावधीत रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वेच्या पुणे विभागात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले. |
पुणे/ प्रतिनिधी दि पूना र्मचट्स चेंबरतर्फे रास्त दरात लाडू-चिवडा विक्री या उपक्रमाची मंगळवारपासून (६ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. या उपक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून दोन लाख पन्नास हजार किलो लाडू आणि चिवडय़ाच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. |
शिरूर/वार्ताहर महसूल पथकाने अनधिकृतपणे वाळू उपसा चालू असताना छापा टाकून जप्त केलेला जेसेबी घेऊन जाणाऱ्या तलाठय़ास दमदाटी करून पळवून नेणाऱ्यास शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. |
प्रतिनिधी, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
रास्ता पेठेतील जे. पी. ज्वेलर्स या दुकानाच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरटय़ांनी साडेसात किलो सोने व रोख ४७ हजार असा एकूण एक कोटी ९७ लाख रुपयाचा ऐवज चोरुन नेला. दुकानामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे असून त्याचे चित्रीकरण साठविणारे युनिटही चोरुन नेले आहे. गुरुवारी रात्री नऊ ते अकरा दरम्यान हा प्रकार घडला. |
प्रतिनिधी महापालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखडय़ात एकही बदल न करता आमदारांनी तो आराखडा सहा महिन्यात राज्य शासनाकडून मंजूर करून दाखवावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने आमदारांना दिले आहे. विकास आराखडय़ाकडे चांगल्या नजरेने पाहा, असेही राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. |
प्रतिनिधी कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) अभ्यासक्रमाच्या फाऊंडेशन प्रोग्रॅम पाठोपाठ आता एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्रॅमच्या अभ्यासक्रमामध्येही बदल करण्यात आले असून सी.एस.चा नवीन अभ्यासक्रम खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ आहे, असे इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय)चे अध्यक्ष निसार अहमद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. |
पिंपरी / प्रतिनिधी देशाचा विकास घडवायचा असेल तर अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातली पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी निगडीत बोलताना व्यक्त केले. विज्ञानाचे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. |
प्रतिनिधी सिंहगड रस्त्यावर महापालिकेने विकसित केलेल्या पु. ल. देशपांडे उद्यानामध्ये ‘पुलं’चा पुतळा बसविण्याचा तसेच त्यांच्या नावाने तेथे ग्रंथालय सुरू करावे आणि ‘पुलं’चा जीवनपटही ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून तेथे दाखवावा, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. |
प्रतिनिधी शहर व जिल्ह्य़ात जप्त करण्यात आलेला दीड कोटी रुपयांचा अडीच हजार किलो गांजा, पाच किलो चरस आणि दीड किलो ब्राऊन शुगर हे अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. |
पुणे जिल्हा विकास मंचाची मागणी प्रतिनिधी तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायदे कालबाह्य़ झाले असून त्यात जनहिताच्या दृष्टीने त्वरित सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी पुणे जिल्हा विकास मंचाने केली आहे. मंचाचे सचिव अॅड. राजू राजुरकर यांनी ही माहिती दिली. |
पिंपरी / प्रतिनिधी हिंदू हित रक्षणासाठी हिंदूंनी संघटितपणे उभे राहिले पाहिजे, असे सांगत हिंदू धर्म व संस्कृतीचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड येथे केले. |
प्रतिनिधी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा होऊनही शहरात पाणीकपात का, असा प्रश्न पुणेकरांना पडला असून या प्रश्नाबाबत रविवारी (४ नोव्हेंबर) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. |
एनएसएसच्या वतीने किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी शिबिर पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व दुर्गसंवर्धन महासंघ यांच्या वतीने एनएसएसच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. |
शाळांमधील शिक्षेसंदर्भात शिक्षणक्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया प्रतिनिधी - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२ विद्यार्थ्यांला येता-जाता शिक्षा करू नयेच; पण विद्यार्थ्यांना शिक्षा करणाऱ्या शिक्षकाला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे करणाचा प्रस्ताव हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ‘नाते’ संपवणारा आहे. भविष्यात विद्यार्थ्यांकडे डोळे वटारून पाहायला देखील शिक्षकांना भीती वाटेल आणि त्यामुळे आपली नोकरी, प्रतिष्ठा वाचवण्यासाठी वर्गात खाली मान घालून पाठय़पुस्तकातील घटक शिकवण्याची नोकरी करणे एवढय़ापुरताच उत्साह शिक्षकांमध्ये राहील! |
पालिकेचे कामकाज थंडावले, पक्षसंघटनेत विस्कळीतपणा बाळासाहेब जवळकर नांदेड गाजवलेले डॉ. श्रीकर परदेशी िपपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी येताच त्यांनी धडाकेबाज सुरुवात केली, पण वेगाने कामे होऊ लागताच त्यांना प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जावे लागले. तेव्हापासून कामकाज एकदम थंडावले आणि पूर्वीप्रमाणेच कारभार दिसू लागला आहे. राजकीयदृष्टय़ा ‘सबकुछ’ असलेल्या राष्ट्रवादीतही प्रचंड विस्कळीतपणा आहे.. त्यामुळे अजित पवार यांनी शहराकडे लक्ष न देण्याची भूमिका घेतली की त्यांचे नियंत्रण राहिले नाही, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. |
प्रतिनिधी दागिने घ्यायचे तर सोन्याचेच असे म्हणणाऱ्या ग्राहकांची पावले आता सोन्याकडून प्लॅटिनमकडे वळू लागली आहेत. किमतीत सोन्याच्या तोडीस तोड असणारे प्लॅटिनम दिसायला चांदीच्या जवळचे असल्यामुळे प्लॅटिनमचे दागिने खरेदी करायला सामान्य ग्राहक कचरत असत. मात्र गेल्या काही वर्षांत सोन्यातही विविध रंगांचा ट्रेंड रुजल्यावर, व्हाईट गोल्ड अर्थात पांढऱ्या सोन्याला पर्याय म्हणून ग्राहक प्लॅटिनमला पसंती देत आहेत. |
प्रतिनिधी शहरातील सार्वजनिक वाहतूक, जकातीचे उत्पन्न आणि कचऱ्याचा प्रश्न या तीन विषयांवर सविस्तर विचार करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीची खास सभा शुक्रवारी बोलावण्यात आली आहे. स्थायी समितीच्या दर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत जकातीच्या उत्पन्नाचा तसेच पीएमपी कारभाराचा आणि कचरा प्रश्नाचा आढावा घेतला जातो. |
प्रतिनिधी एकिकडे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पुणे विद्यापीठाचे परदेशातील एकुलते एक असलेले दुबई येथील केंद्रही बंद होणार असल्याची चर्चा सध्या विद्यापीठात आहे. पुणे विद्यापीठाकडे मध्य आशियामधील विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी दुबई येथे विद्यापीठाचे केंद्र सुरू केले होते. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 18 |