सामान्य नागरिकांशीही संवाद साधणार प्रतिनिधी समतोल प्रादेशिक विकासाच्या कामांत येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती येत्या रविवारी (४ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येत आहे. विशेष म्हणजे सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनाही समितीशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. |
पिंपरी / प्रतिनिधी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच पिंपरी शहरात आलेले सचिन अहिर यांनी विद्यार्थिदशेपासून ते मंत्रिपदाचा प्रवास उलगडून सांगितला. इंजिनिअर असूनही गळय़ातील टाय उतरवून वेल्डरचे काम करावे लागले. मात्र, इच्छाशक्तीच्या जोरावर मंत्रिपदापर्यंत प्रवास करू शकलो, असे त्यांनी नमूद केले. |
प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने (एमएससीआरटी) शिक्षकांसाठी चालवला जाणारा पदविका अभ्यासक्रम (डीटीएड) अधिक शिक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी या अभ्यासक्रमासाठी दूरशिक्षणाचा पर्यायही एमएससीआरटीने उपलब्ध करून दिला आहे. |
प्रतिनिधी ‘‘संगीत नाटकांनी बदलत्या जगाचे संदर्भ लक्षात घेणे आणि आताच्या प्रेक्षकाला काय हवे आहे, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नाटय़रसिक घडवण्याच्या दृष्टीने आणि संगीत नाटकामध्ये प्रवाह आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे,’’ असे मत गोवा कला अकादमीचे अध्यक्ष, आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी बुधवारी व्यक्त केले. |
प्रतिनिधी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने महिला बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी भरवलेल्या ‘बचत बाजार’चे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. शहरात चार ठिकाणी असे बाजार भरविण्यात येत आहेत. बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वस्तुविक्रीचे कायमस्वरूपी आधार केंद्र उभारण्याची घोषणा या कार्यक्रमात आयुक्त महेश पाठक यांनी केली. |
पुणे जनहित आघाडीचा आरोप प्रतिनिधी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करताना विकास नियंत्रण नियमावलीत केलेले बदल बेकायदेशीर असून, जे अधिकार शहर सुधारणा समितीला नाहीत त्यांचा वापर करून २३ गावांवर प्रभाव टाकणाऱ्या उपसूचना समितीने आराखडय़ात केला, असा आरोप पुणे जनहित आघाडीच्या पूर्वा केसकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या वेळी विनय हर्डीकर आणि अनघा परांजपे-पुरोहित या वेळी उपस्थित होते. |
प्रतिनिधी ‘केसरी’ चे संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक ६ नोव्हेंबर रोजी एकसष्टाव्या वर्षांत पदार्पण करत असून त्यानिमित्ताने गौरव समितीच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. दीपक टिळक गौरव समितीचे अध्यक्ष मोहन धारिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. |
प्रतिनिधी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महापालिका शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या बचत गटांचे लाखो रुपये महापालिकेने गेले आठ महिने थकवले आहेत. हक्काची ही रक्कम मागणाऱ्या बचत गटातील महिलांना अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्याही तक्रारी करण्यात येत आहेत. |
अजितदादांच्या उपस्थितीत शनिवारी लोकार्पण पिंपरी / प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील एक एकर जागेत उभारण्यात आलेल्या शिव-जिजाऊ उद्यानात शिवसृष्टी साकारण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वपूर्ण प्रसंग आकर्षकरीत्या उभे करण्यात आले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे. |
मुकुंद संगोराम
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पुणे शहराचा २००७ ते २०२७ या वीस वर्षांसाठीचा विकास आराखडा पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आहे. पालिकेने आजवर आपल्याच नाठाळपणामुळे विकास आराखडय़ांकडे दुर्लक्ष केल्याने राज्य शासनाने आपल्या अधिकारात ते मंजूर करून टाकले.
|
पदभार घेतल्यानंतर सचिन आहिर यांची पहिलीच आढावा बैठक प्रतिनिधी पुणे शहरातील वाहतुकीची समस्या, पर्यावरण व आरोग्याच्या प्रश्नात लक्ष घालून त्याबाबतच्या विविध योजना मार्गी लावण्यावर जिल्ह्य़ाचे नवे पालकमंत्री सचिन आहिर भर देणार आहेत. |
नाटय़मयरीत्या ३८ कुटुंबे बचावली पिंपरी / प्रतिनिधी तळवडय़ात एका तीनमजली इमारतीला लागलेल्या आगीत जवळपास २५ ते ३० गाडय़ा जळून खाक झाल्या. रात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीची वेळीच माहिती न मिळाल्याने अडकून पडलेल्या ३८ कुटुंबांची चित्तथरारक पद्धतीने सुटका करण्यात नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. |
जबाबदारी झटकणाऱ्या मुलास न्यायालयाचा दणका प्रतिनिधी आई-वडिलांच्या म्हातारपणाची काठी समजल्या जाणाऱ्या मुलानेच साठ वर्षांच्या आईला मारहाण करून घरातून बाहेर काढले. अशा मुलाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. ‘आई-वडिलांचे पालनपोषण करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. |
पावणेदोन वर्षांत पावणेदोन टक्के प्रतिनिधी शहरातील तीन मार्गावर बीआरटीचे काम पावणेदोन वर्षांत फक्त पावणेदोन टक्के एवढेच झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो कोटी रुपये खर्च करूनही अद्याप प्रायोगिक तत्त्वावरच सुरू असलेल्या कात्रज ते हडपसर या बीआरटी मार्गाप्रमाणेच शहरातील अन्य मार्गावरील बीआरटी मार्गाचे कामही रडतखडतच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. |
प्रतिनिधी ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘तो मी नव्हेच’, ‘वटवट’ या नाटकातील भूमिकांसह पुलं, सुनीताबाई देशपांडे, डॉ. वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर, बेगम अख्तर, दादा कोंडके, सी. रामचंद्र, मदनमोहन, जयदेव अशा कला क्षेत्रातील दिग्गजांच्या आठवणींचा गोफ विणत लावणी, नाटय़संगीताची झलक पेश झाली आणि सुधीर गाडगीळ यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पांतून फय्याज यांची ‘नाटय़संपदा’ मंगळवारी उलगडली. |
स्थायी समितीत आरोग्य विभाग धारेवर पिंपरी / प्रतिनिधी डेंग्यूने सगळीकडे थैमान घातल्यानंतर उशिरा जाग आलेल्या पालिकेतील आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चांगलाच हल्लाबोल चढवला. नियोजनाचा अभाव व अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळेच डेंग्यूचा मोठय़ा प्रमाणात फैलाव झाल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. |
प्रतिनिधी जम्मू आणि काश्मीरमधली लष्करासाठी मोक्याची असलेली जागा.. जम्मू-अखनूर-पूँछ रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी.. आणि या समस्यांचे कारण असणारा चिनाब नदीवरचा अपूर्ण राहिलेला पूल. तीन दशकांहूनही अधिक काळ अपूर्ण राहिलेला हा चिनाब पूल पूर्ण करण्यासाठी वरून प्रचंड दबाव येऊ लागला आणि संबंधित अभियंत्यांच्या हातून देशातील एक आश्चर्यच उभे राहिले. |
प्रतिनिधी एल. टी. मारणे मेमोरियल फाउंडेशनतर्फे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांच्या हस्ते निवारा संस्थेस लक्ष्मणराव तुकाराम मारणे स्मृती समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. |
कसबा माता पुरस्कार नारळीकर यांना प्रदान अखिल कसबा पेठ श्री त्रिमूर्ती नवरात्र उत्सव समितीतर्फे देण्यात येणारा ‘कसबा माता पुरस्कार’ ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला. |
पण लोकजागृती अन् अंमलबजावणीचे काय? प्रतिनिधी ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२ शिक्षणातील गैरप्रकार आणि नफेखोरी रोखण्यासाठी कायद्यावर कायदे करण्याचा सपाटा शासनाने लावला आहे. शासनाने नुकतेच ‘प्रोहिबिशन ऑफ अनफेअर प्रॅक्टिसेस इन स्कूल्स २०१२’ प्रस्तावित विधेयक मांडले. काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या शिक्षण हक्क कायद्याबरोबरच अशा तरतुदी असेलेले काही कायदे सरकारने केले आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 5 of 18 |