नागपूर / प्रतिनिधी - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ विधवेलाही सासऱ्यांच्या मालमत्तेत हक्क असल्याचा निर्णय देऊन, एका विधवेचे नाव तिच्या सासऱ्याच्या मालमत्तेच्या नामांतरण अभिलेखात नियमबाह्य़रित्या समाविष्ट केल्याचा आरोप असलेल्या एका सर्कल ऑफिसरचे अपील मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. |
ज्योती तिरपुडे / नागपूर मराठी माणसाच्या संस्कृतीचे संचित असलेले साहित्य दिवाळी अंकांच्या रूपाने कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सोय ई-दिवाळी अंकांमुळे झाली आहे. नियतकालिक हाती घेऊन वाचण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर दिवाळी अंक वाचता येणे, अशा सोप्या शब्दात ई-दिवाळी अंकांची व्याख्या करता येईल. |
नागपूर/ खास प्रतिनिधी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीच्या ‘विदर्भरंग दिवाळी अंक २०१२’चे प्रकाशन उद्या, शनिवारी वेकोलिचे उप-व्यवस्थापक (जनसंपर्क) आशिष तायल आणि झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका व महाराष्ट्रातील पहिली महानाटय़ निर्माती आसावरी तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. |
नागपुरात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राम भाकरे /नागपूर एरवी वर्षभर शास्त्रीय संगीताच्या मैफिली किंवा मराठी हिंदी गीतांचे कार्यक्रम होत असले तरी गेल्या आठ- दहा वर्षांत लखलखत्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करणारा कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट.. गुलाबी थंडीत पहाटेच्या या सांगीतिक फराळाचा आस्वाद रसिकांना देण्यासाठी यंदाही शहरात विविध संस्थांच्या वतीने दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. |
नागपूर/प्रतिनिधी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या इसमाला सत्र न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.बाबुलाल वाघमारे (२७) असे आरोपीचे नाव असून तो कामनानगर येथील रहिवासी आहे. |
नागपूर / प्रतिनिधी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यातील विविध मतदारसंघांतील सामाजिक प्रश्नांबाबत येत्या दोन महिन्यात मेळावे आयोजित करून हे प्रश्न शासनाकडे मांडण्यात येतील, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. |
नागपूर / प्रतिनिधी अपघातग्रस्त ट्रकच्या नुकसानभरपाईपोटी विम्याच्या अंतिम दाव्याचा अहवाल सादर करण्यासाठी ट्रकमालकाकडून १० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या एका सव्र्हेअरला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दीड वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. |
नागपूर / प्रतिनिधी नवीन गॅस कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकास आता लगेचच सबसिडीचे सिलिंडर मिळणार नाही. ‘डी डुप्लिकेशन प्रोग्राम’नुसार तपासणी पूर्ण होऊन त्यातून क्लिअरन्स मिळेपर्यंत ९६६ रुपयेच सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत. |
नागपूर / प्रतिनिधी सद्भावना मिशन अंतर्गत काश्मिरातील २३ विद्यार्थी व चार शिक्षकांनी मेजर वीरेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रहार मिलिटरी स्कूलला भेट दिली. यावेळी प्रहार मिलिटरी स्कूलच्या बॅण्ड पथक, अश्वपथक व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. |
नागपूर / प्रतिनिधी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर १० व ११ नोव्हेंबरला नोंदणी करणाऱ्यांना ‘रेशीम बंध’ विवाह संस्थेतर्फे नोंदणीवर विशेष सूट देण्यात येणार आहे. ‘रेशीम बंध’ मॅरेज इन्फरर्मेशन सिस्टिम प्रा. लि. ने www.reshimbandh.com ही अद्ययावत वेबसाईट सर्व समाजांसाठी बनवलेली असून जगभरातील विवाहेच्छुक वधू-वरांच्या पालकांना जलद सेवा मिळण्यासाठी असलेल्या ऑनलाईन नोंदणी सुविधेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे, असे कंपनीच्या संचालिका कविता देशपांडे यांनी सांगितले. |
मनोज जोशी/नागपूर - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२ अतिशय आवश्यक असतानाही सुमारे पाच वर्षे काम रखडल्यामुळे गाजलेल्या बुटीबोरीच्या रेल्वे उड्डाणपुलावर एक वर्षांतच भगदाड पडल्यामुळे या पुलाच्या बांधकामाबाबत शंका निर्माण झाली आहे. |
नागपूर / प्रतिनिधी महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्य असणे अनिवार्य असल्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारितील निम्म्याहून अधिक महाविद्यालये नियमित प्राचार्यांशिवाय काम करत आहेत, तर कित्येक महाविद्यालयांमध्ये एकही नियमित अधिव्याख्याता नाही. |
नागपूर / खास प्रतिनिधी मानकापूर ते गोधनी रेल्वे मार्गावर प्रेमीयुगुलाने मध्यरात्रीनंतर रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या केलेला तरुण व तरुणी बुधवारपासून घरून बेपत्ता होते. रश्मी सुनील बावनगडे (रा. मॉडेल टाऊन, बेझनबाग) व अरमान उर्फ दीपक करमचंदानी (रा. हुडको कॉलनी) ही मरण पावलेल्यांची नावे आहेत. |
नागपूर / प्रतिनिधी अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी पाहता बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली असली तरी म्हणावी तशी ग्राहकी नसल्याने ग्राहकांची दुकानदार वाट पाहत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये आहे. |
नागपूर / प्रतिनिधी साहित्यात दिवाळी अंकांचा प्रवाह कायम असून दिवाळीनिमित्ताने अंक काढण्याची समृद्ध परंपरा आजही जोपासली जात आहे. दिवाळीत फराळ, मिठाई, फटाके यासोबतच दिवाळी अंकांची वाचकांकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी होत आहे. |
नागपूर / प्रतिनिधी भाजीवाल्याच्या सजगतेमुळे बनावट नोट चलनात आणू पाहणारे दोघे सक्करदरा पोलिसांच्या आयतेच हाती लागले. त्यांच्याजवळून ८७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. |
नागपूर / प्रतिनिधी जयप्रकाश नगरातील श्रीगुरुमंदिरात गुरुद्वादशीच्या पर्वावर येत्या ११ नोव्हेंबरला अखंड औदुंबर प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.येत्या रविवारी सकाळी साडेसहा वाजता सामूहिक संकल्पाचा उच्चार होऊन प्रदक्षिणा सोहळ्याला प्रारंभ होईल. |
नागपूर / प्रतिनिधी पाण्याच्या नादुरुस्त मीटरचा भरुदड ग्राहकांवर लादला जात असल्याचा आरोप करून २४ बाय ७ योजनेच्या नावाखाली महापालिकेकडून सुरू असलेली ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी केली. |
गुन्हे वृत्त नागपूर / प्रतिनिधी नागपुरातील दोन बडय़ा बिल्डरांच्या घरून कार चोरणाऱ्या एका आरोपीस पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्याने आधी आणखी चार चाकी वाहने चोरल्या असल्याची शक्यता असून चार चाकी वाहने चोरीस गेलेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पाचपावली पोलिसांनी केली आहे. |
नागपूर / प्रतिनिधी मराठी रंगभूमी दिनानिमित्त विदर्भ सांस्कृतिक आघाडी, प्रगतिशील लेखक मंच आणि धरमपेठचे राजाराम वाचनालय यांच्यावतीने एका चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन ११ नोव्हेंबरला करण्यात आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 1 of 16 |