उपराजधानी असुरक्षित खास प्रतिनिधी/नागपूर ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२ मोटारसायकलवर आलेल्या तीन लुटारूंनी चाकूचा धाक दाखवून ऑटो रिक्षातील कुरिअरच्या कर्मचाऱ्यासह दोघांना लुटल्याची घटना गजबजलेल्या जयस्तंभ चौकात मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास घडली. |
कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा नागपूर / प्रतिनिधी कोरडवाहू शेतीत शाश्वत सिंचनासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असून त्याची रूपरेषा तयार झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील ६९ शेतकऱ्यांना येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी कृषी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. |
नागपूर / प्रतिनिधी मध्य भारतामध्ये झुलता पूल म्हणून नागपुरात रामझुला आकार घेत असताना गेल्या सहा वर्षांपासून शासकीय आणि राजकीय नेत्यांच्या दिरंगाईमुळे अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात अडकलेला हा महत्त्वाचा पूल नागपूरकराच्या वाहतूक समस्येचे ओझे पेलण्यापूर्वीच डोकेदुखी ठरला आहे. |
म्हाडाच्या नवीन चंद्रपुरातील जमीन आरक्षणाने भूखंड व्यावसायिक हादरले नागपूर / प्रतिनिधी नवीन चंद्रपुरातील दाताळा, खुटाळा, कोसारा व पडोली येथील ३१० एकर जमीन महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) आरक्षित केल्याने जमीन व्यावसायिकांना जबर धक्का बसला आहे. |
नागपूर / प्रतिनिधी केंद्र सरकारने किरकोळ व्यापारात परकीय थेट गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने हा विषय जनतेच्या दरबारात नेण्याच्या दृष्टीने देशव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून नागपुरात खासदार विलास मुत्तेमवार यांच्या उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ अलीकडेच झाला. |
वर्षभरात एका कुटुंबाला सवलतीतील सहा सिलिंडर्स नागपूर/प्रतिनिधी एलपीजी गॅस सिलिंडरधारकांसाठी केवायसी (नो युवर कस्टमर) हा अर्ज भरून देण्याची मुदत आता १५ नोव्हेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना शोधून काढण्यासाठी हा अर्ज भरून घेतला जात असून यासाठी देशव्यापी मोहीम सुरू झाली आहे. |
शिक्षकांच्या प्रतिक्रिया नागपूर / प्रतिनिधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा केल्यास तीन वर्षे तुरुंगवास आणि इतर नियमावलीचे; शिक्षक आणि संस्थाचालकांनी स्वागत केले असून शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या आहेत. |
पोद्दारेश्वर ट्रस्टचा अखंड उपक्रम नागपूर / खास प्रतिनिधी सोमवारी रात्री शरद पौर्णिमेला शहरातील अनेक ठिकाणी नागरिक आटवलेल्या खास दुधाचा आस्वाद घेत असतानाच पोद्दारेश्वर राम मंदिरात जमलेले हजारो अस्थमा पीडित लोक भजन करीत खास औषधांचे सेवन करीत होते. |
नागपूर / प्रतिनिधी पोलीस कोठडीतील कैद्याच्या मृत्यूप्रकरणी पुसद येथील दोन आरोपी पोलिसांना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली असून दोघांच्या सुटकेचा आदेश दिला आहे. |
नागपूर / खास प्रतिनिधी एका शाळकरी मुलीने घरातील न्हाणीघरातल्या शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वर्धमाननगरातील एस. कृपा पॅलेसमध्ये सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.अलिशा कन्हैयालाल बजाज हे त्या मुलीचे नाव असून ती विद्यानिकेतन शाळेत दहावीत शिकत होती. |
नागपूर / प्रतिनिधी पूर्ती उद्योग समूहातील गुंतवणुकीवरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर उद्या, बुधवारी, ३१ ऑक्टोबरला विदर्भ शेतकरी शेतमजूर कृती समितीच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दुपारी १२ वाजेपासून विदर्भातील शेतक ऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. |
नागपूर / खास प्रतिनिधी सोसायटीचे पदाधिकारी भूखंड हडपण्याचा प्रयत्न करीत असून पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याने जिवाला धोका निर्माण झाल्याची तक्रार एका पीडित महिलेने केली आहे. सीमा गिरीश महाजन यांच्या पतीने १९८८मध्ये खामल्यातील प्रकाश गृहनिर्माण सोसायटीत एक भूखंड घेतला. |
नागपूर / खास प्रतिनिधी वेगात आलेल्या वाहनाच्या धडकेने आई-वडील व दोन मुली ठार झाल्या. उमरेड ते भुयार या मार्गावर भिवापूरपासून तेरा किलोमीटर अंतरावरील मानोरा येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. |
* राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर वैदर्भीय नेत्यांच्या हालचालींना वेग * दिल्लीवाऱ्याही सुरू * देवेंद्र गावंडे ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२ आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर आता विदर्भातील नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. विद्यमान मंत्री लाल दिवा टिकावा म्हणून, तर इच्छुक नेते लाल दिवा मिळावा म्हणून पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यात सध्या व्यस्त आहेत. |
सुदैवाने प्राणहानी नाही, पॅथॉलॉजी विभागाचा कोळसा नागपूर / खास प्रतिनिधी रामदासपेठमधील रेनबो रुग्णालयाला सोमवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीने तेथे धावपळ उडाली होती. रुग्णालयातील पॅथॉलाजी विभाग बेचिराख झाला. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र रुग्णालयाची मोठी आर्थिक हानी झाली आहे. |
प्रसारमाध्यमे आणि काँग्रेसवर गडकरी बरसले नागपूर/प्रतिनिधी
काही प्रसार माध्यमे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकरणाची शहनिशा न करता आरोपांची राळ उडवून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या बदनामीविरुद्ध कायदेशीर मार्गाने आणि जनतेला सोबत घेऊन लढाई लढणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला. |
गडकरींचे नागपुरात जंगी स्वागत नागपूर / प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज नितीन गडकरी यांचे विमानतळावर आणि महालमधील निवासस्थानी ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, हे दाखवून देण्यासाठी आज अचानक शक्तिप्रदर्शनाचा घाट घालण्यात आला. |
नागपूर / खास प्रतिनिधी घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी सुमारे अठरा लाखाचा ऐवज चोरून नेला. बारानल चौकातील शाहू मोहल्ल्यात रविवारी रात्रभरात ही चोरी झाली.माजी महापौर किशोर डोरले यांच्यावर शनिवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला. यातील आरोपी रज्जू शाहू याच्या घरी ही चोरी झाली. |
राममंदिर उभारणीच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार नागपूर/ खास प्रतिनिधी
राममंदिर उभारणीच्या मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकवार ऐरणीवर आणला असून २०१४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात याचा खुबीने वापर केला जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. रा.स्व. संघाच्या नागपुरातील रेशीमबाग मैदानावर झालेल्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राममंदिराचा राग आळवल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. |
नागपूर / प्रतिनिधी
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना जगण्याचे साधन मिळावे, लाभ क्षेत्रातील जागा मिळावी या मागण्यांसह विविध प्रकल्पग्रस्ताच्या समस्यांसंदर्भात गोसीखुर्द धरणावर डोंगा मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले.गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील आजूबाजूच्या गावातील प्रकल्पग्रस्त वैनगंगा नदीत संघटित झाल्यावर त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 6 of 16 |