|
नागपूर वृत्तान्त
* हेमामालिनीची उपस्थिती * साईबाबांवरील महानाटय़ आकर्षण नागपूर / प्रतिनिधी नागपूर सुधार प्रन्यासला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येत्या २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान तीन दिवसाचा रंगारंग सांस्कृतिक महोत्सव कस्तुरचंद पार्क मैदानात आयोजित करण्यात आला आहे. |
नागपूर / प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेच्या उत्तीर्णतेची पात्रता परीक्षेनंतर बदलण्यात आल्याच्या कृतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाला दाखलपूर्व नोटीस जारी केली आहे. |
नागपूर / प्रतिनिधी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणारी अलोट गर्दी दरवर्षी वाढतच चालली आहे. दीक्षाभूमीवर होणाऱ्या बांधकामांमुळे आतील जागा जसजशी आकुंचन पावत आहे तसतसे दसऱ्याच्या आदल्या दिवसापासून लोक रस्त्यांवर येऊन ठाण मांडत आहेत. त्यानंतर भोजनदान आणि इतर स्टॉल उभारलेले दिसून येत असल्याचे चित्र आहे. |
नागपूर / खास प्रतिनिधी लाच घेताना रंगेहाथ सापडलेला गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचा अधीक्षक अभियंता मदन मते याच्या निलंबनाचे आदेश दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही अद्याप आलेले नाहीत. |
नागपूर / प्रतिनिधी इंग्रजीशी वैर नाही. पण, इंग्रजीच्या कुबडय़ा घेऊन भावी पिढी कशी तयार होईल, असा सवाल उपस्थित करून असंस्कृतीचा अंध:कार हटवायचा असेल तर इंग्रजीच्या कुबडय़ा फेकून सु‘संस्कृत’ बनले पाहिजे, असे आवाहन निवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांनी केले. |
नागपूर / प्रतिनिधी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम.. रामायणातील विविध प्रसंगावर सादर केलेले नाटय़, फटाक्याची आतषबाजी, नयनरम्य लेझर शो आणि प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत शहरातील विविध भागात रावण दहनाचे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. सनातन धर्म सभेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कस्तुरचंद पार्क मैदानावर दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. |
उपराजधानी असुरक्षित नागपूर / खास प्रतिनिधी दाराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी ५४ हजाराचा ऐवज चोरून नेला. भेंडे लेआऊटमधील दत्तनगरात मंगळवारी सायंकाळी ही चोरी झाली. घरफोडय़ा-चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नसून यामुळे नागरिकांसह पोलीसही हैराण झाली आहेत. |
नागपूर / खास प्रतिनिधी दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक व मालक प्रकाश पोहरे यांची पोलीस कोठडी कळमेश्वर न्यायालयाने गुरुवारी एक दिवसाने वाढवून दिली. दरम्यान, पोहरे यांना न्यायालयात आणताच महिलांच्या एका गटाने त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. |
नागपूर / प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाची तयारी जोमात सुरू असून बौद्ध बांधवांचे येणे सुरू झाले आहे. उद्या, बुधवारी सायंकाळी ६ वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम दीक्षाभूमीच्या प्रांगणात होणार आहे. केरळचे माजी राज्यपाल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सु. गवई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री शिवाजीराव मोघे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, |
नागपूर / प्रतिनिधी
शहारात जानेवारी २०१२ पासून डेंग्यूचा प्रकोप झाला असून उत्तर नागपुरातील टेका, नई बस्ती, पंचशीलनगर, वैशालीनगर, सिद्धार्थनगर, वरपाखड, नारा, नारी, इंदोरा झोपडा, हरिजन कॉलनी, लुम्बिनी नगर, मुकुंदनगर, गौतमनगर, पिवळी नदी, समतानगर अशा झोपडपट्टी वसाहतीतील अनेक नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. |
नागपूर / प्रतिनिधी
दिवसेंदिवस महागाई वाढत असली तरी बाजारपेठेत विजयादशमीच्या मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. सोने व चांदीचे भाव वाढलेले असतानाही सराफा दुकानांमध्ये दागिने तसेच पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेले असले तरी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदीचा ग्राहकांचा उत्साह कायम आहे. शहरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठही सजली आहे. सणाचा लाभ घेण्यासाठी विविध कंपन्यांनी आणि त्यांच्या विक्रेत्यांनी उत्पादनांवर सूट तसेच काही आकर्षक योजना जाहीर केलेल्या असल्यामुळे ग्राहकांनीही वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. |
नागपूर / प्रतिनिधी
गंगाजल, अपहरण, राजनीती, आरक्षण, असे उत्कृष्ठ चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक प्रकाश झा आता नवीन विषय घेऊन ‘चक्रव्यूह’ सादर करीत असून उद्या २४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नक्षलवाद्यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांची जीवनशैली आणि त्यांना पत्करावा लागलेला मार्ग अशा विषयांचा यात समावेश आहे. या चित्रपटात अर्जून रामपाल, अभय देओल, ईशा गुप्ता, मनोज बाजपेयी, क बीर बेदी, ओम पुरी व मराठमोळी अंजली पाटील यांच्या भूमिको आहेत. |
नागपूर / प्रतिनिधी महाराष्ट्र कापूस पणन महासंघाशी चर्चा करून ताबडतोब कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘नाफेड’ने करार करावा, अशा सूचना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘नाफेड’ला दिल्या असून, ‘नाफेड’सोबत चर्चेची आमची बैठक सोमवारी झाली. लवकरच कराराचा मसुदा पणन महासंघासमोर नाफेड ठेवणार आहे, अशी माहिती कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांनी सोमवारी यवतमाळ येथे‘लोकसत्ता’ला दिली. |
नागपूर / प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगराच्या तरुण स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उद्या, बुधवारी सकाळी साडेसात वाजता रेशीमबाग मैदानावर साजरा होणार आहे. या उत्सवाला आर्ष विज्ञान संस्थेचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे कार्यक्रमात प्रमुख भाषण होणार आहे. |
नागपूर / प्रतिनिधी आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बघता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा फायदा घेत दीक्षाभूमी परिसरासह शहरातील विविध भागात मिळेल त्या जागी विविध राजकीय पक्षांची आणि नेत्यांची होर्डिग स्पर्धा रंगू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात पोस्टर आणि होर्डिंगचा सुळसुळाट झाला असून अनेक राजकीय पक्षांनी दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. |
नागपूर / प्रतिनिधी दसरानिमित्त शहरात कस्तुरंचद पार्क, चिटणीस पार्क, मेडिकल चौक, समर्थ नगरसह विदर्भातील विविध भागात २४ ऑक्टोबरला रावण दहनाच्या कार्यक्रमासोबत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, रामलीला आणि फटाका शो आयोजित करण्यात आला आहे. |
नागपूर / प्रतिनिधी नागपूर जिल्ह्य़ात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ११७ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला असून राष्ट्रवादी काँग्रेसने काटोल, नरखेड आणि काँग्रेसने उमरेड, भिवापूर, कुही ग्रामपंचायतीवर घवघवीत यश संपादन केले आहे. उमरेड तालुक्यात बेलामध्ये पूर्ती साखर कारखाना परिसरात भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. |
पुस्तके, कॅसेट आणि कॅलेंडर खरेदी जोरात नागपूर / प्रतिनिधी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमसैनिकांनी दीक्षाभूमी गजबजू लागली तशी आजूबाजूची बाजारपेठही गजबजू लागली आहे. देशभरातील धम्मबांधवांना दीक्षाभूमीचे खास आकर्षण पुस्तकांची असल्याने नागपुरातील दीक्षाभूमीवर दरवर्षी कोटय़वधी रुपयांची उलाढाल दसऱ्यादरम्यान होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने होत असते. |
नागपूर / खास प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांला शिक्षण घेणे सोयीचे जावे, या हेतूने राज्यातील विद्यापीठे कमीतकमी शुल्काची आकारणी करीत असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा शुल्क बघून गरीब विद्यार्थ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. नक्षलवादग्रस्त पूर्व विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्य़ात दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने जेमतेम एक वर्ष झालेले गोंडवाना विद्यापीठ कायम या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. |
* दसरा, दिवाळीसाठी बाजारपेठ सजली * डिझेल वाहनांकडे ग्राहकांचा कल दिलीप शेळके , नागपूर ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
दसरा व दिवाळी सणांसाठी बाजारपेठ सजली असून ऑटोमोबाईल्समध्ये मोठी उलाढाल होणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांची मोठा कल आहे. डिझेल वाहनांकडे यावेळी ग्राहक मोठय़ा संख्येने आकर्षित होत आहे. ऑक्टोबर महिन्यात नागपुरात आतापर्यंत ग्राहकांनी २ हजार ७८७ मोटारसायकल्स आणि १ हजार ६८३ कारची खरेदी केली असून या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झाली आहे.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 8 of 16 |
|
‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-
 
वासाचा पयला पाऊस आयला
साप्ताहिक पुरवणी
लोकरंग (दर रविवारी)
चतुरंग (दर शनिवारी)
वास्तुरंग (दर शनिवारी)
व्हिवा (दर शुक्रवारी
करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)
अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)
|