नागरिकांत चिंता, पोलिसांसमोर आव्हान किरण राजदेरकर , नागपूर शहरात गेल्या नऊ महिन्यात सहाशेहून अधिक घरफोडय़ा तर दीड हजाराहून अधिक चोऱ्या झाल्या असून रोज सरासरी एक घरफोडी होत आहे. ‘उदंड जाहल्या चोऱ्या’ असेच म्हणण्याची वेळ नागरिकांसह पोलिसांवरही आली आहे.
|
‘पैसे मोजा रक्त घ्या’ नवे घोषवाक्य नागपूर / प्रतिनिधी ‘रक्तदान-श्रेष्ठदान’ या घोषवाक्याचा जनजागृती कार्यक्रमातून प्रचार केला असला तरी प्रत्यक्षात मात्र, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आलेल्या गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी वणवण भटकावे लागत आहे. ‘पैसे मोजा आणि रक्त घ्या’ या नव्या घोषवाक्याची दलालामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंमलबजावणी केली जात आहे. |
अधिवक्त्यांसाठी विद्यापीठाची जाहिरात नागपूर / प्रतिनिधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठने न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अधिवक्तयांसाठी जाहिरात देऊ केली असून अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या कायदेशीर सल्लागार पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. |
* नव्या संशोधनातील इशारा * निसर्गचक्रच बदलतेय विक्रम हरकरे , नागपूर ‘ग्लोबल वार्मिग’मुळे समुद्री जलचर आणि अन्य प्राणी प्रजातींच्या जीवनचक्रात आश्चर्यकारक बदल होत आहेत. ‘ग्लोबल वार्मिग’ ने प्राण्यांचे पुनरुत्पादन आणि अधिवास यावर होत असलेले गंभीर परिणाम आता पर्यावरणतज्ज्ञांच्या चिंतेचा विषय झाले आहेत. |
नागपूर / प्रतिनिधी चाकोरी पद्धतीने जीवन न जगता वेगळया वाटेने प्रवास करणाऱ्या चार ‘आयकॉन’ने यशाचे शिखर गाठताना केलेल्या संघर्षांची गाथा मुक्त संवादातून उलगडली. |
देवीचा महिमा नागपूर / प्रतिनिधी
आदीशक्ती देवी
पूर्व नागपुरातील जुन्या नंदनवन परिसरात असलेल्या आदिशक्ती दुर्गा मंदिरात नवरात्र उत्सव सुरू असून दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. विविध जाती-धर्माचे लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. |
नागपूर / प्रतिनिधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र व पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अंबाझरी पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी विविध विद्यार्थी संघटनांची भूमिका संशयास्पद आणि श्रेय लाटणारी ठरली. |
शहरात रामलीला आणि फटाका शो नागपूर / प्रतिनिधी दसरानिमित्त शहरात कस्तुरंचद पार्क, चिटणीस पार्क, मेडिकल चौक, समर्थ नगरसह विदर्भातील विविध भागात २४ ऑक्टोबरला रावण दहनाच्या कार्यक्रमासोबत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, रामलीला आणि फटाका शो आयोजित करण्यात आला आहे. |
नागपूर / प्रतिनिधी श्रीगुरुमंदिर नागपूर प्रणित अकोला येथील विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्राच्यावतीने साधकांचे तीन दिवसांचे राज्यस्तरीय आध्यात्मिक शिबीर अकोला येथे २६ ते २८ ऑक्टोबपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. |
नागपूर / प्रतिनिधी मुलीला मारण्यावरून दोन कुटुंबात मारमारी होऊन त्यात तिघे गंभीर जखमी झाले. पूर्व नागपुरातील अंतुजीनगरात रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. |
नागपूर / खास प्रतिनिधी वेगात आलेल्या स्टार बसच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी झाला. त्यामुळे संतप्त जमावाने बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पंचशील चौकात हा अपघात घडला. जनता चौकाकडून झाशी राणी चौकाकडे एक पादचारी जात होता. |
नागपूर / प्रतिनिधी भारतीय स्त्रीशक्तीच्या नागपूर शाखेच्यावतीने खुल्या गटासाठी ताराबाई किन्हीकर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांसाठी खुली आहे. वक्तृत्व स्पर्धा हिंदी व मराठी भाषेत होईल. |
दिलीप शेळके नागपूर, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सारे होरपळून निघत असताना यावर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बायोगॅस हाच एक सशक्त पर्याय आता उपलब्ध आहे. जंगलतोड थांबावी, वन संरक्षण व्हावे आणि ग्रामीण भागातील इंधनाची समस्या सुटावी या हेतूने बायो अथवा गोबर गॅस प्रकल्प उभारणीसाठी प्रोत्साहन म्हणून सरकारने हा प्रकल्प उभारणाऱ्यांना अनुदानही सुरू केले आहे. अलिकडच्या काळात यांत्रिक शेती होऊ लागल्याने पशुधन कमी होत आहे. |
क्षुल्लक वादातून प्रकरण प्रतिनिधी/ नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यपीठाच्या गुरुनानक भवनाजवळच्या पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अंबाझरी पोलिसांनी लाठय़ाकाठय़ांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांच्य धमकीचे वसतिगृहातील अनेक विद्यार्थी बिथरले असून जखमी विद्यार्थी काहीही बोलायला तयार नाहीत. |
सात वर्षे जुन्या प्रकरणाला आयएसीची ‘फोडणी’ मनोज जोशी/नागपूर पूर्ती साखर कारखान्यासाठी खुर्सापार येथील शेतकऱ्यांची जमीन बळकावण्यात आली, या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपामुळे तात्पुरता धुराळा उडला असला, तरी हा व्यवहार कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच झाल्याचे विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उघड होते. |
नागपूर / प्रतिनिधी झोपडपट्टय़ात सर्रास गैरप्रकार घडत असताना वर्षांनुवर्षे निवडून येणारे लोकप्रतिनिधी करतात काय? असा सवाल करून स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सीमा साखरे यांनी खारदार विलास मुत्तेमवार, भाजपाध्य नितीन गडकरी, पालकमंत्री शिवाजीराव मोघे आणि महापौर अनिल सोले यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. |
अरुण गवळीचे आगमन आणि गमन.. नागपूर / प्रतिनिधी शिवसेनेचे नगरसेवक जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी कुख्यात डॉन अरुण गवळीला सुरक्षेच्या कारणावरून गुरुवारी सायंकाळी ठाण्याच्या तळोधा कारागृहातून नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. |
नागपूर / प्रतिनिधी नवरात्रोत्सव निमित्त शहरातील विविध भागात गरबा-दांडिया उत्सवाची धूम सुरू झाली आहे. पूर्वी गरबा-दांडियासाठी डीजेचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात होती. |
नागपूर / प्रतिनिधी महावितरणने औद्योगिक वीज दरात ४० टक्के वाढ केल्याच्या विरोधात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने २५ ऑक्टोबरला विदर्भात ‘उद्योग बंद’चे आवाहन केले आहे. |
नागपूर / प्रतिनिधी सेटअप बॉक्समुळे केबल टीव्ही बंद पडणार असल्याची अफवा डीटीएच कंपन्यांद्वारे पसरवली जात असून या अफवा निव्वळ केबल टीव्ही बंद पाडण्यासाठी पसरवल्या जात असल्याचा निर्वाळा नागपूर जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशनने दिला आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 16 |