नागपूर / खास प्रतिनिधी आग्याराम देवी चौकातून जात असलेल्या एका मेणबत्ती व्यापाऱ्याच्या डोळ्यात तिखट फेकून त्याला लुटणाऱ्या पाच आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. संतोष शिवप्रसाद अग्रवाल (रा. रतन कॉम्प्लेक्स) हे त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडरने घरी जात असता लुटारूंनी त्यांच्या डोळ्यात तिखट फेकून त्यांच्याजवळील बॅग हिसकावून पळून गेले. त्यात २ लाख ५७ हजार रुपये होते. |
‘मॉईल’च्या नव्या अध्यक्षांनी पदभार स्वीकारला नागपूर /प्रतिनिधी खनिज उत्पादन दुपटीने वाढविण्याचे लक्ष्य असून त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मँगनीज ओअर इंडिया लिमिटेडचे (मॉईल) नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जी.पी. कुंदरगी यांनी सांगितले. ‘मॉईल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून जी.पी. कुंदरगी यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. विविध विभागातील अधिकाऱ्यांनी कार्यालयात त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. |
‘यूपीएससी’ परीक्षेत विदर्भात प्रथम नागपूर /प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाने सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्स (सीएपीएफ)च्या असिस्टंट कमांडंटपदासाठी ऑक्टोबर २०११मध्ये घेतलेल्या परीक्षेत नागपुरातील स्वच्छंद चव्हाण विदर्भात प्रथम आला आहे. या परीक्षेत उत्तीण झालेल्या ५६७ विद्यार्थ्यांमध्ये त्याला ९९ गुणानुक्रमांक मिळाला आहे. या परीक्षेत नागपूरचाच दीपक गुरवे उत्तीर्ण झाला असून त्याचा गुणानुक्रमांक १९५ आहे. |
नागपूर /प्रतिनिधी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने लक्षवेधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. |
नागपूर /प्रतिनिधी जैन कलार सेवा समितीच्यावतीने ‘प्रयास २०१२’ अंतर्गत विशेष गौरव, समाज गौरव, समाज वैभव व समाज भूषण पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. अशोक खानोरकर यांना समाज भूषण, डॉ. कीर्तीकुमार रणदिवे यांना समाज वैभव, रामगोविंद खोब्रागडे, मासुरकर, शेंद्रे, डेंगे, किरणापुरे यांना समाज गौरव पुरस्कार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. |
भाजपच्या बडय़ा नेत्यांची अनुपस्थिती खटकली नागपूर / खास प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
गडकरी व पर्यायाने शेतकऱ्यांना त्रास द्याल तर खबरदार, असा इशारा बुधवारी रेशीमबाग मैदानावर आयोजित शेतकरी, शेतमजूर कृती समितीच्या मेळाव्यात वक्तयांनी दिला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर गैरप्रकाराचे आरोप होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर विदर्भ शेतकरी, शेतमजूर कृती समितीने गडकरींच्या समर्थनार्थ हा मेळावा आयोजित केला होता. |
* पक्षांतर्गत विरोधक सक्रिय * कायदेशीर लढाईचा पेच नागपूर / खास प्रतिनिधी संघ आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ढाल केली असली तरी भाजपाध्यक्ष नितीन गडकरींना सुरू झालेल्या पक्षांतर्गत विरोधाची तीव्रता वाढत चालली आहे. महाराष्ट्रातील त्यांच्या काही विरोधकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केल्याने गडकरींची अवस्था बिकट झाली आहे. |
* १५ लाखांपैकी अनेकांचे पत्ते संदिग्ध * कागदपत्रे दाखवल्यावरच सिलिंडर * एकापेक्षा जास्त नोंदणी? मग केवायसीचा अर्ज भरा नागपूर / खास प्रतिनिधी हिंदुस्थान पेट्रोलियमचे विदर्भात १५ लाख गॅस ग्राहक असून आता नव्या नियमानुसार संदिग्ध पत्ता असलेल्या २ लाख ग्राहकांची नोंदणी गोठवण्यात आली आहे. या ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच त्यांना सुरळीत गॅस पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ धर यांनी आज चंद्रपुरात पत्रकार परिषदेत दिली. |
आज फैसला नागपूर / प्रतिनिधी चिपळूण येथे पुढील वर्षी होऊ घातलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदारांचा अनुत्साह दिसत असला तरी महामंडळाच्या घटक संस्थांपैकी एक असलेल्या विदर्भ साहित्य संघाने घोषित केलेल्या मतदार यादीतील ७५ टक्के मतदारांनी मतपत्रिका पाठवून उत्साह दाखवला आहे. |
नागपूर / प्रतिनिधी रेल्वेचे निश्चित (कन्फम्र्ड) आरक्षण मिळणे ही हल्ली अशक्यप्राय बाब झालेली आहे. मात्र रेल्वे गाडय़ांमधील तत्काळ आरक्षणाबाबत अनेकांना माहिती नसते. अनेक गाडय़ांना बराच मोठा तत्काळ कोटा असून प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. |
मनोज जोशी / नागपूर राज्यातील अध्यापक विद्यालयांमधून उत्तीर्ण होणाऱ्या बेरोजगार शिक्षकांची दरवर्षी भरमसाठ संख्येने भर पडत असल्याने यापुढे नवीन अध्यापक विद्यालयांना संलग्नता न देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. |
नागपूर / प्रतिनिधी आपला मृत पती निर्दोष होता, हे सिद्ध करण्यासाठी पत्नीने त्याच्यावतीने गेली ७ वर्षे दिलेल्या लढय़ाला यश आले असून, उच्च न्यायालयाने तिला न्याय दिला आहे. |
विदर्भरंग दिवाळी अंकाची वाचकांना प्रतीक्षा नागपूर / प्रतिनिधी मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या दिवाळी अंकांचे वेध समस्त महाराष्ट्रीयांना लागले आहेत. दिवाळीचा फराळासोबत वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या दिवाळी अंकांचा आस्वाद घेणे ही मराठी माणसांची खासियत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाची वैचारिक लिखाणाची परंपरा ‘लोकसत्ता’च्या विदर्भरंग दिवाळी अंकात कायम ठेवण्यात आली आहे. |
नागपूर / प्रतिनिधी मध्य रेल्वे आणि नागपूर महापालिका यांच्यात नुकत्याच झालेल्या समन्वय बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. |
नागपूर / खास प्रतिनिधी नागपूर शहरात खळबळ माजविणाऱ्या बुधवारच्या दोन्ही लुटमार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांना अजूनही छडा लागलेला नाही. जयस्तंभ चौकात मंगळवारी सकाळी कुरिअर कर्मचाऱ्याकडून एकूण १ कोटी ५७ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने लुटण्यात आले होते. अकोल्याच्या एका व्यापाऱ्याचे ६८ लाख रुपयांचे दागिने यात होते. |
राज्य मंत्रिमंडळाचा शाळा-महाविद्यालयांना दिलासा नागपूर / प्रतिनिधी मार्च २०१३ पासून वेतनाच्या पाच टक्के वेतनेतर अनुदान शाळा-महाविद्यालयांना देण्याच्या निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि इतर संघटनांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून वेतनेतर अनुदान देणे शासनाने बंद केले होते. |
नागपूर / प्रतिनिधी अवघ्या दोन-तीन दिवसांच्या एका अनाथ मुलीला इंदोरा येथील बालआश्रय संस्थेत दाखल करण्यात आले असून तिच्या पालकांचा शोध लागलेला नाही. |
नागपूर / प्रतिनिधी मँगनीज कोअर इंडिया लिमिटेडचे (मॉईल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जी.पी. कुंदरगी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते उद्या गुरुवारी, १ नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार आहेत. |
नागपूर / खास प्रतिनिधी पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने येत्या ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसांचा लेखिका नाटय़महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सलग तीन दिवस दररोज सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या नाटय़महोत्सवात तीन नाटके सादर केली जाणार आहेत. |
नागपूर / प्रतिनिधी एल अॅण्ड टी फायनांशियल सव्र्हिसेस आणि बनयान ट्रीच्या वतीने ‘स्वर म्युझिक फॉर लाईफ’ हा कार्यक्रम २ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 5 of 16 |