नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


शहरात गॅस सिलिंडरची टंचाई अन् रॉकेल झाले मिळेनासे Print E-mail

राम भाकरे
केंद्र सरकारने वर्षांला केवळ सहा सिलिंडर मिळणार असल्याचे जाहीर करताच विदर्भात विविध गॅस एजन्सीकडे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन दिवसात मिळणाऱ्या सिलिंडरची ग्राहकांना वीस ते पंचवीस दिवस वाट पहावी लागत आहे. एकीकडे वेळेवर सिलिंडर मिळत नाही, तर दुसरीकडे रॉकेलसाठीही नागरिकांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र शहरात आहे.

 
मध्य नागपूर विकास आघाडीचे रस्त्यासाठी धरणे Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
मध्य नागपूर विकास आघाडीच्यावतीने रस्त्याच्या मागणीसाठी तीन नल चौकात धरणे देण्यात आले. मेयो रुग्णालयापासून जुना भंडारा मार्गापर्यंत ६० फुटांचा रस्ता करण्याची मागणी मध्य नागपूर विकास आघाडीने केली आहे.
मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष भूषण दडवे, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र पैगवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी धरणे दिली.

 
‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर ६० दिवसात निकाल देणे बंधनकारक’ Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांनी साध्या कागदावर लिहून दिलेल्या समस्येवर उपविभागीय अधिकाऱ्यास ६० दिवसात निकाल देणे बंधनकारक असल्याची माहिती ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश व जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली.

 
‘स्त्री भ्रूण हत्या थांबविण्याची जबाबदारी प्रत्येक समाजाची’ Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
देशात मुलींची संख्या घटत चालली आहे. देशातील प्रत्येक समाजाच्या नागरिकांनी स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे विचार डॉ. रेशमा मेघे यांनी व्यक्त केले. विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्यावतीने स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनजागरण मोहिमे अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. स्त्री भ्रूण हत्या थांबविण्याची जबाबदारी सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवी, असे डॉ. मेघे म्हणाल्या.

 
छत्तीसगड पोलिसांसमोर ३ जहाल नक्षलवादी शरण Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
वरिष्ठ नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला त्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील एका महिलेसह तीन जहाल नक्षलवाद्यांनी छत्तीसगड राज्यातील राजनांदगावचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे. या नक्षलवाद्यांमध्ये एरिया समिती सदस्य दिना उईके, धानोरा एलओएस कमांडर मुरली हिडामी व शांतीलाल यांचा समावेश आहे.  सलग दहा वर्षांंपासून हे तिघेही नक्षलवादी चळवळीत सक्रीय होते.

 
<< Start < Prev 61 62 63 64 Next > End >>

Page 63 of 64