नाशिक / प्रतिनिधी नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशन (नासा) वतीने दोन ते चार नोव्हेंबर या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या सहकार्याने ‘गल्फ डर्ट ट्रॅक’ या दुचाकी वाहनांच्या राष्ट्रीय स्पर्धेची चौथी आणि पाचवी फेरी होणार आहे. |
नाशिक / प्रतिनिधी नवरात्रोत्सवानिमित्ताने नाशिकची ग्रामदेवता असलेल्या कालिका देवीच्या यात्रेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सालाबादप्रमाणे यंदाच्या यात्रोत्सवातही विविध खेळण्यांसह विविध साहित्य विक्रीसाठी आले आहे. |
नाशिक / प्रतिनिधी किशोरवयीन मुलींना जीवन कौशल्य व प्रशिक्षण, लैंगिक शिक्षण देणे, यासंदर्भात गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने सातपूर कॉलनीतील मनपा माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात अजिता गानू यांनी मार्गदर्शन केले. |
बालनिरीक्षणगृहात नवरात्रोत्सव नाशिक येथील महिला व बालविकास आयुक्तालय जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित मुलामुलींच्या निरीक्षणगृह व बालगृहात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून २४ ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव होईल. या वेळी विविध मान्यवरांच्या हस्ते उत्सव काळात आरती करण्यात येणार आहे. |
चार महिन्यात चार हजार वाहनधारकांकडून दंड नाशिक / प्रतिनिधी - शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
काळ्या काचा असणाऱ्या वाहनांविरोधातील कायदा अस्तित्वात असताना आता सर्वोच्च न्यायालयाने नवीन काही सूचना केल्याने कारवाईस अधिक वेग आला आहे. शहर वाहतूक शाखेने अशा वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून वर्षभरात शहर व परिसरात एक लाख १६ हजारांहून अधिक वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमोर एक कोटी ४८ लाख रुपये एवढे तडजोड शुल्क जमा झाल्याची माहिती वाहतूक पोलीस (उपायुक्त) संजीव ठाकूर यांनी दिली. |
प्रतिनिधी / नाशिक व्यापाऱ्याचे अपहरण करून चार लाखाची खंडणी वसूल करण्यासाठी मारहाण व दमदाटी केल्यावरून नाशिकरोड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका संशयितास अटक करण्यात आली असून खासगी सावकारीतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. |
नाशिक / प्रतिनिधी १९८५ च्या सुमारास जिल्हा परिषदेकडे हायस्कूल ग्राऊंडचा ताबा देण्यात आला, तेव्हांच त्यामागील हेतूबद्दल शंका व्यक्त करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचा शहरातील खेळांशी काय संबंध, हे कधीच स्पष्ट करण्यात आले नाही. शॉपिंग काँम्प्लेक्स बांधणे हाच त्यामागील हेतु होता, हे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नंतर उघड झाले. शासकीय कन्या विद्यालयाशी हे मैदान निगडीत असल्याने कायद्याचे सोईस्कर खेळ करून त्यावेळचे शासन व प्रशासन यांनी तरीही मैदान जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेच. |
नाशिक / प्रतिनिधी नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम शाळेत पालक शिक्षक संघातर्फे आयोजित आजी-आजोबा मेळाव्यास प्रतिसाद मिळाला. आजी-आजोबांनी, नातवंडांनी तयार केलेल्या वर्गनिहाय विविध गुणदर्शन प्रदर्शनाला भेट देऊन त्यांचे कौतुक केले. त्यानंतर नाशिकमधील कलाक्षितिज मंडळाच्या विक्रांत जोशी यांच्या गायन मैफलीत ते रंगले. |
अनिकेत साठे सिंहस्थ कुंभमेळा प्रत्यक्षात अजून लांब असला तरी त्याचे वारे वाहू लागले आहेत. या महाकुंभासाठी नाशिक किती अन् कसे सजणार, याची आराखडेबद्ध चर्चा होत असताना अवकाशात अकस्मात धुमकेतू चमकावा, तव्दत संपूर्ण जिल्हा महाकुंभापूर्वी घटकाभर का होईना अचानक ‘नेत्रदीपक’ पद्धतीने चमकल्याचे पहावयास मिळाले. तुम्ही कोणत्याही मार्गाने जिल्ह्याच्या वेशीतून आतमध्ये प्रवेश करा, तुमचे स्वागत आमच्या वाढदिवसांच्या फलकांनी नाही झाले तर विचारा, इतका कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह ओसंडून वहात होता. |
नाशिक / प्रतिनिधी रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांच्या जमावाने परिचारिकांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करून गोंधळ घातल्याचा प्रकार ताजा असताना एकाच कक्षात उपचार घेणाऱ्या दोन कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या घटनेनंतर एका कैद्याने आपली तक्रार नसल्याचा अर्ज पोलिसांत दिला. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु, या घडामोडींमुळे उपचार घेणारे इतर रुग्ण, उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नाहक अस्वस्थता वाढली आहे. |
नाशिक / प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित वेटलिफ्टिंग स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर निफाड तालुक्यातील मौजेसुकेणे येथील के. आर. टी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय व राज्य पातळीवर निवड झाली आहे. अक्षर गांधीने ८५ किलो तर अविनाश मानेने ६९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. |
नाशिक / प्रतिनिधी, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२
उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्य़ांसाठी प्रस्तावित मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचे आरक्षण कायम असताना १९९५ पासून प्रलंबित असलेला भूसंपादन प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी मंजूर विकास काम योजनेच्या सव्र्हे नंबर ७५० पैकी (योजना क्रमांक दोनमधील भूखंड क्रमांक ५४१ आरक्षण क्रमांक ३६१) ३० हजार चौरस मीटर क्षेत्र हे आरक्षित दाखविण्यात आले आहे. त्यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. |
नाशिक / प्रतिनिधी
अंमली पदार्थविरोधी अभियान चालू केलंय प्रशासनानं गुटखा विक्रीवर आली हो बंदी बंद झालीया हो त्यांची दुकानं राज्य शासनाने अलीकडेच घेतलेल्या गुटखाबंदी निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर, राज्यभर पोवाडय़ांच्या माध्यमातून जनजागृती.. छुप्या पद्धतीने येणाऱ्या गुटख्याला रोखण्यासाठी शेजारील राज्यांना साकडे..नव्याने लागू झालेल्या अन्न सुरक्षा कायद्याच्या बदललेल्या स्वरूपाविषयी प्रसारमाध्यमांना अवगत करण्यासाठी अभ्यासवर्ग.. आणि शाळांमध्ये केलेली गुटख्याची प्रतीकात्मक होळी.. |
अविनाश पाटील
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी शासकीय पातळीवरून जे थोडेफार प्रयत्न होत आहेत, त्या प्रयत्नांना साथ देण्याऐवजी खोडा घालण्याचेच प्रयत्न काही मंडळींकडून जाणीवपूर्वक केले जात आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या वादाचे उदाहरण त्यासाठी देता येईल. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेले हे मैदान पुन्हा ताब्यात घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. |
चारुशीला कुलकर्णी
युवतींचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे कार्य, व्यापक व प्रभावी करण्यासाठी खुद्द खासदार सुप्रिया सुळे कितीही आग्रही आणि प्रयत्नशील असल्या तरी त्यांच्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून त्यांना हवी तशी साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील विद्यार्थिनींना रोडरोमिओ व टारगटांकडून होणाऱ्या त्रासाचा मुद्दा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित झाल्यानंतर अशी कोणतीही तक्रार असल्यास युवतींनी शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुळे यांनी केले होते. |
नाशिक / प्रतिनिधी शहरातील औद्योगिक क्षेत्रात ‘एमएसईडीसीएल’च्या वतीने ऑगस्टपासून औद्योगिक वीज बिलामध्ये भरमसाट वाढ करण्यात आल्याने उद्योजकांमध्ये नाराजी असून, ही वाढ कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा)च्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. |
नाशिक / प्रतिनिधी नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्या वतीने रविवारी खुल्या पुरुष व महिला गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे. |
नाशिक / प्रतिनिधी विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक ४९ टक्के करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात येथील गोळे कॉलनीतील शाखांच्या विमा कर्मचारी संघटनेने निदर्शने केली. |
नाशिक / प्रतिनिधी जागतिक अन्न दिनी १६ ऑक्टोबर रोजी पंचवटीतील पं. पलुस्कर सभागृहात जय किसान शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. संजय जाधव यांनी दिली. |
नाशिक / प्रतिनिधी येथील अग्रवाल सभेच्या वतीने महाराजा श्रीअग्रसेन जयंती महोत्सवानिमित्त १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांसह स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात शनिवारी दुपारी तीन वाजता स्प्लेंडर हॉलमध्ये होणार असल्याची माहिती सभेच्या वतीने देण्यात आली. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 10 of 14 |