नाशिक / प्रतिनिधी दिवाळी तोंडावर आली असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत कार्यरत ग्रामरोजगार सेवकांचे थकीत मानधन व मजुरी त्वरित मिळावी, अशी मागणी आयटकच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. थकीत मानधन त्वरित न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाचा इशारा या वेळी आयटकतर्फे देण्यात आला. |
नाशिक / प्रतिनिधी शिक्षणातून शांततेचे संस्कार आणि शांततेची गरज, याविषयी शहरातील सिडको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि नागपूरचे भारतीय शांतता केंद्र यांच्या वतीने रासेयोच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय दोन दिवसीय शांती शिक्षण कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले. |
नाशिक / प्रतिनिधी दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर विश्वातील सर्वाधिक विशाल आकाशकंदिलाची निर्मिती करण्याचा निर्णय येथील प्रसाद पवार फाऊंडेशनने घेतला आहे. येथील इदगाह मैदानावर या कामास सुरुवात झाली असून अनंत कान्हेरे मैदानावर ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हा आकाशकंदील नागरिकांना पाहावयास मिळेल, असे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. |
चारुशीला कुलकर्णी अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजा महागाईच्या तडाख्यात सापडल्या आहेत. इंधनास त्याची सर्वाधिक झळ बसली असल्याने अनेकांनी पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधनांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सौर ऊर्जेसह अन्य पर्यायांचा सध्या गांभीर्याने विचार सुरू आहे. |
नाशिक / प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
‘इनमीन आठ महिन्यांचा कालावधी नाही झाला अजून तर लगेच झाला सुरू तुमचा कंठशोष. अरे, काम करायला काही वेळ देणार आहात की नाही?, निवडणुका लागल्याने तेव्हा गेलो अंमळ जास्त आश्वासने देऊन. पण, तोच धागा पकडून तुम्ही एकसारखे तुणतुणे वाजविणार असाल तर तुमच्यासमोर काही न बोललेले बरे..!’ |
चारूशीला कुलकर्णी
‘स्वप्नांच्या पायरीवरती दिव्याचा प्रकाश पसरू दे समृध्दीच्या हवेवरती आकाशकंदील झुलू दे.. किंवा तुझ्या मैत्रीचं नातं या दिवाळीसारखंच आहे आनंद व सौख्याची उधळण करणारं. |
नाशिक / प्रतिनिधी
प्रत्येक जिल्ह्यात बांधकाम कामगारांची मंडळे स्थापन करावी, बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना सेवापुस्तिका द्यावी, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना २० टक्के बोनस द्यावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सीटू संघटनेच्यावतीने येथील कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. बांधकाम क्षेत्र व या कामाशी निगडीत कल्याणकारी योजनांची अमलबजावणी करण्यासाठी कामगार खात्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. |
नाशिक / प्रतिनिधी जळगाव येथील सहकारी संस्थेतील सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी दुग्ध विकास अधिकारी कार्यालयातील सहकारी संस्थेच्या सहायक निबंधकास मंगळवारी तक्रारकर्त्यांकडून पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. जळगाव येथील भाईराज मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या १२ सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सहकारी संस्थेच्या दुग्ध विकास अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.
|
कारवाईच्या नावाने बोंब पर्यावरण स्नेही नाशिक / प्रतिनिधी
दीपावली म्हणजे प्रकाशोत्सव..फटाक्यांची आतिषबाजी..भारतीय संस्कृतीमधील ‘सणांचा राजा’ म्हणून महत्व असलेल्या दीपावलीत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास आनंदाच्या या सणाचे रूपांतर दु:खातही होऊ शकते. फटाके विक्री करण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांची यादी बघितल्यास विक्रेत्यांनी त्यातील काही नियमांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे. |
नाशिक / प्रतिनिधी शहरातील त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल येथे सातत्याने अपघात होत असल्याने या चौकात सिग्नल बसविण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. |
नाशिक / प्रतिनिधी येथील शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी समाजातील क्रांतिकारक, शहिदांच्या जीवनावर आधारित व आदिवासी समाजाचे अभ्यासक डॉ. कांतिलाल टाटिया लिखित सातपुडय़ातील आदिवासींचा दडलेला स्वातंत्र्यसंग्राम ‘रावलापाणी’ या पुस्तकाचे प्रकाशन ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता येथील कुसुमाग्रज स्मारकात करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमोद गायकवाड यांनी दिली. |
नाशिक / प्रतिनिधी महिला सबलीकरणाच्या उद्देशाने आयोजित केलेले महिला उद्योजिकांचे ‘प्रेरणा २०१२’ प्रदर्शन हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या वतीने आणि महापालिकेच्या सहकार्याने आयोजित प्रेरणा २०१२ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. |
नाशिक / प्रतिनिधी येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कौशल्य, ज्ञान, वागणूक, संकल्पना या सर्वामध्ये ग्रंथालयाची महत्त्वाची भूमिका पटवून देण्यासाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. |
नाशिक / प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात ‘साजरी करू या दिवाळी निराधार-निर्धनांसमवेत’ या लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच व साप्ताहिक ‘लोकज्योती’ च्या उपक्रमानुसार सुमारे पाच हजार कपडय़ांचे वाटप करण्यात आले. |
नाशिक / प्रतिनिधी सिन्नर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या संघाने अभोणा, भोसला, सिन्नर व सिडको महाविद्यालयाचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. विभागीय संघात शुभांगी बिडवे, तृप्ती उत्तेकर, शीतल अहिरे यांची निवड झाली. |
राष्ट्रीय सेवा योजनेसह इतर उपक्रम प्रभावीपणे राबविले नाशिक / प्रतिनिधी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ताहाराबाद येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेसह इतर उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या महाविद्यालयांना हा पुरस्कार दिला जातो. पुणे विद्यापीठातून चार महविद्यालयांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. |
चारूशीला कुलकर्णी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
दिवाळीचा बाजार म्हणजे त्यात ‘आकाशकंदिल’ ला हमखास स्थान. दिवाळीच्या यादीतील आपले स्थान आजतागायत आकाशकंदिलने कायम राखले आहे. दिवाळी उंबरठय़ावर आल्याने तिच्या स्वागतासाठी नाशिकची संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजली असली तरी बाजारपेठेत नव्याने दाखल झालेले आकाशकंदिलचे विविध प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चायनीज् कंदिलांचीही त्यात भरमार असली तरी ग्राहकांनी ‘इको फ्रेंडली’ आकाशकंदिलांना आपली पसंती दर्शविली आहे. |
‘एसएमआरके’च्या शिक्षण परिषदेतील मान्यवरांचा सूर नाशिक / प्रतिनिधी
मूल्याधिष्ठीत शिक्षण प्रणालीत शिक्षणाचे अंतीम उद्दिष्टय़े म्हणजे व्यक्तीमध्ये ज्ञान, कौशल्य व नैतिकता बाणवणे होय. परीक्षाकेंद्री शिक्षण व्यवस्थेत मूल्यांना काहीसे दुय्यम स्थान दिले जाते. तर दुसरीकडे भारतातील तरुणांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे मत. या पाश्र्वभूमीवर, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची गरज असल्याचा सूर येथील एसएमआरके महिला महाविद्यालयात आयोजित शिक्षण परिषदेत व्यक्त झाला. |
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का नाशिक / प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून नंदुरबार जिल्ह्यात तीन नगरपालिकांवर एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. |
प्रशासनाकडून पाणी सोडण्याचे आश्वासन नाशिक / प्रतिनिधी
तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने गंगापूर धरणातून डावा तट कालव्यास आवर्तन सोडावे, या मागणीसाठी सोमवारी सय्यदपिंप्री संघर्ष समितीच्यावतीने गंगापूर धरण परिसरातील डावा तट कालव्याजवळ ‘जल प्राणायाम’ आंदोलन करण्यात आले. हजारो ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी ठिय्या देत पाणी सोडण्याची मागणी केली. जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून पहिले आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 2 of 14 |