नाशिक / प्रतिनिधी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने कार्यक्रमांव्दारे अभिवादन करण्यात आले. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शालिमार चौकातील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी भावना व्यक्त केल्या. |
नाशिक/प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवा संचालनालय आणि नागपूर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत येथील केटीएचएम महाविद्यालयाचा जलतरणपटू प्रसाद खैरनारने रौप्य व कांस्य पदक मिळविले. त्याची नोव्हेंबरमध्ये पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. |
नाशिक/प्रतिनिधी पुणे येथे झालेल्या ६ व्या उपकनिष्ठ राज्यस्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेत स्वामिनी शेटे आणि वैष्णवी शिंदे यांना दोन सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले. ३० सेकंद स्पीडमध्ये वैष्णवी शिंदे (सुवर्ण), तीन मिनिटे इन्डोरन्स प्रकारात मुलींमध्ये स्वामिनी शेटे (रौप्य) तर मुलांमध्ये तन्मय कर्णिक (कांस्य), मुलींच्या दुहेरी गटात स्वामिनी शेटे (सुवर्ण), वैष्णवी शिंदे (रौप्य), |
नाशिक / प्रतिनिधी कर्मचारी- सर, हा बाहेर मित्रांकडे मोबाईल देताना सापडल्याने त्याला तुमच्याकडे घेऊन आलो. प्राचार्य - काय रे? महाविद्यालयाच्या आवारात मोबाईलला बंदी असल्याचे माहीत नाही का ? विद्यार्थी - हा खोटे बोलतोय. माझ्याकडे मोबाईल नाही. बघून घेईन. (तपासणी केली असता त्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडला) |
नाशिक / प्रतिनिधी राज्यपाल के. शंकरनारायणन् यांची महाराष्ट्राच्या नॅब युनिटतर्फे जागतिक पांढरी काठी दिनाच्या पाश्र्वभूमीवर राजभवनात थेट घेण्यात आली. या भेटीप्रसंगी नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, सहखजिनदार विनोद जाजु, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, प्रशासकीय अधिकारी विनोद जाधव व नाशिक जिल्हा शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आदींचा समावेश होता. याप्रसंगी कलंत्री यांनी नॅब राज्य शाखेने केलेल्या व करीत असलेल्या कार्याची माहिती राज्यपालांना दिली. |
* सातपूर परिसरात १६ श्वान ताब्यात * शहरात लवकरच श्वान पकडण्याची व्यापक मोहीम प्रतिनिधी / नाशिक, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
सातपूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ शालेय विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेमुळे महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली असून बुधवारी उपरोक्त भागात तातडीने मोहीम राबवून १६ मोकाट श्वानांना जेरबंद करण्यात आले. या श्वानांवर एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यातून निर्बिजीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे. या कारवाईपाठोपाठ संपूर्ण शहरात मोकाट श्वान पकडण्याची व्यापक मोहीम हाती घेण्याची तयारी सुरू झाली आहे. |
नाशिक / प्रतिनिधी
बाहेरील विद्यार्थ्यांचा वावर नाही, टारगटांना रोखण्यासाठी पुरेसे सुरक्षारक्षक, पाíकंगही ठराविक जागीच आणि शिस्तीत, विद्यार्थ्यांसाठी गणवेश, ओळखपत्र तपासणी, असे एखाद्या शिस्तप्रिय महाविद्यालयासाठी जे हवे ते सर्व काही पाहावयास मिळणाऱ्या येथील भोसला महाविद्यालयाने महाविद्यालयीन वेळेत आवाराबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांवरही कठोर कारवाई केल्यास ‘कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता’ या प्रश्नाचे उत्तर या महाविद्यालयाकडे पाहून देता येऊ शकेल. |
* पुन्हा एकदा पाणी कपातीचे चिन्ह * ‘दारणा’तील आरक्षित निम्मे पाणी गंगापूर’ मधून देण्याची मागणी नाशिक / प्रतिनिधी पाण्याचा मनसोक्त वापर करण्याची सवय जडलेल्या नाशिककरांना भविष्यात पुन्हा एकदा काटकसरीचा धडा शिकण्याची वेळ येणार असून आरक्षित पाण्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत कसे नियोजन करावे, याची तयारी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सुरू केली आहे. |
पाहणी कुपोषित परिसराची (३) चारूशीला कुलकर्णी लक्ष्यगटातील बालक व मातांचा तपशील, स्थलांतरानंतर घेण्यात येणारे वैद्यकीय उपचार, कामाचे स्वरूप आदी माहिती संकलीत करताना चिंचओहोळ परिसरातील बहुतांश कुटुंबियांना शेतीतून मिळणारे अन्नधान्य सहा महिन्यांहून अधिक काळ भूक भागविण्याइतपत नसल्याचे निदर्शनास आले. |
नाशिक / प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शिक्षण व पुरवठा विभागाच्या आढावा बैठकांमध्ये अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. |
नाशिक / प्रतिनिधी विज्ञान विषय शिकविताना शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, विद्यार्थ्यांना विज्ञान विषय सोपा करून कसा शिकवावा, प्रयोगातून आनंददायी शिक्षण कसे देता येईल, याविषयी येथील कोठारी फाऊंडेशनतर्फे मुंबईचे डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि नाशिक एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक उपक्रम समिती यांच्या वतीने सारडा कन्या विद्यामंदिरात विज्ञान शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले. |
नाशिक / प्रतिनिधी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत येथील एचपीटी-आरवायके कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. |
नाशिक / प्रतिनिधी वणी येथील नांदुरी गडावरील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने देवीच्या गाभाऱ्यात आयोजित ‘जागर आदिशक्ती आईचा’ या भक्तीगीतांच्या कार्यक्रमातून स्वरवंदना देण्यात आली. |
विविध विषयांवरील कथांचे सादरीकरण नाशिक / प्रतिनिधी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी प्रतिष्ठानमध्ये सायंकाळी सहा वाजता ‘रंगशोध’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. |
नाशिक / प्रतिनिधी पदव्यांचा फारसा उपयोग होत नसलेल्या आजच्या काळात सर्वच शाळा, महाविद्यालयांमधून स्काऊट रोव्हर रेंजर निर्माण व्हावेत, प्रामाणिकपणा, सेवा, स्वार्थत्याग, परीश्रम या मूल्यांव्दारे समाज विकास घडवावा, असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती आणि नाशिक भारत स्काऊट-गाईडचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. |
लघु उद्योजिकांचे हस्तकला प्रदर्शन नाशिक येथील वि. वा. रवळगांवकर कलादालनाच्या वतीने रविवारी लघु उद्योजिका विद्यार्थिनींनी निर्मिलेल्या वस्तूंच्या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १०.०० वाजता लेखिका वंदना अत्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. |
० मालेगावसाठी ३५० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची सूचना ० शेतीला पाणी मिळणे अवघड नाशिक/प्रतिनिधी,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
गंगापूर धरणात पुरेसा जलसाठा नसल्याने महापालिकेच्या वाढीव पाण्याच्या मागणीस नकार देत गेल्या वर्षी इतकाच म्हणजे गंगापूर व दारणा धरणातून ४,२०० दशलक्ष घनफूट जलसाठा नाशिककरांना पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय मंगळवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. |
नाशिक / प्रतिनिधी
गणवेशात असूनही फक्त आमच्याकडे ओळखपत्राची मागणी..बाहेरील मुले येऊन धमकाविण्याचे प्रकार तर सर्रास घडतात, परंतु आम्ही हतबल..सूसाट चारचाकी मुलामुलींच्या वसतीगृहाजवळ धडकते. जाब विचारला तर आपलीच गच्ची धरली जाते.. |
पाहणी कुपोषित परिसराची (२) चारूशीला कुलकर्णी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहोळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कुपोषित बालकांचे सर्वाधिक प्रमाण आढळून येण्यामागे अनेक घटक वेगवेगळ्या पद्धतीने हातभार लावत असल्याचे लक्षात येते. त्यात अशुद्ध पाण्याचा नाईलाजास्तव करावा लागणारा वापर, पावसाळ्यात कुडाच्या घरांना येणारी ओल आणि त्याचा माता व शिशुवर होणारा परिणाम, घरात प्राथमिक सोई-सुविधांचा अभाव, पाण्याअभावी शेतीतून वर्षभर मिळू न शकणारे उत्पन्न आदींचा अंतर्भाव आहे. |
रवींद्र ठाकूर
स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित परिणामकारक संशोधन व विकास केंद्र म्हणून कार्यरत जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जैविक विज्ञान प्रशाळेद्वारे पर्यावरणास उपयुक्त असे विविध प्रकारचे संशोधन केले जात आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 14 |