परभणी/वार्ताहर सार्वजनिक स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्हय़ातील सर्व कार्यालयांमधून १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान गाव स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी दिले. |
आज औरंगाबादेत प्रदर्शन औरंगाबाद/प्रतिनिधी पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य चांगलेच मेटाकुटीला आले असताना पेट्रोलटंचाईवर मात करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न व संशोधन सुरू आहे. औरंगाबादच्या काही धडपडय़ा विद्यार्थ्यांनी याचाच भाग म्हणून सर्वसामान्यांमध्ये जागृती घडविण्यासाठी एक लघुपट तयार केला आहे. |
नांदेड/वार्ताहर हदगाव तालुक्यातील रोडगी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष बालाजीराव भुजंगराव काकडे यांची निवड झाली. |
वार्ताहर वीरमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सुनील अधाने यांचा औरंगाबाद जिल्हा आदर्श महिला बचतगट पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. |
जालना/वार्ताहर ‘जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचे विविध भाषांवर होणारे परिणाम’ या विषयावर २ व ३ नोव्हेंबरला येथील अग्रसेन भवनात राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. |
आरोग्य विभागच रुग्णशय्येवर बीड/औरंगाबाद ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
डेंग्यूच्या जोडीला स्वाइन फ्लूनेही डोके वर काढल्याने आरोग्य विभागाची पुरती कसरत सुरू आहे. बीड जिल्ह्य़ात एकाच दिवशी चौघांचा डेंग्यूने बळी घेतला. आतापर्यंत चौदा जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्य़ात डेंग्यूच्या जोडीला स्वाइन फ्लूनेही हातपाय पसरले असून, चौघे जण यामुळे त्रस्त आहेत. |
आंतरराष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत यश औरंगाबाद- इंडोनेशियातील पॅलेमबँग येथे झालेल्या तृतीय आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय संघातील १८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. |
जालना/वार्ताहर जालना जिल्हय़ातील १२५ ग्रामपंचायतींची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात २६ नोव्हेंबरला होणार आहे. १५९ ग्रामपंचायतींची निवडणूक अलीकडेच घेण्यात आली. |
जि.प.च्या सभेत गदारोळ! औरंगाबाद/प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या उपकर अनुदानातून बाक खरेदी करायचे की, हिरव्या रंगाचे फळे यावरून सर्वसाधारण सभेत मंगळवारी गदारोळ झाला. शिक्षण सभापती बबन कुंडारे यांच्यासह बांधकाम सभापती सुनील शिंदे यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. गदारोळातच ४५ लाख रुपयांची बाके खरेदी करण्यास सभागृहाने मंजुरी दिल्याचे जि.प. अध्यक्षा नाहेदाबानो पठाण यांनी जाहीर केले. |
मनपास सहायक अनुदान द्यावे - महापौर देशमुख परभणी/वार्ताहर स्थानिक संस्था करावरील जिल्हा व्यापारी संघाने पुकारलेल्या बेमुदत बंदला मंगळवारीही चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ विस्कळीत होती. दरम्यान, स्थानिक संस्था कर रद्द करणे महापालिकेच्या अखत्यारित येत नाही, असे स्पष्ट करून महापालिकांसाठी सरकारने ३ वर्ष सहायक अनुदान सुरू ठेवावे, |
उस्मानाबाद आघाडीचे राजकारण ही सध्या देशाची अपरिहार्यता झाली आहे. आघाडीच्या राजकारणाची कल्पना प्रमोद महाजन यांच्यामुळेच साकारली गेली. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार याच संकल्पनेचे फलित असून, केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यात व ते यशस्वीपणे चालविण्यात महाजन यांचा मोलाचा वाटा होता, |
औरंगाबाद/प्रतिनिधी शहरातील शरीफ कॉलनी (रोशन गेट) भागात एका घरामध्ये जुगार खेळला जात असताना पोलिसांनी छापा टाकून १६ जणांना अटक केली. या वेळी जुगार साहित्य, रोख रकमेसह ५० हजार ४८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. |
परभणी/वार्ताहर पूर्णा तालुक्यातील सुकी येथे दोन एकरांच्या शेताच्या तुकडय़ासाठी दोन सुनांना जाळल्याच्या आरोपात सासरा बाबूराव श्रीराम कदम याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. वालचाळे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जानेवारी २०११मध्ये ही घटना घडली होती. |
लातूर/वार्ताहर जाचक एलबीटी रद्द करून त्यास कायमस्वरूपी स्थगिती देण्याच्या मागणीसाठी लातूर व्यापारी महासंघाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.महापालिका प्रशासनाने येत्या १ नोव्हेंबरपासून एलबीटीची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. |
हिंगोली/वार्ताहर येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात नाफेडच्या वतीने मंगळवारी सोयाबीन खरेदीला प्रारंभ होताच पहिल्याच दिवशी शंभर ते दीडशे रुपयांनी सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली. |
तत्कालीन शाखा व्यवस्थापकावर गुन्हा परभणी/वार्ताहर हिंगोली पीपल्स बँकेच्या जिंतूर शाखेत तत्कालीन शाखा व्यवस्थापक नरेश पारसमल गोलेच्छा याने ८४ लाख ९४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हिंगोली पीपल्समध्ये जवळपास ८५ लाखांची अफरातफर झाल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. |
लातूर/वार्ताहर सन २०००पर्यंत आपल्या देशात राजकारणासाठी अर्थकारण केले जात असे. परंतु आता अर्थकारणासाठी राजकारण केले जात आहे. आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत देश प्रगतिपथकावर जाणार नाही. प्रत्येकाने आपले व्यक्तिगत हित जोपासतानाच राष्ट्रहिताला अधिक प्राधान्य द्यायला हवे. |
लातूर/वार्ताहर देशाला दिशा देण्याचे सामथ्र्य अंधांमध्ये आहे, असे प्रतिपादन प्रख्यात नेत्रतज्ज्ञ सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ (मुंबई) व विभागीय शाखा (लातूर) यांच्या वतीने आयोजित अंधांच्या राज्यस्तरीय युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. लहाने बोलत होते. |
औरंगाबाद/प्रतिनिधी यकृत निकामी झाल्यास रुग्णावर शस्त्रक्रियेची गरज निर्माण होते. मात्र, त्यासाठी होणारा खर्च व यकृत प्रत्यारोपणासाठी सरकारने ज्या अटी घातल्या आहेत, त्यात बदल होणे गरजेचे झाले आहे, असे मत डॉ. उदय कुटे यांनी येथे व्यक्त केले. |
लातूर/वार्ताहर अंबाजोगाई येथील शेतकरी संघटनेचे नेते श्रीरंगराव मोरे यांचे वडील निवृत्तीराव मोरे यांच्या स्मरणार्थ पहिला ज्ञानश्री पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना जाहीर झाला. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 8 of 26 |