औरंगाबाद/प्रतिनिधी जगप्रसिद्ध चित्रकार व छायाचित्रकार केकी मूस यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्या (गुरुवारी) प्रसिद्ध बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांच्या बासरीवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तापडिया नाटय़गृहात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होईल. यात पंडित मुजुमदार व सहकलाकार यांच्यातील हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य संगीतातील जुगलबंदी रंगणार आहे. |
लातूर/वार्ताहर अधिकारी, पुढाऱ्यांच्या घरी सर्रास मनपा कर्मचाऱ्यांना घरकामासाठी पाठविले जात असून अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा मनपाच्या सेवेत रुजू करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनपाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. |
गायकीचे ध्यासपर्व तिसऱ्या पिढीकडे उस्मानाबाद गाणं तालातून येतं, गाणं सुरातून येतं, जीव ओतावा गाण्यात, गाणं उरातून येतं, असे एका कवीने म्हटले आहे. गाण्याला उरातून जपत ‘दीपोत्सव एक स्वरपर्व’ या शास्त्रीय गायन मैफलीचा प्रवास यंदा तपपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. |
विद्यार्थ्यांची राज्यपालांकडे तक्रार औरंगाबाद/प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘गोपीनाथ मुंडे यांची सामाजिक न्यायातील भूमिका’ या विषयावर पीएच. डी.स मान्यता देऊनही राजकीय द्वेषापोटी हा विषय रद्द करावा, म्हणून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करीत माधव फड या विद्यार्थ्यांने विद्यापीठ प्रशासनाची तक्रार राज्यपाल तथा कुलपतींकडे केली आहे. |
लातूर/वार्ताहर लातूर तालुक्यातील लोकांच्या प्रश्नांसाठी ९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन काळे यांनी दिली. |
परभणी/वार्ताहर खानापूरमधील नृसिंह कॉलनी येथे महापालिकेच्या जागेवर झालेले रुख्मिणी प्राथमिक विद्यालयाचे अनधिकृत बांधकाम महापालिकेने भुईसपाट केले. या अतिक्रमणाबाबत ४ दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी तक्रार केली होती. |
अध्यादेशातही मराठवाडा मागे औरंगाबाद/प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२ मराठवाडय़ातील अडीच हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये पीक पैसेवारी कमी आल्याचे अहवाल राज्य सरकारकडे सादर करूनही दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा सरकारी अध्यादेश अजूनही लटकलेलाच आहे. तुलनेने जेथे चांगला पाऊस झाला आहे. कोकण, पुणे विभागांतील पैसेवारी कमी असलेल्या गावांचा अध्यादेश मात्र काढण्यात आला आहे. |
किमान आधारभूत किमतीने धान्य खरेदी औरंगाबाद/प्रतिनिधी मार्केटिंग फेडरेशनमार्फत राज्यातील २३ बाजार समित्यांत किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. बाजार समित्यांमधील धान्य खरेदी केंद्रांद्वारे १३ हजार ९४५ क्विंटल उडदाची (४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने) खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला बाजारभाव मिळत आहे. |
हिंगोली जिल्हय़ातील चित्र हिंगोली/वार्ताहर उसाची कमतरता असल्याने जिल्हय़ातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे ऊस पळवून खासगी कारखाने सहकारी साखर कारखान्यावर मुजोरी करीत असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केला. |
दुसऱ्या दिवशीही संप सुरू परभणी/वार्ताहर तीन महिन्यांचे थकीत वेतन द्यावे, या मागणीसाठी आयटकप्रणीत मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होता. दरम्यान, या संपाचा शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेवर परिणाम झाला. |
प्रदीप नणंदकर, लातूर सणासुदीच्या निमित्ताने विविध वस्तूंची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तो लक्षात घेऊन नियमांची पायमल्ली करीत वस्तूंचे विपणन (मार्केटिंग) केले जात असल्याचे दिसते. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा नको, म्हणून मनपा कर्मचारी, वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी त्यांच्या मनात येईल तेव्हा जागे होतात. |
बीड/वार्ताहर शेतात कापूस वेचून घरी परतत असलेल्या अल्पवयीन मुलीला अडवून गावातील तिघांनी बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी घडला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडित मुलीला जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी िपपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली. |
बीड/वार्ताहर आष्टीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या समर्थकांसह स्वतंत्र आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. धोंडे यांच्या भूमिकेने पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या एकछत्री कारभाराला धक्का बसणार आहे. |
विविध राज्यातील हस्तशिल्प आणि कलावस्तू विक्रीस ठेवणार औरंगाबाद/प्रतिनिधी पर्यटनाच्या राजधानीत २० दिवस चालणाऱ्या ‘कलाग्राम दिवाळी’ या कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. ८) सुरू होणाऱ्या महोत्सवात देशभरातील हस्तशिल्पं, कलावस्तू, खाद्यपदार्थ व मनोरंजनपर कार्यक्रमांची लयलूट असेल. पर्यटन विकास महामंडळाने महोत्सवाचे आयोजन केले आहे. |
नांदेड/वार्ताहर ‘आदर्श’वादाची झूल पांघरून काँग्रेसचे या भागातील नेतृत्व आर्थिक ताकदीच्या बळावर राजकारण करतात. परंतु कोणतेही पाठबळ नसताना ‘त्या’ नेतृत्वाला आव्हान देण्याचे काम प्रताप पाटील यांनी केले. त्यांच्यासारख्या संघटन कौशल्य व विकासाची जाण असणारे नेतृत्व राष्ट्रवादीत आल्याने पक्षाला मराठवाडय़ात बळकटी मिळेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. |
हिंगोली/वार्ताहर जिल्ह्य़ातील ७६ शाळांमध्ये अजूनही व्यवस्थापन समित्यांची स्थापना झालेली नाही. खासगी शाळांच्या संस्थाचालक आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याने समित्या गठीत होऊ शकल्या नाहीत. या समित्यां मार्फत विविध योजना, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर लक्ष ठेवणे, अशी कामे अपेक्षित असतात. समित्या स्थापन न झाल्याने अनेक शाळांमध्ये प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. |
कुलगुरू पांढरीपांडे यांची प्रतिक्रिया औरंगाबाद/प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड होणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी व्यक्त केली. |
बीड/वार्ताहर आपल्याकडील ज्ञानाची गंगाजळी दुसऱ्याला दिल्यास आपल्या ज्ञानात भर पडते व या ज्ञानाचा खऱ्या अर्थाने विस्तार आणि उपयोग होतो. नवनवीन विषयांचे ज्ञान प्राप्त झाल्याने आपली प्रगती होते. परंतु हेच ज्ञान साठवून ठेवले तर माणूस ज्ञानी असूनही प्रगती करू शकत नाही, असे प्रतिपादन डॉ. गणेश शेटकर यांनी केले. |
उस्मानाबाद आगामी काळात पाणी व पीक नियोजनाला सर्वाधिक महत्त्व राहील. त्यासाठी स्वतंत्र जलसंधारण व्यवस्था असणे गरजेचे आहे. निधीची कमतरता हा महत्त्वाचा विषय नसून सर्वाची कृतिशील मानसिकता गरजेची आहे. उस्मानाबादच्या जनतेने ही मानसिकता दाखवल्यास संभाव्य जलसंकटाचा मुकाबला करणे शक्य आहे, असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी केले. |
खा. दुधगावकर यांची माहिती परभणी/वार्ताहर वाटूर-जिंतूर मार्गाचे चौपदरीकरण, तसेच जिंतूर-नांदेड रस्त्याच्या दुहेरीकरणास बीओटी तत्त्वावर मान्यतेस मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे खासदार गणेशराव दुधगावकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर स्पष्ट केले. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 3 of 26 |