शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा लातूर/वार्ताहर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या पीकविम्याची आलेली रक्कम परस्पर कर्जखाते टाकून शेतकऱ्यांकडून वसूल केली. शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापुरे यांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे. |
पंकजकुमार यांचा इशारा बीड/वार्ताहर राज्यात जाणवत असलेली पाणीटंचाई, तसेच पाण्यात नायट्रोजन व फ्लोराइडचे वाढते प्रमाण माणसांना व शेतीलाही घातक आहे. पाणीप्रश्नावर राज्यातील, विशेषत: मराठवाडय़ातील माणूस जागा न झाल्यास लवकरच राज्यात पाणीसंकट निर्माण होईल, असे मत जलबिरादरीचे पंकजकुमार यांनी व्यक्त केले. |
चौघांकडून विळय़ाने वार नांदेड/वार्ताहर शिक्षण संस्थेच्या वादातून सिडकोतील इंदिरा गांधी विद्यालयामधील सहशिक्षक सुभाष कदम यांची भरदिवसा निर्घृण हत्या झाल्याच्या प्रकाराने शहरात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी आरोपींचे धागेदोरे हाती लागले नाहीत. |
जालना/वार्ताहर सी.आय.डी. असल्याचे भासवून दोघांनी भरदुपारी येथे अंबडच्या व्यापाऱ्याचे ५० हजार रुपये लुटले. गौतमसा राजसा जैन असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. |
लातूर/वार्ताहर सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांची देयके अदा करण्यासाठी तब्बल ५० टक्के रक्कम द्यावी लागत असून, गेल्या पाच वर्षांपासून थकीत पैसे मिळत नसल्यामुळे अहमदपूर येथील ठेकेदारांच्या संघटनेने काम बंद आंदोलन हाती घेतले आहे. |
हिंगोली/वार्ताहर ग्रंथालये ही खऱ्या अर्थाने माणसे जोडण्याचे केंद्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वासुदेव मुलाटे यांनी केले. प्रा. मुलाटे यांचा येथील रंभाबाई रामचंद्र बियाणी नूतन साहित्यमंदिर वाचनालयात सत्कार करण्यात आला. |
औरंगाबाद/प्रतिनिधी राज्यातील धनगर समाज घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीत आहे. परंतु राज्यकर्त्यांनी इंग्रजीतील ‘धनगड’ व मराठीतील ‘धनगर’ या शब्दांचा वेगवेगळा अर्थ काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून ६० वर्षांपासून वंचित ठेवले. येत्या २७ ला शिर्डीत आरक्षण हक्क परिषद आयोजित केली आहे. |
सातपैकी बिनविरोध ५ सदस्य सगेसोयरे जालना/वार्ताहर सध्या जालना जिल्हय़ात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या धामधुमीत भोकरदन तालुक्यातील गोकुळ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. |
औरंगाबाद/प्रतिनिधी शिक्षणासह विविध क्षेत्रांत माहिती-तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे सरकारचे ध्येय असून, सरकारमध्येही ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून मोठी क्रांती घडून येईल. |
बीड/वार्ताहर पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रकार वाढत असल्याने अशा हल्ल्यांच्या निषेधार्थ मोर्चा व निदर्शने करून आता उपयोग होणार नसल्याचे चित्र आहे. |
गदारोळातच आटोपली सभा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे आघाडीचा धर्म सर्व संस्थांमध्ये पाळला जाईल, असे संकेत मिळत होते. परंतु जिल्हा परिषदेत मात्र हे समीकरण जुळण्याची शक्यता दिसत नसल्याचेच समोर येत आहे. |
हिंगोली/वार्ताहर ग्रंथालये ही खऱ्या अर्थाने माणसे जोडण्याचे केंद्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वासुदेव मुलाटे यांनी केले. प्रा. मुलाटे यांचा येथील रंभाबाई रामचंद्र बियाणी नूतन साहित्यमंदिर वाचनालयात सत्कार करण्यात आला. |
लातूर/वार्ताहर शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या हॉकी संघाने विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे खेळाडूंचे कौतुक होत आहे. |
जालना/वार्ताहर दुष्काळी स्थितीमुळे यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे यांनी केली आहे. |
मराठवाडय़ात पैसा ‘झिरपला’! औरंगाबाद/प्रतिनिधी - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२ मराठवाडय़ात आतापर्यंत ८८२ पाणलोट मंजूर झाले. एका पाणलोटात सलग समतल चर, दगडी बंधारे, मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे, गॅबियन बंधारे बांधून पाणी अडविले जावे, असे ठरविण्यात आले होते. जमिनीची धूप थांबावी व भूजलाची पातळी उंचवावी म्हणून आतापर्यंत १ अब्ज ८० कोटी ८६ लाख ८० हजार रुपये खर्ची पडले. पण या पाणलोटांचा उपयोग काय, याचे प्रशासकीय यंत्रणेलाच कोडे पडले आहे. विशेष म्हणजे हे काम इतके रडत-खडत सुरू आहे की, त्याची तपासणीही करणे शक्य नाही. |
हिंगोली/वार्ताहर निधीची उचल करून काम मात्र काहीच न केल्याबद्दल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला अखेर निलंबित करण्यात आले. |
‘योद्धा संन्यासी’चा प्रभावी प्रयोग औरंगाबाद- ‘स्व’विकास व्याख्यानमालेच्या सहाव्या वर्षांतील पाचवे पुष्प ‘योद्धा संन्यासी’ या एकपात्री प्रयोगाद्वारे दामोदर रामदासी यांनी प्रभावीपणे सादर केले. |
फौजिया खान यांची नाराजी लातूर/वार्ताहर गेल्या ३ वर्षांपासून कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या अद्ययावत इमारतीत २ महिन्यांपूर्वी स्त्री रुग्णालय सुरू केले. मात्र, आंतर रुग्णसेवा बंद असल्यामुळे आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी खेद व्यक्त केला. ही सोय सुरू करण्यास सरकार आवश्यक ते आर्थिक सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. |
जीटीएलचे निवेदन औरंगाबाद/प्रतिनिधी वीज वितरण व ग्राहकांकडून वसूल झालेली १ अब्ज २६ कोटी ३७ लाख रुपये रक्कम जीटीएल कंपनीने थकविल्याचे वीज कंपनीकडून सांगितले जाते. तथापि, ही रक्कम तेवढी नाही, असे जीटीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. महावितरणकडूनही काही येणे ‘बाकी’ आहे. ते वजा करता थकबाकीची रक्कम खूपच कमी असल्याचा दावा करण्यात आला. |
जालन्यातील ६४ प्रकल्पांत अवघा २ टक्के उपयुक्त साठा जालना/वार्ताहर वार्षिक सरासरीच्या ४५ टक्केच पाऊस झालेल्या जालना जिल्हय़ात बहुतेक जलसिंचन प्रकल्प पावसाळा संपत आल्यावरही कोरडेच आहेत. जिल्हय़ातील ७ मध्यम व ५७ लघुसिंचन प्रकल्पांतील सध्याचा उपयुक्त जलसाठा सरासरी २ टक्के एवढा अल्प आहे. |
|
|
<< Start < Prev 21 22 23 24 25 26 Next > End >>
|
Page 21 of 26 |