सत्तर महिला ग्रामसेवकांची तक्रार औरंगाबाद/प्रतिनिधी जिल्ह्य़ातील सत्तरहून अधिक महिला ग्रामसेवकांनी पदाधिकारी व महिला पदाधिकाऱ्यांचे पती बेकायदा काम करण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे सोमवारी केली. |
अधिकारी-ग्रामसेवक संघर्ष उफाळला बीड/वार्ताहर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यशाळेत अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांना चुकीच्या कामांमुळे धारेवर धरले. जिल्हय़ातून मोठय़ा संख्येने मजूर बाहेर जात आहेत. परंतु रोहयोसाठी मजूर मिळत नाहीत यावरून चांगलीच वादावादी झाली. |
परभणीत ‘नॅक’पुरस्कृत चर्चासत्र परभणी/वार्ताहर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानकौशल्य याबरोबरच नेतृत्वगुण व मूल्यसंस्कारांचा भाग अभ्यासक्रमात समाविष्ट होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. उमाकांत कपले यांनी केले.श्री शिवाजी महाविद्यालयात ‘नॅक’पुरस्कृत दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. कपले बोलत होते. |
जालना/वार्ताहर येथे आयोजित राज्य पातळीवरील २४व्या किशोर-किशोरी गट अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनास पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार होते. परंतु ऐनवेळी ते आले नाहीत म्हणून क्रीडा राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. |
उस्मानाबाद तुळजाभवानी मंदिरात दगडी फरशी बसविण्याचे काम केवळ २५ टक्के पूर्ण झाले आहे. नवरात्रमहोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता नाही. परिणामी मंदिर परिसरात सिमेंट-वाळूचे मिश्रण अंथरण्यात येत आहे. पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी सप्टेंबर महिन्यातच मंदिरातील पाहणी करून नवरात्रीपूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. |
औरंगाबाद/प्रतिनिधी बहुचर्चित श्वेता गोडसे आत्महत्याप्रकरणातील आरोपी देवेश पाथ्रीकर याचा जबाब १८ ऑक्टोबरला होणार आहे. या प्रकरणात १० साक्षीदार तपासण्यात आले आहेत. दि. २ जानेवारी २००७ रोजी श्वेता गोडसेने विष घेऊन आत्महत्या केल्याबाबत गुन्हा नोंद झाला. |
औरंगाबाद/प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘पेट’ परीक्षा २८ ऑक्टोबरऐवजी आता १८ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. सोमवारी विद्यापीठातून ही माहिती देण्यात आली. |
औरंगाबाद/प्रतिनिधी महापालिका फेरीवाला व्यवसायाच्या उपविधीची अंमलबजावणी व्हावी, यासाठी दाखल याचिकेच्या अनुषंगाने महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली. |
लातूर/वार्ताहर राज्यातील सिंचन घोटाळा प्रचंड मोठा असून त्याची चौकशी दबावाविना होण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.सेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, सुधा पाटील, शोभा बेंजरगे उपस्थित होते. |
बीड/वार्ताहर सोने खरेदीसाठी बनावट गिऱ्हाईक बनून आलेल्या तीन महिलांनी वडवणीतील गोविंद ज्वेलर्समधून भरदिवसा नजर चुकवून साडेचार लाखांच्या दागिन्यांसह दुकानातील नगद २२ हजार रुपये लुटन पोबारा केला. |
संगीत शिक्षक खंडेराव कुलकर्णी यांचे निधन |
|
|
लातूर/वार्ताहर ज्ञानेश्वर विद्यालयातील स्वेच्छानिवृत्ती घेतलेले संगीत शिक्षक व गायक खंडेराव कुलकर्णी (वय ५५, उमरगा) यांचे रविवारी रात्री निधन झाले.श्रीधर फडके, पंडित भीमसेन जोशी, सुरेश वाडकर यांना तबल्याची साथसंगत दिली होती.ते लातूर येथील ड्रायव्हर कॉलनी येथे वास्तव्यास होते. उमरगा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, २ भाऊ असा परिवार आहे. |
औरंगाबाद/प्रतिनिधी इंडियन सोसायटी ऑफ अनिस्थिशियालॉजिस्टच्या वतीने प्रसिद्ध सर्जन डॉ. संजय ओक यांची प्रकट मुलाखत १६ ऑक्टोबरला होणार आहे. भूलशास्त्रज्ञ डॉ. सुहास जेवळीकर मुलाखत घेतील. |
नाभिक समाजाचा मेळावा महाराष्ट्रातील नाभिक समाज आणि बारा बलुतेदारांचा राज्यस्तरीय मेळावा औरंगाबाद येथील सरस्वती भुवन मैदानात १३ ऑक्टोबरला आयोजित केला आहे. |
परभणी / वार्ताहर, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
मराठवाडय़ात कमी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढली नाही. धरणे भरली नाहीत. त्यामुळे पाण्याचा वाद सुरू आहे, असा पुसटसा उल्लेख करून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडीत पाणी सोडण्याबाबतच्या मुद्याला बगल दिली. सध्या मराठवाडय़ात सर्वत्र जायकवाडीत नगर जिल्ह्य़ातील धरणातून पाणी सोडावे अशी मागणी होत असताना विखे पाटील काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आपल्या भाषणात त्यांनी नगर-नाशिक जिल्ह्य़ातून जायकवाडीत पाणी सोडण्याबाबतच्या मुद्याला बगल दिली. भविष्यात उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर करावा, असा सल्ला मात्र त्यांनी दिला. |
राजू इनामदार एक टुमदार शहर होतं. अहमदनगर नावाचं. दोन-तीन लाख लोकसंख्येचं. फिरण्यासाठी बागा होत्या, खेळण्यासाठी मैदाने होती, नाटकांसाठी चांगली दोन सभागृहे होती आणि एक-दोन नाही तर तब्बल सहा चित्रपटगृहे होती. |
विद्याधर कुलकर्णी गेल्या काही वर्षांत एकपडदा चित्रपटगृहांची संख्या झपाटय़ाने घटत आहे. देशभरातील १३ हजार ५०० एकपडदा चित्रपटगृहांपैकी सध्या जवळपास नऊ हजार चित्रपटगृहे अस्तित्वात आहेत. |
औरंगाबाद / प्रतिनिधी सरकारमधील पाच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. सिंचन घोटाळा व बेनामी संपत्ती गोळा करणाऱ्यांच्या यादीत सुनील तटकरे, टोल व महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ, कोळसा घोटाळ्यात राजेंद्र दर्डा, अशोक चव्हाण, बेनामी संपत्ती गोळा करणाऱ्या विजयकुमार गावीत यांची नावे पुढे आली. |
लातूर / वार्ताहर मुंबई-लातूर या रेल्वेगाडीला कुर्डुवाडीपर्यंत अतिरिक्त फेरी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या रेल्वेसाठी वातानुकूलित प्रथम व द्वितीय श्रेणीसाठी स्वतंत्र बोगी, सुसज्ज शेड उभारणी, स्थानकाचे आधुनिकीकरण, माल साठवणुकीसाठी नव्याने गोदाम व कायमस्वरूपी विद्युत सुविधा करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली होती. |
परभणी / वार्ताहर जुन्यांना सामावून घेत आणि नव्यांना संधी देत शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर नव्या नियुक्तया केल्या असून जिल्हाप्रमुखपदी हरीओम मदत केंद्राचे संस्थापक बाळासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. |
हिंगोली / वार्ताहर कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच शंकर लालजी आडे व ग्रामसेवक ए.पी. गिते यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावरील सुमारे अडीच लाखांच्या निधीचा अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले. |
|
|
<< Start < Prev 21 22 23 24 25 26 Next > End >>
|
Page 23 of 26 |