मुंबईच्या बैठकीत सकारात्मक चर्चा औरंगाबाद/प्रतिनिधी - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२ नगर जिल्हय़ातील भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीशी सल्लामसलत करावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आयोजित बैठकीत घेण्यात आला. जायकवाडीत पाणी सोडण्याविषयी नगर जिल्हय़ातील पुढाऱ्यांची सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न बैठकीत करण्यात आला. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडले जाईल, या वक्तव्याचा थोरात यांनी पुनरुच्चार केला. |
पाणलोटाची कामे रेंगाळली लातूर/वार्ताहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरच्या प्रश्नांना कोणी वाली नसल्याचे समोर येत आहे. मराठवाडा पाणलोट विकासांतर्गत लातूर जिल्ह्य़ात अखर्चित असलेले १ कोटी ४५ हजार रुपये हिंगोली जिल्ह्य़ाकडे वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. |
समेटासाठी आज बैठक औरंगाबाद/प्रतिनिधी औरंगपुरा भाजीमंडईतील दीडशे विक्रेत्यांना महापालिकेने बेकायदा नोटीस देऊन हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात जिल्हा फळ व भाजी विक्रेता युनियनच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या विक्रेत्यांना पुढील आदेश येईपर्यंत हटवू नयेत, असे आदेश न्या. एच. एन. पाटील व न्या. ए. बी. चौधरी यांच्या खंडपीठाने दिले. |
कंधार, नायगावातील थरार नांदेड/वार्ताहर जिल्ह्य़ातील कंधार-मुखेड व मुखेड-नायगाव रस्त्यांवर पडलेल्या दोन दरोडय़ांमध्ये दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे जबर जखमी झाले. दरोडय़ाच्या या घटनांनी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. |
बनावट उपस्थिती दाखवून अनुदान लाटले बीड/वार्ताहर पटपडताळणीत ५० टक्क्य़ांपेक्षा कमी उपस्थिती आढळून आलेल्या शाळांनी बनावट उपस्थिती दाखवून शालेय पोषण आहार, गणवेश व इतर सवलतींचा लाभ घेऊन अनुदानाचा गैरवापर केला, असा ठपका ठेवून शिक्षणाधिकाऱ्यांनी ३४ शाळांना शिस्तभंगाबाबत नोटीस बजावली. |
परभणी/वार्ताहर जिल्हय़ात मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी आठपर्यंत सरासरी ४१.३१ मिमी पाऊस झाला. परतीच्या पावसाने दणकेबाज हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. परतीचा पाऊस असाच आणखी बरसला तर वार्षिक सरासरीचा टप्पाही ओलांडला जाईल, अशी स्थिती आहे. |
जालना/वार्ताहर जिल्ह्य़ात गेल्या ३ दिवसांत पावसाने हजेरी लावली असली, तरी त्यामुळे वार्षिक सरासरी ४५ टक्क्य़ांपर्यंतच पोहोचली आहे. गेल्या ३ दिवसांत वातावरण ढगाळ आहे. मंगळवारी व बुधवारी जिल्ह्य़ाच्या काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. |
लातूर/वार्ताहर हस्त नक्षत्रातील पावसाने शेतक ऱ्यांना दिलासा दिला असून, सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांत जिल्ह्य़ात ७५ मिमी पाऊस झाला. जिल्ह्य़ाची सरासरी ७०४.५० मिमीवर पोहोचली आहे.चाकूर तालुक्यातील शेळगाव मंडलात २४ तासांत तब्बल १३७ मिमी पावसाची नोंद झाली. या भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहिले. |
हिंगोली/वार्ताहर जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी हस्ताचा चांगला पाऊस पडला. गेल्या २४ तासांत १४९.४८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाची सरासरी २९.९२ मिमी असून चालू वर्षी आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ७६.४२ मिमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत ती कमी आहे. दरम्यान, परतीच्या जोरदार पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्य़ात मंगळवारी दुपारी हस्ताचा पाऊस सुरू झाला. |
महत्त्वाचे अधिकारी गैरहजर हिंगोली/वार्ताहर जिल्हाधिकारी, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकारी रजेवर, तर इतर अनेक अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली अशा चक्रात हिंगोली जिल्ह्य़ातील प्रशासकीय कारभारात सध्या ‘प्रभारी राज’ सुरू आहे. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम ८ दिवसांच्या, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल ७ दिवसांच्या रजेवर आहेत. |
जालना/वार्ताहर जालना गणेश फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित जालना आयडॉल गायन स्पर्धेत किशोर दिवटे पहिला, तर राहुल कवडे दुसऱ्या व शेखर राखे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. मंगळवारी रात्री येथील फुलंब्रीकर नाटय़गृहात अंतिम फेरीतील या ३ स्पर्धकांनी गायन सादर केले. त्यांच्यासह अन्य विजेत्यांना या वेळी पारितोषिके देण्यात आली. |
परभणी/वार्ताहर बी. रघुनाथ महाविद्यालयात परभणी व मराठवाडा अर्थशास्त्र परिषद यांच्या वतीने उद्या (गुरुवारी) मराठवाडय़ातील आधारभूत संरचना व विकास या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी अॅड. झुंबरलाल मुथा, तर उद्घाटक अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. के. के. पाटील आहेत. |
परभणी/वार्ताहर जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांचे कुठल्याही विभागावर नियंत्रण नसल्याने विविध योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे, अशी टीका भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले. |
लातूर/वार्ताहर जिल्हास्तरीय महिला टेबल टेनिस स्पर्धेत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या संघाने खेळाचे सातत्य राखत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयात जिल्हास्तरीय महिला टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. |
लातूर/वार्ताहर चाकूर आगारातील वाहतूक नियंत्रकाने मद्यधुंद अवस्थेत प्रवाशांशी हुज्जत घातली. अखेर संतप्त प्रवाशांनी या अधिकाऱ्यास कार्यालयात कोंडून ठेवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. गांधीजयंतीची सुटी असल्यामुळे वाहतूक नियंत्रक एस. व्ही. केंद्रे आपल्या कक्षात सायंकाळी मद्यप्राशन करीत होते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. |
उस्मानाबाद पाणीटंचाई व दुष्काळ या समस्या दरवर्षी उग्र रूप धारण करीत आहेत. त्यांचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय त्यावर उपाय शोधता येणार नाही. या अनुषंगाने संडे कल्चर कार्यक्रमांतर्गत औरंगाबादचे अभ्यासक डॉ. प्रदीप पुरंदरे यांचे ‘सिंचन समस्या व पाणी प्रश्न’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. |
परभणी/वार्ताहर शिक्षण हक्क कायद्यात शाळेवर सनियंत्रण ठेवण्याचे काम शाळा व्यवस्थापन समितीकडे आहे. शिक्षकांसोबतच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा सर्वागीण विकास अपेक्षित आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्या सक्षम असल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शिक्षण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी केले. |
स्वस्त धान्य घोटाळ्यांचा सहसचिव घेणार आढावा हिंगोली/वार्ताहर जिल्ह्य़ातील स्वस्त धान्य दुकानांमधील घोटाळ्यांचा आढावा घेण्यासाठी नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव बा. सो. कोळसे ११ व १२ ऑक्टोबरला जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुरवठा विभागातील विविध विभागांच्या तक्रारी त्यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. स्वस्त धान्य काळ्याबाजारात विक्रीस जात असल्याबाबत औंढा नागनाथ, गोरेगाव, सेनगाव, कळमनुरी व कुरुंदा येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. |
|
|
<< Start < Prev 21 22 23 24 25 26 Next > End >>
|
Page 26 of 26 |