औरंगाबाद/प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एका एस.टी. बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. हिंगोली-पुणे या बसमध्ये हा प्रकार घडला. हिंगोलीहून निघालेल्या या बसमध्ये (एमएच २० बीएल १७४६) जिंतूर येथून अकराच्या दरम्यान हा प्रवासी बसला होता. |
औरंगाबाद/प्रतिनिधी एस.टी. बसला समोरून उजव्या बाजूने टेम्पोची धडक बसून बसचा पत्रा सुमारे १० फूट उचकटला गेला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारात बसमधील दोन महिलांसह १० प्रवासी जखमी झाले. छावणी पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून टेम्पोचालकास मंगळवारी दुपारी अटक केली. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. |
औरंगाबाद/प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
पाण्याच्या मुद्दय़ावरून पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांची पुरती कोंडी झाली आहे. शिवसेनेने सोमवारी त्यांना घेराव घातला. तत्पूर्वीही त्यांची भूमिका ‘पालकत्वा’ची आहे की नाही, यावरून नेहमीच प्रश्नचिन्ह लावले जात होते. ‘पिण्यासाठी पाणी देऊ’ असे थोरात नेहमी सांगत. समन्यायी पाणीवाटपाचा प्रश्न नव्याने चर्चेत आल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा कोंडी झाली. |
औरंगाबाद/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांना ‘मौलाना आझाद पुरस्कार’ घोषित झाला. नवी दिल्ली येथील ऑल इंडिया नॅशनल युनिटी कॉन्फरन्सच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण दिनी, ११ नोव्हेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माजी निवडणूक आयुक्त जी. व्ही. कृष्णमूर्ती संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या ३५ वर्षांत डॉ. पांढरीपांडे यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात मोलाचे कार्य केले. |
परभणी/वार्ताहर महापालिका कामगारांच्या ३ महिन्यांचे थकीत वेतन व विविध २८ मागण्यांबाबत आयटक प्रणीत मनपा कामगारांनी सोमवारी बेमुदत संप पुकारला. पूर्ण वेतन मिळाल्याशिवाय कामावर रुजू न होण्याचा निर्धार संपक ऱ्यांनी केला. |
बीडमध्ये कारवाईचा धडाका बीड/वार्ताहर सुमारे ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रस्त्याच्या बाजूच्या सरकारी जागेवर अतिक्रमण करून दोन-तीन मजली इमारती बांधणाऱ्या दिग्गज पुढाऱ्यांसह सर्वाच्याच अतिक्रमणांवर दोन दिवस बुलडोझर फिरवून रस्ता मोकळा करण्यात आला. |
अपक्षाच्या भूमिकेला किनवटमध्ये महत्त्व नांदेड/वार्ताहर जिल्ह्य़ाच्या किनवट नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी सर्वाधिक ८ जागा पटकावल्या, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही. काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या. एका अपक्षाचा विजय झाला. या पाश्र्वभूमीवर पालिकेची सत्तासूत्रे कोणाकडे, याची उत्सुकता वाढली आहे. |
महाऑनलाइन प्रक्रियेला ब्रेक बीड/वार्ताहर प्रशासनातील छोटी-मोठी कागदपत्रे गावपातळीवर मिळावीत, यासाठी सुरू करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे आठ दिवसांपासून बंद पडली आहेत. |
वडवणीत ३१ वसतिगृहे सुरू बीड/वार्ताहर वडवणी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी १ नोव्हेंबरपासून तालुक्यात ३१ ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात आली. जवळपास ३ हजार विद्याथ्र्र्याचे स्थलांतर थांबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. |
नांदेड/वार्ताहर देगलूर दंगलीतील मुख्य आरोपी मीरा मोईयोद्दीन यानेच दैनिक गावकरीचे कार्यालय जाळल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपी अटक टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याची माहिती हाती आली. |
लातूर/वार्ताहर साखर कारखाने सुरू होण्याच्या टप्प्यात असतानाच तीन शेतकरी संघटनांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक संघटनेचा आपापल्या परीने आपल्या संघटनेमुळेच शेतक ऱ्याला कसा न्याय मिळतो, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. |
साहित्य वर्तुळातील सूर उस्मानाबाद अखिल भारती मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया लोकशाहीला मारक आहे. एकूण आजीव सदस्य संख्येच्या केवळ १२ ते १३ टक्के सदस्यांच्या मतावरच संमेलनाध्यक्ष निवडला जातो. त्यामुळे अन्य आजीव सदस्यांच्या मतांचा महामंडळ अवमान करीत असल्याचा सूर साहित्य वर्तुळातून उमटू लागला आहे. |
औरंगाबाद/प्रतिनिधी ‘सजग महिला संघर्ष समिती’च्या वतीने २ डिसेंबर औरंगाबादेत ‘सून संमेलन’ घेतले जाणार आहे. या संमेलनाला राज्यभरातून ‘सुना’ उपस्थित राहणार आहेत. |
परभणी/वार्ताहर शेतीमालाचे बाजारभाव कोसळल्यानंतर शेतकरी आपले उत्पादन विकतो तेव्हा त्याला समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे परभणी बाजार समितीने शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही, तोवर शेतीमालाची साठवणूक करण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला आहे. |
बीड/वार्ताहर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मिळूनही २५ टक्केही रक्कम खर्च झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बाजूला निधी नसल्याची ओरड आणि दुसऱ्या बाजूला निधी मिळून खर्च न करण्याची मानसिकता या कात्रीत आरोग्याचे मात्र तीन तेरा वाजले आहेत. |
औरंगाबाद/वार्ताहर समाजाच्या प्रगतीचे चक्र सेवाकार्यामुळेच गतिमान होईल. त्यामुळे देशात पुन्हा सुवर्णयोग अवतरेल, असे प्रतिपादन संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष प्रकाश पाठक यांनी केले. |
बीड/वार्ताहर ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्यास त्याने स्वच्छतागृह बांधल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून स्वच्छतागृह बांधण्यास मुदत देऊनही त्याचे बांधकाम न करणाऱ्यांना आता थेट निवडणुकीलाच मुकावे लागणार आहे. |
हिंगोली/वार्ताहर आपसातील भांडण-तंटय़ामुळे कोर्टकचेरीच्या कामात पैसा-वेळ वाया जातो. गावात अशांतता निर्माण होऊन गाव विकासापासून वंचित राहते. मात्र, तंटामुक्तीतून गावाचा विकास साधता येतो. यासाठी गाव तंटामुक्तीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार राजीव सातव यांनी केले. |
बीड/वार्ताहर शहरातील बार्शी रस्त्यावरील मोठय़ा पुलाची दुरुस्ती करण्यासाठी ८० लाख ५४ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या पुलाचे नूतनीकरण केले जाणार आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला. |
हिंगोली/वार्ताहर कविता ही सांकेतिक अलंकारात अडकून पडता कामा नये. भावनांचे उत्स्फूर्त चित्र कवितेत उमटवणे गरजेचे असते. आजकाल अनाहूत विषय कवितेत मांडून केवळ कविता गायन अनुकूल करण्याचा प्रयत्न कवी करीत आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 26 |