परभणी/वार्ताहर केंद्र सरकारच्या नव्या आर्थिक धोरणातूनच भ्रष्टाचार व विध्वंसक विकासाला चालना मिळाली. या धोरणांविरुद्ध समाजवादी मूल्यांवर आधारित समन्यायी विकासाच्या पर्यायासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष लढा देत असल्याचे प्रतिपादन पक्षाचे राज्य सरचिटणीस कॉ. डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले. |
लातूर/वार्ताहर भारतीय मजदूर संघ लातूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच केशवराज विद्यालयात पार पडली. या बैठकीत सरचिटणीसपदी विजय गोढाळकर यांची तर अध्यक्षपदी भरत चेरेकर यांची निवड करण्यात आली. |
त्रुटी दूर करण्याचा ‘मानव विकास’चा आदेश हिंगोली / वार्ताहर, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी मानव विकास मिशनच्या माध्यमातून ‘गाव ते शाळा’ उपक्रमांतर्गत उपलब्ध केलेल्या एस.टी. बसवाहतूक व्यवस्थेत मोठा सावळागोंधळ असल्याचे आढळून आले. |
लातूर/वार्ताहर शहरातील सदानंद दत्त मठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती (बालस्वामी) महाराज (वय १०५) यांचा समाधी सोहळा सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मंदिराच्या परिसरात पार पडला. |
१६ डॉक्टरांविरुद्ध प्रकरणे न्यायप्रविष्ट जालना / वार्ताहर प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे (‘पीसीपीएनडीटी’) उल्लंघन केल्याच्या आरोपावरून जिल्हय़ात १६ डॉक्टरांविरुद्धची प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. |
आंतरराष्ट्रीय अॅक्युपंक्चर परिषद औरंगाबाद - इंडियन अॅकॅडमी ऑफ अॅक्युपंक्चर सायन्सतर्फे सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन औरंगाबाद येथे ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले. |
डेंग्यूने पीडित १०, स्वाइन फ्लूच्या ३ रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद / प्रतिनिधी मराठवाडय़ासह जळगाव न नगर जिल्ह्य़ांतील वेगवेगळ्या ठिकाणचे डेंग्यूने पीडित ६० ते ७० रुग्ण सध्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय स्वाइन फ्लूचेही नव्याने ३ रुग्ण दाखल झाल्याची माहिती शनिवारी मिळाली. |
प्रदीप नणंदकर / लातूर महापालिकेचे सुमारे ७५ कर्मचारी महसूल अधिकारी व पुढाऱ्यांच्या दिमतीला आहेत. परिणामी, शहरातील सार्वजनिक स्वच्छतेबाबत दैनंदिन कामकाजाला खीळ बसत आहे. |
शेतकऱ्याला रक्कम देण्यास टाळाटाळ उस्मानाबाद सरकारकडून संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणारे ३८ लाख रुपये शेतकऱ्याला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शनिवारी न्यायालयाने जप्तीची कारवाई केली. |
बीड / वार्ताहर जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्त्वावरील वर्ग ४च्या ६९ कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयानुसार व शासन नियमातील तरतुदीनुसार सेवाज्येष्ठता, तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग ३च्या पदावर नियुक्ती देण्यात आली. |
नांदेड / वार्ताहर शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरटय़ांनी मोठा धुमाकूळ घातला. शुक्रवारी रात्री शहरालगत पेट्रोलपंपावर झालेल्या दरोडय़ानंतर शनिवारी भरदिवसा एका इसमाची दोन लाख रुपयांची बॅग चोरटय़ांनी लंपास केली. |
हिंगोली / वार्ताहर जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. रोजगार हमी योजनेची माहिती सभागृहाला न दिल्याने हिंगोली, कळमनुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. |
औरंगाबाद / प्रतिनिधी आयटीएस हटाओ, बीएसएनएल बचाओ आणि बीएसएनएल बचाओ, देश बचाओ अशा घोषणा देत बीएसएनएल बचाओ सप्ताहाचा शनिवारी मानवी साखळीने समारोप करण्यात आला. |
खा. दुधगावकर, आ. रेंगे यांनी घेतली भेट परभणी / वार्ताहर अन्य महापालिकांप्रमाणे परभणी महापालिकेला सहायक अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती खासदार गणेश दुधगावकर व आमदार मीरा रेंगे यांनी दिली. ज्या अर्थी परभणी मनपाला सहायक अनुदान देण्यास मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे, त्या अर्थी स्थानिक संस्था कराला स्थगिती मिळणार असा दावा खासदार दुधगावकर यांनी केला. |
परभणी/वार्ताहर ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२ पूर्णा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल चित्रा प्रशांत पाटील यांचा मृतदेह पोलीस वसाहतीतील घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. चित्रा यांची हत्या की आत्महत्या हे अजून निष्पन्न झाले नसून, पोलिसांनी मात्र त्यांची हत्याच झाल्याचा संशय व्यक्त केला. |
औरंगाबाद/प्रतिनिधी मराठवाडय़ातील बहुतांश नगरपालिकांमध्ये पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. निधी वेळेवर न मिळाल्याने योजना रखडल्या, तशा योजनेचे अंदाजपत्रक नाहक वाढविल्यामुळेही त्या गुंतागुंतीच्या झाल्याचे मत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी व्यक्त केले. |
लातूर/वार्ताहर दिवसेंदिवस डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासन चांगलेच त्रस्त झाले आहे. जिल्हाभरात घरोघरी जाऊन पाणीसाठे तपासण्याचे काम सुरू आहे. त्यात अळय़ांचे प्रमाण प्रचंड असल्याचे आढळून आले. |
आसाराम लोमटे / परभणी स्थानिक संस्था करावरून व्यापाऱ्यांनी चालवलेल्या बेमुदत ‘बंद’चा आडमुठेपणा वाढला असताना, सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी मौन धारण केल्याने या ‘बंद’मध्ये हस्तक्षेप करण्यास कोणी उतरावे, असा प्रश्न शेवटच्या टप्प्यात निर्माण झाला. |
प्रदीप नणंदकर / लातूर लातूर महापालिका क्षेत्रात गुरुवारपासून एलबीटी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी पहिल्याच दिवशी ‘लातूर बंद’ची हाक दिली, तसेच १५ नोव्हेंबरनंतर बेमुदत ‘बंद’ची घोषणा केली. परंतु एलबीटीच्या मुद्यावरून आता राजकारण फेर धरू लागल्याचे दिसते. |
जालना/वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य विभाग या बाबत गंभीर नसल्याच्या तक्रारी राजकीय पक्ष, संघटना व लोकप्रतिनिधी करीत आहेत. डेंग्यूसदृश रुग्ण आढळत असल्याच्याही तक्रारी आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 5 of 26 |