परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे परभणी/वार्ताहर - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२ आयटीप्रणीत मनपा कामगार कर्मचारी युनियन व महापालिका यांच्यात यशस्वी वाटाघाटी झाल्याने बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांनी आपला संप अखेर मागे घेतला. वाटाघाटीत थकीत ४ महिन्यांच्या वेतनापैकी २ महिन्यांचे वेतन उद्याच (गुरुवारी) रोख स्वरूपात अदा करण्याचे ठरले.
औरंगाबाद मनपाची झोळी दुबळी औरंगाबाद/प्रतिनिधी दिवाळी बोनससाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना बुधवारी तुटपुंजी का असेना, रक्कम देण्याचे ठरविण्यात आले. वर्ग ३च्या कर्मचाऱ्यांसाठी अडीच हजारांची अग्रीम रक्कम, वर्ग ४च्या स्थायी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान, बालवाडी तसेच वर्ग ४च्या इतर कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय महापौर कला ओझा यांनी जाहीर केला.
परभणीत कापूस खरेदीस प्रारंभ; क्विंटलला ४२३१ रुपये भाव
परभणी/वार्ताहर परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात बुधवारी खासगी व्यापाऱ्यांमार्फत कापूस खरेदीस प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल ४ हजार २३१ रुपये कापसास दर मिळाला. जवळपास १ हजार ९०० क्विंटल कापसाची खरेदी झाली.
लातूर मनपाचा आडमुठेपणा लातूर/वार्ताहर शहर बसवाहतूक बंद करण्याची नोटीस संबंधित कंपनीच्या मालकाने अखेर लातूर महापालिकेला दिल्याने खळबळ उडाली. ऐन दिवाळीत मनपाच्या आडमुठय़ा धोरणामुळे शहर बसवाहतूक सेवा बंद होणार आहे. परिणामी जवळपास १० हजार प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
जालना/वार्ताहर राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार येथील समर्थ सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला.रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या ८ डिसेंबरला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पुरस्काराचे वितरण होणार आहे.