कॉंग्रेसमधील गटबाजी बघून पक्ष निरीक्षकांचा काढता पाय चंद्रपूर / प्रतिनिधी - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ येत्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी येथे आलेले निरीक्षक गिड्ड रुद्र राजू यांना कॉंग्रेस पक्षातील गटबाजीचा सामना करावा लागला. माजी खासदार नरेश पुगलिया व पालकमंत्री संजय देवतळे गटाच्या समर्थकांनी वेगवेगळय़ा ठिकाणी निरीक्षकांची भेट घेऊन लोकसभेसाठी दावेदारी सादर केली. |
सोमनाथ सावळे, बुलढाणा रिझव्र्ह बॅंक व नाबार्डचे जाचक र्निबध, टांगती तलवार असलेला बॅंकिंग परवाना, कोटय़वधीची थकित कर्जे यामुळे अडचणीत सापडलेली जिल्हा बॅंकेच्या व्यवहाराचे सर्व मार्ग बंद होऊ लागल्याने भयावह आर्थिक चक्रव्युहाच्या जाळ्यात फसली आहे. |
अमरावती / प्रतिनिधी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसल्याबरोबर त्यांच्या पगाराचा प्रश्न मिटला, पण कंत्राटदारांच्या थकित देयकांचा विषय अजूनही मार्गी न लागल्याने महापालिकेच्या विकास कामांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. |
चंद्रपुरातील बाजारपेठा सजल्या चंद्रपूर / प्रतिनिधी दिवाळीला अवघे काही दिवसच शिल्लक असतांना शहरातही विविध दुकानांमध्ये, बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. रांगोळीसाठी आवाज देणारे हातठेलेवाले, फुटपाथवरील पणती विक्रेते, रात्री दुकानांमध्ये लखलखणारे आकाशदिवे दीपावलीची जाणीव करून देत आहेत. अशावेळी अचानकपणे शुभेच्छापत्राद्वारे येणारा छानसा संदेश हा उत्साह आणखी द्विगुणित करतो. |
राजकीय मोर्चामध्ये अंतर्गत दुफळीचे दर्शन अकोला / प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या शिवसेना व मनसे यांच्या स्वतंत्र विषयावरील मोर्चात अंतर्गत दुफळीचे दर्शन झाले. दोन्ही राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत वाद प्रचंड प्रमाणात असल्याचे या मोर्चातून स्पष्टपणे दिसत होते, तर दोन्ही राजकीय पक्षांच्या या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांचा अभाव प्रकर्षांने जाणवत होता. |
बुलढाणा / प्रतिनिधी यावर्षी जिल्ह्य़ात पावसाचे अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा झाला नाही. शिवाय, कमी पावसामुळे खरीप उत्पादनात कमालीची घट आली. आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. डेंग्यूचा आजाराने थमान घातले आहे. |
भंडारा /वार्ताहर पारंपरिक पिकांमुळे शेतकरी मागे पडला, हे खरे आहे; परंतु जिल्ह्य़ातील आसगावसारख्या परिसरात समूहशेतीद्वारे भाजीपाला, फूलशेती करण्यासाठी शेतकरी पुढे आले, हे आशादायक चित्र आहे. या शेतकऱ्यांना तांत्रिक साहाय्य, कर्जपुरवठा होण्यासाठी पाहिजे ती मदत करू. |
पात्र उमेदवारास न्याय न दिल्यास मुक्तविद्यापीठासमोर आंदोलन चंद्रपूर/ प्रतिनिधी विदर्भातील प्राथमिक शिक्षकांना असभ्य वागणूक दिल्याने ओबीसी कर्मचारी असोसिएशनतर्फे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. या घटनेचा निषेध करून पात्र उमेदवारास तात्काळ न्याय देण्यात यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नरेंद्र इटनकर यांनी दिला आहे. |
वर्धा / प्रतिनिधी दिवाळी तोंडावर आली असतांनाच जिल्ह्य़ातील १७ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक क्षणोक्षणी वेतनाच्या प्रतिक्षेत तिष्ठत आहेत.वर्धा जिल्हा योजनेअंतर्गत येणाऱ्या १७ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा हा प्रश्न आहे. त्यांना सप्टेंबर-ऑक्टोबर अशा दोन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. |
आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग; बालकांच्या तपासणीस सुरुवात अकोला / प्रतिनिधी - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२ विझोरा येथील विनल सुनील उपरास या अकरा वर्षीय बालिकेला पोलिओ सदृश्य लक्षणे आढळल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. अद्याप या रुग्णास पोलिओ झाला आहे, असे म्हणता येणार नाही, असे मत पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ.ठोसर यांनी स्पष्ट केले. |
निवडणूक खर्च वसुलीवर अजब तोडगा! चंद्रपूर / प्रतिनिधी निवडणुकीत झालेला खर्च भरून काढण्यासाठी महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी अर्थपूर्ण भूखंडांचे आरक्षण हटविण्याचा ठराव पारित करण्याचा धडाका सुरू केला आहे. सर्वसामान्य मतदारांना कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना स्वतंत्र पक्ष वाटत असले तरी आरक्षण रद्द करण्यासाठी चारही पक्षाचे नगरसेवक सभागृहात एकत्र येत असल्याने भूखंड व्यापाऱ्यांसाठी हा व्यवहार अधिक सोयीस्कर झालेला आहे. |
वसंत सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू यवतमाळ / वार्ताहर सर्व खर्च वजा जाता जो पैसा शिल्लक राहील त्यामधूनच उसाला देण्यात येणारा भाव कारखाना ठरवू शकते, असे स्पष्ट मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी ४ नोव्हेंबरला वसंत सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. |
अकोला / प्रतिनिधी अकोट येथील शिवसेना आमदार संजय गावंडे यांच्या विरोधात काल, बुधवारी अकोट पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल १८ दिवसांपूर्वी झालेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर हे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाला राजकीय किनार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. |
बुलढाणा/प्रतिनिधी चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी येथे मोठय़ा प्रमाणावर अवैध देशी दारूची विक्री होते. त्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाकडे वळत असून अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. त्यामुळे गावातील अवैध देशी दारू विक्री बंद व्हावी, याकरिता गावातील महिलांनी अमडापूर पोलिसांना निवेदन दिले आहे. |
बुलढाणा/प्रतिनिधी अकोल्याहून चिखलीकडे परतणारी भरधाव इनोव्हा कार झाडावर आदळल्याने एकजण जागीच ठार, तर चारजण जखमी झाल्याची घटना आंबेटाकळी शिवारात ६ नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजणाच्या सुमारास घडली. |
बुलढाणा/प्रतिनिधी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आरोग्यमुक्त व ताणतणावविरहित जीवन जगण्याची कला शिकविणारे रविशंकर २० नोव्हेंबर रोजी लोणार येथे येत असून, त्यानिमित्त सत्संग व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सत्संगासह शेतीविषयक सकारात्मक दृष्टीकोन यावर ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे जि.प.चे सदस्य बाळासाहेब दराडे यांनी सांगितले. |
चंद्रपूर / प्रतिनिधी ‘स्नेहांकीत’ या सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात पहाटे ५.३० वाजता हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमात नाशिककर कलावंत आपल्या सुरावटींची रांगोळी रेखतील. |
चंद्रपूर /प्रतिनिधी अवैध दारू विक्री प्रकरणात मद्यविक्रेता चंद्रभूषण जयस्वाल याला अटक करण्यात हयगय केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी नागभीडचे उपनिरीक्षक सोमनाथ वाघ यांची तडकाफडकी बदली केली, तर तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. |
खडकपूर्णातून पाणीपुरवठा करण्याची मागणी बुलढाणा/प्रतिनिधी राष्ट्रमाता मॉं जिजाऊं च्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिरकल्याण धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने महिनाभरात शहरवासियांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणर आहे. त्यामुळे पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे. |
चंद्रपूर / खास प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२ शहराला लागून असलेल्या लोहारा गावात आदिवासींच्या ताब्यात असलेली कोटय़वधी किंमतीची १७१ एकर जागा बडय़ा बांधकाम व्यावसायिकांच्या ताब्यात देण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासनात हालचाली सुरू आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 1 of 17 |