भंडारा /वार्ताहर लाखनी येथील ग्रीनफ्रेंडस संस्थेने गेल्या आठ वर्षांत २०० हून अधिक पशुपक्षी, सरपटणारे प्राण्यांना जीवदान देऊन पर्यावरण रक्षणाचे मोलाचे काम केले आहे. नुकतेच लाखनी-सिपेवाडा मार्गावर एका शेतात चार फूट लांब, पोटात अंडे असल्यामुळे वजन वाढलेली मादी घोरपड ग्रीनफ्रेंडसच्या विद्यार्थी सदस्यांना आढळली. |
अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या |
|
|
चंद्रपूर / प्रतिनिधी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांगलवाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अशोक कुकचु कन्नाके याने दीपक नारायण कचिनवार याची डोक्यावर काठीने मारून हत्या केली. याप्रकरणी पोलीस पाटील नलेश भोयर यांच्या तक्रारीवरून अशोक कन्नाके याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. |
गोंदिया / वार्ताहर गोंदिया तालुक्यातील सावरी येथे शेतातील पाण्याचा बांध फोडल्याच्या कारणावरून उद्भवलेल्या भांडणात जातीवाचक शिवीगाळ करून शेतकऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. |
वार्ताहर / यवतमाळ यवतमाळ जिल्ह्य़ातील केळापूर तालुक्यात असलेले टीपेश्वर अभयारण्य विदर्भातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील वनविभागाचा मौलिक ठेवा आहे. तो आपण जतन करून ठेवला पाहिजे. पांढरकवडा वनविभागाचे फार मोठे वनक्षेत्र टीपेश्वर अभयारण्यात आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक ए.पी. गिऱ्हेपुंजे यांनी केले आहे. |
बुलढाणा / प्रतिनिधी दुष्काळी परिस्थिती असल्याने पीक आणेवारी ५० पैशांच्या आत काढण्यात यावी व सोयाबीनला ५ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, अशी मागणी आमदार विजयराज शिंदे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली. |
प्रा. डॉ. दत्तु शिंदे यांना आचार्य पदवी वाशीम/वार्ताहर येथील ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या साहित्यावर हिंगणघाट येथील प्रा. डॉ. दत्तू शिंदे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतीच आचार्य पदवी प्रदान केली आहे. |
* राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर वैदर्भीय नेत्यांच्या हालचालींना वेग * दिल्लीवाऱ्याही सुरू देवेंद्र गावंडे,चंद्रपूर,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२ आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर आता विदर्भातील नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. विद्यमान मंत्री लाल दिवा टिकावा म्हणून, तर इच्छुक नेते लाल दिवा मिळावा म्हणून पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यात सध्या व्यस्त आहेत. |
पक्षांतर्गत कलहाची किनार अकोला/प्रतिनिधी
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी गोपीनाथ मुंडे यांचा अकोल्याचा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाली. येत्या ५ नोव्हेंबर रोजी ते अकोल्यात येणार होते, पण त्यांचा दौरा रद्द झाल्याने भाजपमध्ये उलटसुलट चर्चाना पेव फुटले. अकोल्यात बंडखोरांचे बंड थोपविण्यासाठी हा दौरा रद्द झाल्याची चर्चा भाजप वर्तुळात होती. नागपूर येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित शेतकरी मोर्चाची तयारी अकोल्यात वेगाने सुरू झाली. |
रब्बी पिकांनंतर आता खरीपालाही फटका, जिल्हा प्रशासन ढिम्म सोमनाथ सावळे , बुलढाणा
रब्बी पिकानंतर पाऊस अवर्षणाचा आता खरीप हंगामाला जबरदस्त फटका बसत आहे. रब्बी हंगामाचे पेरणी क्षेत्र सत्तर टक्के घटले असून यंदा हिवाळ्यातच जिल्हाभर तीव्र पाणीटंचाईची बोंबाबोंब सुरू झाली आहे. जिल्ह्य़ातील सुमारे एक हजार गावांना पाणी टंचाई ग्रासणार असून या संदर्भात जिल्हा प्रशासन कुठलेही ठोस नियोजन व उपाययोजना करतांना दिसत नाही. |
यवतमाळ/वार्ताहर
आंध्रप्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्य़ातून अमरावतीकडे जात असलेल्या ६ लाख रुपयांचा २५ पोती गुटखा अन्न व औषधी प्रशासन विभाग व पांढरकवडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला. राज्यात गुटखा बंदी असली तरी यवतमाळ जिल्ह्य़ात गुटखा विक्री खुलेआम सुरूहोती. अन्न व औषधी प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांच्या जिल्ह्य़ातच गुटख्याची अवैध विक्री होत असल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागही अस्वस्थ होते. |
इंदूर-यशवंतपूर एक्स्प्रेसचे अमरावती जिल्ह्य़ात जोरदार स्वागत अमरावती / प्रतिनिधी इंदूर-यशवंतपूर या नवीन एक्स्प्रेस रेल्वे गाडीचे सोमवारी अमरावती जिल्ह्य़ात चांदूर बाजार आणि नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. अमरावती-नरखेड या रेल्वेमार्गावरून पहिली प्रवासी रेल्वेगाडी आज धावली. |
चंद्रपूर / प्रतिनिधी एका पिढी कडून कधीही संपुर्ण प्रश्न सुटत नसतात प्रत्येक पिढीतील लोकांनी पुढाकार घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आज आपण जास्तीत जास्त निकोप, शोषण विरहित व सदृढ समाज शिवधर्माच्या माध्यमातून निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, |
मुंबईतील टोळी नांदुऱ्यात गजाआड बुलढाणा / प्रतिनिधी गुप्तधन शोधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांडूळ जातीच्या सापांच्या तस्करीचे प्रमाण राज्यात वाढले आहे. अलिकडेच मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या मुंबईच्या सहा जणांना नांदुरा पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून इनोव्हा कारसह साप जप्त करण्यात आले. |
बुलढाणा/प्रतिनिधी सेंद्रीय खताच्या नावाखाली राख विकण्याचा गोरखधंदा २७ ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही धाडशी कारवाई खामगाव येथील प्रभारी डिवायएसपी उत्तम जाधव यांच्या पथकाने केली. |
गडचिरोली / वार्ताहर दैनिक ‘जनतेचा महानायक’चे मुख्य संपादक सुनील खोब्रागडे यांना या वर्षीचा विदर्भस्तरीय सामाजिक जाणीव पुरस्कार केमिस्ट भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला. |
नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे सूप वाजले चंद्रपूर / प्रतिनिधी बहुभाषिक होणे ही काळाची गरज असली तरी मातृभाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मातृभाषा ही मानवी मनासाठी अंगावरचे दूध आहे. मातृभाषेतून साहित्याची निर्मिती करून घराघरात साहित्य नेण्याचा संकल्प सोडत नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे सूप वाजले. |
गोंदिया / वार्ताहर गणित हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक कुटुंबात गणित विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानाला गणिताची जोड नसती तर मानवाने एवढी प्रगती साधली नसती. विद्यार्थ्यांनी गणित विषयाची अभिरुची राखल्यास त्यांना प्रगतीचे शिखर गाठता येते. |
वर्धा / प्रतिनिधी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली देवदर्शनाला निघालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या वाहनाला नगरजवळ झालेल्या अपघातात एक मुख्याध्यापक ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. |
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची अद्याप बैठकच नाही गडचिरोली/वार्ताहर, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
वर्धा-पैनगंगा नदीच्या संगमाजवळ प्राणहिता नदीवर आंध्रप्रदेशच्या सीमेत चवेला-श्रवंती या धरणाला आंध्रप्रदेश व महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे; परंतु या धरणाचा महाराष्ट्रातील जनतेला कोणताही फायदा होणार नसल्याने या धरणाला गडचिरोलीवासीयांकडून विरोध होत आहे. |
गडचिरोली जि. प. प्रशासनाची आयुक्तांकडून कानउघाडणी चंद्रपूर / खास प्रतिनिधी आरोग्य खात्याचे परिपत्रक धाब्यावर बसवून दुर्गम भागात नेमणूक झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या करणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाची विभागीय आयुक्तांनी चांगलीच कानउघाडणी केली असून या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 6 of 17 |