चंद्रपूर / प्रतिनिधी माना टेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. गुरुवारी माना टेकडी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. |
रावसाहेब शेखावत यांचा आता डॉ. सुनील देशमुखांवर पलटवार अमरावती / प्रतिनिधी अमरावती शहराचा खुंटलेला विकास आणि बकालपणाच्या मुद्यावर माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यावर शरसंधान केल्यानंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील घोटाळा डॉ. देशमुखांच्या कार्यकाळातच झाल्याचा प्रत्यारोप शेखावत यांनी केल्याने शहराच्या या दोन आजी-माजी आमदारांमध्ये आता वाक्युद्ध पेटले आहे. |
विद्युत कंपनीचे लोकपाल न्या. रोही यांचा सल्ला वर्धा / प्रतिनिधी न्यायाधिशांनी बोलावे कमी व ऐकावे अधिक त्यामुळे त्यांचीच कार्यक्षमता वाढते व न्यायदानाचे काम सोपे होते, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व विद्युत कंपनीचे विद्यमान लोकपाल के.जे.रोही यांनी यशवंत महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्रात बोलताना दिला. |
शेतकऱ्यांना दिलासा, पिकांना मिळणार जीवदान गोंदिया/ वार्ताहर जिल्ह्य़ातील धानपीक ऐन भरीस असताना महावितरणकडून सुरू असलेल्या ११ तासांच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र परसवाडा परिसरातील नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठविला. अखेर हे भारनियमन साडेचार तासांवर आणण्याचे आदेश देण्यात आले. |
अमरावती/प्रतिनिधी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी त्यांच्याच गटाचे अनंत साबळे यांचीही बिनविरोध निवड झाली. या दोन्ही पदांसाठी गुरुवारी निवडणुक झाली होती. |
यवतमाळ/वार्ताहर आर्णी येथील बालाजी जिनिंग व प्रेसिंगमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला. दिवसभरात ८५० क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती बालाजी जिनिंगचे संचालक बाळासाहेब निलावार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. |
भंडारा / वार्ताहर ‘ऊर्जा,शोध,संरक्षण आणि संवर्धन' या विषयावर राष्ट्रीय बालविज्ञान परिषद-२०१२ साठी स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयातील बालवैज्ञानिकांच्या एका चमूने ‘शालेय विद्यार्थ्यांच्या ऊर्जावापराचा आकृतीबंध' यावर अभ्यास केला. या प्रकल्पाची निवड धुळे येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय परिषदेत सादरीकरणासाठी झालेली आहे. |
बुलढाणा/प्रतिनिधी सामाजिक व राष्ट्रीय समस्यांचे आव्हान पेलून त्यावर मात करण्याची ताकद राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. संघाचे कार्य हे संघ शाखेच्या माध्यमातून राष्ट्राच्या परम वैभवासाठीच आहे, असे प्रतिपादन जळगांव जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व सहकार भारतीचे प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला यांनी केले. देऊळगांवराजा येथील संघशाखेच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. |
भंडारा/वार्ताहर दूध संकलन केंद्राच्या नोंदणीसाठी साडेचार हजार रुपये लाच स्वीकारताना दूध संकलन, तसेच विस्तार पर्यवेक्षक अधिकारी विनोद गणपत पंचभाई याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. |
सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याची संस्थेची अखंडित परंपरा यवतमाळ/वार्ताहर लोकमान्य टिळकांच्या नावाच्या वारशाला जपत आजवरच्या धुरंधरांनी निर्माण केलेल्या प्रेरक वाटेवर मार्गरत असणारे लोकमान्य टिळक महाविद्यालय म्हणजे या परिसरातील एक महनीय संस्था आहे. |
गोंदिया / वार्ताहर बनावटी औषधे, मुदतबाह्य़ औषधे व बंधनकारक औषधांची विक्री करणे या संदर्भात औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत विविध प्रकरणात जिल्ह्य़ातील ४८ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस, तर १९ विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रकारे एका विक्रेत्याचा परवानाही रद्द करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त मंडलेकर यांनी दिली. |
प्रतिनिधी / चंद्रपूर राज्यपालांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी दिली असून आता राज्य शासनास शिकार आणि इतर माहिती देणाऱ्या संबंधित खबऱ्यांना गुप्तसेवा निधी अंतर्गत मदत दिली जाणार आहे, तसेच जंगलव्याप्त गावात पोलीस पाटलाच्या धर्तीवर वनपाटील नेमले जाणार आहेत. |
वर्धा / प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२ आरोपांच्या फै रींमुळे ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आगामी दोन दिवसातील वर्धा जिल्ह्य़ातील कार्यक्रम रद्द केल्याने कार्यकर्त्यांवर निराशेचे मळभ पसरले आहे.
|
यवतमाळ / वार्ताहर येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सुलभ शौचालयाजवळील झुडपात चार दिवसांची जिवंत मुलगी एका कापडात गुंडाळून असल्याचे आढळून आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्या मुलीचे जन्मदाते म्हणवणाऱ्या वडिलांनी यवतमाळ पोलिसांक डे धाव घेऊन आपबिती सांगितली. पंजाब खांदवे, असे या मुलीच्या वडिलांचे नाव आहे. |
अमरावती / प्रतिनिधी ‘तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी’ असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे संत गाडगेबाबा यांच्या वलगाव येथील दुर्लक्षित समाधीस्थळाचा कायापालट होण्याचा मुर्हूत अखेर सापडला आहे. हे समाधीस्थळ विकसित करण्यासाठी सुमारे ३७ कोटी ८६ लाख रुपयांच्या खर्चाला सरकारने अखेर मंजूरी दिली आहे. |
गोंदिया / वार्ताहर रोजगार हमी योजनेत बनावट मजूर दाखवून त्यांच्या मजुरीची उचल करणे, बोगस हजेरीपत्रक भरणे, संकेतस्थळावर मृत मजुरांची नावे टाकणे, या प्रकारामुळे या योजनेला चांगलेच गालबोट लागले होते. |
अकोला / प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्य़ातील सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्रात अनियमितता नसल्याचा दावा कार्यक्रम समन्वयक डॉ.प्रा.रविंद्र वाघमारे यांनी केला आहे. |
वाशीम / वार्ताहर वाशीमकरांचे आराध्य दैवत असलेल्या येथील बालाजी मंदिरात बालाजी संस्थानच्या वतीने आयोजित वार्षकिोत्सवास १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून हा उत्सव ३० ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती बालाजी संस्थानचे विश्वस्त ज्ञा. ना. काळू यांनी दिली. |
गोंदिया / वार्ताहर देवरीतील समाजकल्याण विभागाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या बाप्पा समाजकल्याण वसतिगृहातील एका मुलाला डायरियाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सातवीचा विद्यार्थी डेमेश्वर सोनकुकरा (१३) असे मृत मुलाचे नाव आहे. |
चंद्रपूर / प्रतिनिधी आदिवासी साहित्य जागर व जतन अकादमीतर्फे प्रायोजित दुसरे आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन भंडारा येथे १७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 7 of 17 |