सेवाकाळ मात्र दोन वर्षांनी कमी होणार भंडारा/वार्ताहर
एसटी कामगार संघटनेद्वारे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ दोन वर्षांनी कमी करून त्यांना २००० रुपये वेतनवाढ देण्याची तयारी एसटी प्रशासनाने दर्शविली. यामुळे वाढत्या महागाईच्या काळात कनिष्ठ कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.स्टेट ट्रॉन्सपोर्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी १० ऑक्टोबरला विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. |
उत्पादन खर्च, मजुरीचे वाढते दर आणि पडलेले भाव सोमनाथ सावळे , बुलढाणा
नगदीचे खरीप पिक सोयाबीनच्या काढणी मळणी हंगामाला जिल्हयात सर्वत्र जोरात प्रारंभ झाला असून सोयाबीनच्या उताऱ्यात झालेली अर्धी अधिक घट, मजूरांची चणचण, मजुरीचे वाढलेले भाव, मळणीयंत्राचे व वाहतूकीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिक उत्पादनाच्या वाढत्या खर्चाचा सामना तो करीत असतांना सोयाबीनचे भाव गडगडल्याने त्याच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. |
गोंदिया / वार्ताहर
राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या वीज दरवाढीमुळे संकटात आलेल्या लघुउद्योजकांनी येत्या २५ ऑक्टोबरला संपूर्ण उद्योग बंद ठेवून वीज दरवाढीच्या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील राईस मिलर्स असोसिएशनच्या पुढाकाराने घेतलेल्या या निर्णयाला विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. |
डॉ. माधुरी वाघ - ९४२२१०९९९३
ज्यावनस्पतीच्या नावाचा अर्थच ज्यातून गोंद निघतो असा होतो, अशी सर्ज वनस्पती म्हणजे वनस्पतीशास्त्रातील व्हेटेरिओ होय. याचा मोठा वृक्ष असतो. याच्या खोडातून चिरले किंवा कापले असता जखम भरून येण्यासाठी पांढरा स्त्राव स्त्रवतो. हा सुगंधी गोंद धुपनासाठी वापरतात. त्याला श्वेतरंगामुळे चन्द्रस किंवा पांढरे डांबर म्हणतात. दक्षिण-पश्चिम भारतात ही विशेष आढळणारी वनस्पती आहे. |
देवीचा महिमा यवतमाळ / वार्ताहर
माहुरची रेणुका देवी
दुर्गोत्सवासाठी विदर्भात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देवीच्या मंदिरात आणि केळापूरच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी हजारे भाविकांची दररोज गर्दी उसळत आहे. माहूर येथे रेणुका देवीचे ३०० वर्षांपेक्षा जास्त जुने हेमाळपंथी मंदिर आहे, तसेच माहूर गडावर महानुभावपंथी दत्त मंदिर, परशुराम मंदिर व महासती अनुसया मंदिर असल्याने भाविकांची या निर्सगरम्य परिसरात प्रचंड गर्दी उसळलेली आहे. |
चंद्रपूर/प्रतिनिधी
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंदू पाठक, डॉ.शरदचंद्र सालफळे, विश्वास लहामगे, प्रा.जयश्री कापसे गावंडे.
महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत चंदू पाठक यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने मूकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ, बुक व पेनचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.शरदचंद्र सालफळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मूकबधिर विद्यालयाचे संचालक विश्वास लहामगे, नाटय़कर्मी प्रा. जयश्री कापसे गावंडे, वीणा पाठक उपस्थित होत्या. याच समारोहात चंदू पाठक यांनी मूबबधिर विद्यालयाला सिंटेक्स टाकी भेट स्वरूपात दिली. |
यवतमाळ/वार्ताहर
यवतमाळ जिल्ह्य़ातील घाटंजी तालुक्यातील नेत्ररोगग्रस्त रुग्णांची नेत्र तपासणी करून आवश्यक असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान करण्याचा अत्यंत मानवतावादी प्रकल्प नागपूरच्या डॉ. महात्मे नेत्रपेढी व रुग्णालय, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, सत्य साई बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था दत्तापूर आणि मोवाडा गट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. |
प्राईमकॉन-२०१२ परिषदेचे उद्घाटन वर्धा /प्रतिनिधी
परिषदेचे उद्घाटन करतांना खासदार हंसराज अहीर.
वैद्यकीय महाविद्यालय आणि खासगी स्तरावर आरोग्यसेवा देणारे डॉक्टर यांच्या समन्वयातून ग्रामीण भागात सर्वदूर वैद्यकीय सेवा देणे शक्य असल्याने या दोघांतील सेतूबंधन दृढ झाले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार हंसराज अहीर यांनी सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात आयोजित प्राईमकॉन २०१२ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
|
बुलढाणा/प्रतिनिधी खामगाव येथील एमआयडीसीतील ट्रेन्ड पॅक कंपनीने कालपासून आपले उत्पादन अचानक बंद केले. त्यामुळे कामगारांनी गेटसमोर घोषणाबाजी व निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला. कंपनी अचानक बंद झाल्याने कामगारांवर ऐन दसरा-दिवाळीत बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. |
परभणी/वार्ताहर ‘परभणी फेस्टिव्हल’ निमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर ‘सबका मालिक एक’ महानाटय़ाने कळस चढविला. महानाटय़ास परभणीकर रसिकांनी स्टेडियम मैदानावर मोठी गर्दी केली होती. |
चंद्रपूर / प्रतिनिधी चंद्रपूरला होऊ घातलेल्या नवव्या मराठा साहित्य संमेलनासाठी चंद्रपूर नगरी सज्ज झाली आहे. येत्या २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान चांदा क्लब ग्राऊंड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. |
चंद्रपूर /प्रतिनिधी श्री संत गोपालकृष्ण व श्री संत नगाजी महाराज मंदिराच्या वतीने श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी बुधवारला आयोजित करण्यात आलेला आहे. |
भंडारा / वार्ताहर जिल्ह्य़ातील गुन्ह्य़ांच्या तपासात विशेष कामगिरी करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केला. बँकेतून ५ लाख रुपयांची रक्कम नेताना अज्ञात इसमांनी पैशाची बॅग पळविली. |
अकोला /प्रतिनिधी अकोल्यात गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण शिक्षण व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अमोल सावंत यांना वसुंधरा मित्र व वनरक्षक गजानन चव्हाण यांना वसुंधरा रक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. |
वर्धा / वार्ताहर देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी निरपेक्षपणे काम करणाऱ्या नगर येथील स्नेहालय संस्थेच्या गिरीश व प्राजक्ता कुळकर्णी या दाम्पत्यांचा आजवर झालेला प्रवास मंगळवार २३ ऑक्टोबर रोजी येथे उलगडणार आहे. |
बुलडाणा बँकेतर्फे सावजींचा सत्कार |
|
|
बुलढाणा/प्रतिनिधी नारायण सुर्वे सनद पुरस्कार साहित्यिक गो.या.सावजी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे औचित्य साधून बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर यांनी सावजी यांच्या निवासस्थानी जाऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बुलढाणा अर्बनचे श्रीकांत धारकर, परमेश्वर शिंदे, विनोद मोरे उपस्थित होते. |
दसरा-दिवाळीत अंधाराचे साम्राज्य? सचिन देशपांडे अकोला, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
अपुऱ्या कोळसा पुरवठय़ाने राज्यातील महानिर्मितीच्या वीज निर्मिती केंद्रांना जबरदस्त तडाखा बसत असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन संच हे वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी तर, दोन संच बॉयलर टय़ूब लीकच्या कारणाने बंद पडले आहेत. कोळसा पुरवठा अनियमित असल्याने राज्य अंधाराच्या वाटेवर आहे. नाशिक वगळता राज्यातील सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कोळशाचा स्टॉक हा केवळ एक दोन दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. |
त्रास सर्वसामान्यांनाच पण बोलणार कोण? संजय राऊत गोंदिया
गोंदिया जिल्हा भंडारा जिल्ह्य़ातून १९९९ साली स्वतंत्र करण्यात आल्यानंतर या शहराला व लगतच्या परिसरात झोपडपट्टय़ांच्या संख्येत अचानक वाढ झाली. या झोपडपट्टय़ा देशी-विदेशी दारूचे अड्डे, जुगार, वरळी मटका व यातील सर्वात महत्वाचे ठरले ते भंगार विक्रेते. आता तर हे घर खाली करणाऱ्यांसह काही शासकीय तांत्रिक कारणांमुळे अडकलेल्या प्लॉटच्या खरेदी-विक्रीत सहकार्य करणाऱ्या दादांच्या पिट्टंचे केंद्र झालेले आहे. |
मोहन अटाळकर अमरावती राज्यात जलसिंचनाचा सर्वाधिक अनुशेष असलेल्या अमरावती विभागात सध्या बांधकाम सुरू असलेल्या ८० सिंचन प्रकल्पांचा उर्वरित खर्च १५ हजार ६९० कोटी रुपयांवर पोहचला असून नियोजनाअभावी भौतिक अनुशेष पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. |
गडकरींविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे वक्तव्य नाही देवेंद्र गावंडे चंद्रपूर राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आरोपाच्या फैरीत विदर्भातील काँग्रेस व भाजपचे नेते अडकले असले तरी एकमेकांचे विरोधक असलेल्या या राजकीय पक्षाचे स्थानिक नेते या आरोपांचा राजकीय फायदा उठवण्याऐवजी शांत बसले आहेत. या सोयीस्कर मौनाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 17 |