वर्धा / प्रतिनिधी गर्भलिंग निदान करणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्यासह तिच्या सासू-सासऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची तरतूद प्रसवपूर्व निदानतंत्र अधिनियमाअंतर्गत आता करण्यात आली आहे. |
यवतमाळ / वार्ताहर दुर्गोत्सवासाठी विर्दभात प्रसिध्द असलेल्या माहुरच्या रेणुका देविच्या मंदीरात आणि केळापुरच्या जगदंबा दविच्या दर्शनासाठी हजारे भाविकांची दररोज प्रचंड गर्दी उसळत आहे. |
वर्धा / प्रतिनिधी राष्ट्रीय पातळीवर दहा जिल्ह्य़ांत रासायनिक खतनियंत्रण प्रणाली हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी महाराष्ट्रातून वर्धा जिल्ह्य़ाची निवड या प्रकल्पाअंतर्गत झाली आहे. |
देवी महिमा प्रशांत देशमुख वर्धा गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ात गणेश मंडळांचा उत्साह ओसरून दुर्गा मंडळांची संख्या वाढल्याचे चित्र असून ऐतिहासिक देवीमंदिराच्या नवरात्रोत्सवासोबतच या सार्वजनिक मंडळांचाही उत्सव लोकप्रिय ठरला आहे. |
चंद्रपूर / प्रतिनिधी साहित्यिक अशोक पवार यांच्या ‘पडझड’ कादंबरीला लातूरचा शब्दवेल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध साहित्यिक द. ता. भोसले व संपादक शरद कारखानीस यांच्या हस्ते लातूर येथे एका शानदार सोहळ्यात अशोक पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रोख, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे आहे. |
बुलढाणा / प्रतिनिधी येथील एका खासगी रुग्णालयात देऊळघाटच्या ५० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूसदृश रोगाने मृत्यू झाल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले आहे. मृतमहिलेच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. |
भंडारा / वार्ताहर खेडय़ात राहून लिहिणाऱ्या साध्या, सामान्य साहित्यिकांना एक प्रतिष्ठेचे साहित्यिक व्यासपीठ मिळावे, याबाबतच्या प्रामाणिक तळमळीतून लाखनी येथे विदर्भ साहित्य संघ शाखेची स्थापना झाली व द.सां.नी अनेक उपक्रम घेतले. |
अकोला / प्रतिनिधी मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज महाविद्यालयातील प्रा. डॉ. राकेश बडगुजर यांची आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच म्हणून निवड झाली आहे. इराण येथे झालेल्या चाचणीत त्यांची निवड केली गेली. विदर्भातून ते एकमेव आहेत. |
गडचिरोली/ वार्ताहर नागरिकांच्या तक्रारीनंतर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या गडचिरोली येथील पथकाने चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील लक्ष्मी किराणा स्टोअर्सच्या गोदामावर छापा टाकून १२ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. |
बुलढाणा / प्रतिनिधी गोंधनखेड शिवारात अवैध रंधा मशीन आणि सागवान लाकडांसह दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्याची कारवाई वनविभागाने केली. |
चंद्रपूर / प्रतिनिधी अफूची अवैध साठवणुकीप्रकरणी दोन महिन्यांपासून फरार असलेले विकास पुंडलिक कहाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता १९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. |
राळ डॉ. माधुरी वाघ ९४२२१०९९९३ आज आधुनिक काळात देवीजवळ कृत्रिम सुगंधी कांडय़ा धूप म्हणून वापरत असले तरी ऊद, राळ हे खरे पूजेत प्रसन्नता आणणारे व वातावरण र्निजतुक करून प्रदूषणमुक्त करणारे खरे धुपन द्रव्य आहेत. राळ ही ‘शाल’ वृक्षापासून मिळणारा गोंद किंवा निर्यास आहे. |
देवीचा महिमा चंद्रपूर / प्रतिनिधी, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२
नवरात्र उत्सवाला आरंभ झाला असून शहरातील विविध सार्वजनिक मंडळांमार्फत दुर्गा व शारदामातेची स्थापना करण्यात आली. या मंडळातर्फे नऊ दिवस विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शहरातील विविध भागात दुर्गा व शारदामातेची मोठय़ा उत्साहात स्थापना करण्यात आली. शहरात अनेक लहान मोठी दुर्गा व शारदा मंडळे आहेत. संध्याकाळी वाद्यांच्या तालावर देवीची मिरवणूक काढण्यात आली. |
* वर्षांकाठी महापालिकेची लाखो रुपयांची कर हानी * अशा बांधकामांवर कारवाईची नगरसेवकांची मागणी चंद्रपूर / प्रतिनिधी क्लिनिकच्या बांधकामाची परवानगी घेऊन शहरातील निवासी परिसरात डॉक्टरांच्या खासगी हॉस्पिटल्सच्या अवैध इमारती उभारण्यात येत आहेत. महानगरपालिका व जिल्हा शल्यचिकित्सकांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष असून त्यामुळे महापालिकेला वर्षांकाठी लाखो रुपयांच्या कराला मुकावे लागत आहे, तर सर्वसामान्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. |
प्रशांत देशमुख / वर्धा केंद्र शासनाने कापूस निर्यातीला अनुदान द्यावे व राज्य शासनाने हमीपेक्षा २० टक्के जास्त भाव कापसाला द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी जागतिक बाजारपेठेच्या पाश्र्वभूमीवर केली आहे. |
बुलढाणा / प्रतिनिधी सातपुडय़ाच्या संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी व अरकचेरी या दोन सिंचन प्रकल्पामुळे प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील आदिवासींचे जीवन संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. |
अमरावतीत झोपडपट्टय़ांमधून गुन्हेगारांना आश्रय झोपडपट्टय़ामध्ये गुंडांचा सुळसुळाट अमरावती / प्रतिनिधी अमरावती शहर टोळीयुद्धामुळे अनेक वेळा वेठीस धरले गेले आहे. अनेक झोपडपट्टीदादांनी राजकीय पक्षांचा आश्रय घेतल्याने त्यांना आता उजळमाथ्याने वावरण्याची संधी मिळाली असली, तरी अवैध व्यवसायाच्या स्पध्रेतून किंवा राजकीय वैमनस्यातून टोळीयुद्धाचा भडका उडण्याचे प्रसंग घडले आहेत. |
बुलढाणा/प्रतिनिधी देऊळगावराजा शहराचे ग्राम दैवत श्री बालाजी महाराज यात्रेला घटस्थापनेपासून सुरुवात झाली असून किमान एक महिना चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान बालाजीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजात राज्यासह देशभरातील लाखो भाविक दाखल होणार आहेत. |
जालना/वार्ताहर राज्य साखर कामगार संघटना समन्वय समितीची राज्यपातळीवरील परिषद रविवारी (दि. २१) बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई येथे होणार असल्याची माहिती समन्वय समितीचे सरचिटणीस अण्णा सावंत यांनी दिली. |
बुलढाणा जिल्ह्य़ात ३२४६ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला बुलढाणा/प्रतिनिधी जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला असून त्या निवडणूक रिंगणातील ३२४६ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 10 of 17 |