जागतिक हात धुवा दिनात चंद्रपूर / प्रतिनिधी जागतिक हात धुवा दिन येथे १९ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार असून एकाच वेळी तीन लाख मुले येथे हात धुण्याचा धडा घेणार आहेत. |
गोंदिया / वार्ताहर केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद व त्यांच्या पत्नी लुईस खुर्शीद संचालक असलेल्या जाकीर हुसन ट्रस्टमधील सावळागोंधळ प्रसारमाध्यमांनी पुढे आणला आहे. |
लोबान-ऊद नवरात्र पूजनात देवीजवळ जाळला जाणारा ‘उद’ हा लोबान वृक्षाचा निर्यास आहे. या वृक्षाला वनस्पतीशास्त्रात स्टेरॉक्स बेन्झोइन ड्रायंडर म्हणतात, तर इंग्रजीत ‘बेन्झोइन’ म्हणतात. हा छोटा वृक्ष असून थायलण्ड, सुमात्रा, मलाया, सयाम या प्रदेशात ही झाडे आढळतात. |
यवतमाळात युवती मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद यवतमाळ / वार्ताहर मुख्यमंत्रीपदासाठी मी कधीच होकार दिलेला नाही. नकारच दिलेला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आज खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले. या पदासाठी अजितदादा पवारांना प्रोजेक्ट केले आहे आणि तुम्ही सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी ‘नकार’ देत नाही, पण एका म्यानात दोन तलवारी कशा सामावतील, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी पत्रकारांना असे सडेतोड उत्तर दिले. |
अकोला / प्रतिनिधी अकोला जिल्ह्य़ातील पारस औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक चार मंगळवारी बंद पडला. त्यामुळे सुमारे २५० मेगाव्ॉट विजेची निर्मिती ठप्प पडली आहे, तर येथील संच क्रमांक तीन त्याच्या निर्धारित क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने वीज निर्मिती करत असल्याची माहिती मिळाली आहे. |
व्यसनमुक्ती करणाऱ्यास मारहाण करून मद्यपींची पाठराखण वर्धा / प्रतिनिधी पोलीस दलाच्या व्यसनमुक्ती ओळखपत्राआधारे गावात व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्यास मारहाण करून मद्यपींची पाठराखण करणाऱ्या सेलूच्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची शक्यता आहे. |
वेकोलिच्या झोपडपट्टय़ांमध्ये कोळसा चोरीच्या टोळ्या सक्रीय झोपडपट्टय़ामध्ये गुंडांचा सुळसुळाट चंद्रपूर / प्रतिनिधी या शहराला लागून असलेल्या परिसरात, तसेच मध्यवर्ती भागात पावसाळी छत्र्यांसारख्या झोपडपट्टय़ा उगवल्या आहेत. या झोपडपट्टय़ा देशी-विदेशी दारूचे गुत्ते, देशी कट्टय़ांचे विक्री केंद्र, जुगार, मटका अड्डे, कोंबडा बाजार, भंगार विक्रेते, गाडय़ांची चोरी, अंमली पदार्थ व खंडणीचे केंद्र बनले आहे. |
गुगुळ आयुर्वेदातील ‘गुगुळ’ हा अति महत्त्वाचा औषधी घटक आहे. तीन हजार वर्षांपासून आयुर्वेद औषधांमध्ये एक प्रमुखतत्त्व म्हणून तो वापरला जातो. गुगुळ नावाच्या काटेरी वनस्पतीच्या खोडाच्या सालीतून मिळणारा सुगंधी निर्यास म्हणजे गमगुगुळ किंवा गुगुलिपीड होय. |
गडचिरोली / वार्ताहर येथील जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अर्जुन तांदळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून जिल्ह्य़ातील सर्व कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी २४ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे; मात्र या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कालपासून हे आंदोलन तीव्र करण्यात आले असून आता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विदर्भातील सहा जिल्ह्य़ात कामंबद आंदोलन सुरू केले आहे. |
अकोला / प्रतिनिधी धारदार चायनीज मांज्याने पक्ष्याचा बळी घेतला असून या जखमी पक्ष्याचे प्राण वाचविण्यासाठी पक्षीमित्र प्रभाकर जाधव यांनी अथक प्रयत्न केले. जाधव यांना हिवरखेड परिसरात हा जखमी पक्षी आढळल्यानंतर लगेचच त्यांनी राष्ट्रीय हरित सेनेचे प्रभारी प्रा.संतोष राऊत यांना माहिती देऊन हिवरखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. |
देवीचा महिमा अकोला / प्रतिनिधी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून येथील बाळापूरच्या बाळादेवीची ख्याती आहे. नवरात्रात बाळादेवीचे रोज दर्शन घेण्याचा प्रघात आहे. अकोला व नजीकच्या जिल्ह्य़ातील भाविक मोठय़ा संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात. |
बुलढाणा / प्रतिनिधी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्य़ात काल नवरात्र उत्सवाला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्य़ात आदिशक्तीची अनेक पुरातन, ऐतिहासिक व भव्यदिव्य मंदिरे आहेत. दुर्गा जगदंबेच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भक्तांनी गर्दी केली. |
यवतमाळ/ वार्ताहर बृहन महाराष्ट्र योग परिषद, हिरा उद्योग समूह व योग असोशिएशन नंदुरबार यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिर नंदुरबार येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३१ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्हा योग परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश नंदुरकर व सचिव प्रा. डॉ. साहेबराव साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ पुरुष व महिलांचा विविध वयोगटातील योगपटूंनी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. |
बुलढाणा/ प्रतिनिधी दर तीन महिन्यांनंतर अपंग पुनर्वसनाची बैठक घेण्यात यावी, अपंगांचे सर्वतोपरी पुनर्वसन क रण्यात यावे, अपंगांची हेळसांड करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, यांसह इतर मागण्यांसाठी येत्या २२ ऑक्टोबर रोजी जयस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अपंग विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. |
अकोला/ प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या विद्वत्त परिषदेवर डॉ. संजय खडक्कार यांची नियुक्ती कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांनी नियुक्ती केली आहे. येथील शिवाजी महाविद्यालयात सांख्यिकीशास्त्र विभागात ते विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. |
गोंदिया/ वार्ताहर शिर्डी व पुरी ही देशातील प्रमुख मोठी देवस्थाने व कोटय़वधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. येथे जाणाऱ्या भाविक व प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन गोंदिया माग्रे ‘पुरी-शिर्डी’ रेल्वेगाडी लवकरच धावणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. |
बुलढाणा / प्रतिनिधी मुस्लिमधर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रेकरिता बुलढाणा जिल्ह्य़ातून २६३ यात्रेकरू रवाना झाले आहेत. यात देऊळघाट येथील २२ आणि बुलढाण्यातील २१ यात्रेकरूंचा समावेश आहे. |
यवतमाळ / वार्ताहर राज्यातील तांत्रिक कारणामुळे रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देऊन कोर्ट-कचेऱ्या टाळून प्रकल्पांना गती देण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, |
चंद्रपूर / प्रतिनिधी स्वस्त धान्य दुकानातील केरोसीन खुल्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी ब्रह्मपुरी येथील आरीफ काशीमथाई लाखानी याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरीफ लाखानी यांना न्यायालयात हजर केले असता २० ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. |
अवैद्य धंद्यांचा सर्वाधिक त्रास महिलांना अकोला / प्रतिनिधी
अकोल्यातील शहर व लगतच्या भागात असलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे आहेत. झोपडपट्टी दादांच्या हस्तकांची येथे अधिक वर्दळ असल्याने मुळ दादांपर्यंत पोहोचण्यात यंत्रणा अपयशी ठरते. वरळी मटका, जनावरे व गाडय़ांची चोरी, खंडणी, दारूचे गुत्ते आणि अंमली पदार्थाचे मोठे केंद्र शहरातील या झोपडपट्टय़ा झाल्या आहेत. हे सर्व नष्ट करण्याची मानसिकता सक्षम नेतृत्वाअभावी अकोला पोलीस दलात दिसत नाही. शहरातील झोपडपट्टय़ांमधील अवैध धंद्यांचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. त्यामुळे भविष्यात याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 Next > End >>
|
Page 11 of 17 |