अमरावती / प्रतिनिधी लघुसिंचन प्रकल्पांच्या प्रत्यक्ष सिंचन क्षमतेविषयी एकीकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना अनुदान उपलब्ध असूनही अमरावती जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील लघुसिंचन प्रकल्पांच्या अनेक कामांना सुरुवातच झाली नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. |
संचालकाचे मत २५ लाखाला, कॉंग्रेसमध्ये फूट अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिवपदाची आज निवडणूक चंद्रपूर / प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उद्या होऊ घातलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिवपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने घोडाबाजार तेजीत असून एका संचालकाच्या मताची किंमत २५ लाखापर्यंत गेल्याने सर्वाधिक १५ संचालक असलेल्या कॉंग्रेस पक्षात उभी फुट पडली आहे. |
ऑक्टोबरात पृथ्वीजवळून जाणाऱ्या ७५ पैकी १२ उल्का धोक्याच्या सीमेवर चंद्रपूर / प्रतिनिधी ४ ते १२ ऑक्टोबर हा जागतिक अवकाश आठवडा म्हणून साजरा करण्यात येत असून या एकाच महिन्यात पृथ्वीजवळून ७५ लहान मोठय़ा उल्का जात आहेत. त्यातील १२ उल्का या धोक्याच्या सीमेजवळून जाणार आहेत, परंतु त्या पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नसल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे, असे येथील सेंट्रल इंडिया स्काय वॉच ग्रुपतर्फे कळविण्यात आले आहे. |
प्रशांत देशमुख वर्धा महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियानाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून देशपातळीवर निर्मल भारत अभियान राबविण्यात येत आहे. २०२२ पर्यंत संपूर्ण भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून या योजनेसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी दिली. |
गोंदिया / वार्ताहर आपसात बोलत असलेल्या पोलीस प्रशिक्षणार्थी महिला आपल्याचविषयी उलटसुलट बोलून आपली चेष्टा करत असल्याची शंका आलेल्या महिला पोलीस प्रशिक्षकाने त्यापकी एका महिला पोलीस शिपायास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना ३० सप्टेंबरच्या रात्री पोलीस मुख्यालय कारंजा येथे घडली, पण पोलिसांकडून सारवासारव व प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाले तरी अखेर आज या प्रकरणाचे बिंग फुटलेच. |
वाशीम / वार्ताहर वाशीम जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या अधिकाऱ्यांची पदे राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्वरित भरण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. |
बुलढाणा/ प्रतिनिधी शासनाचे निर्देश, निकष व मार्गदर्शक तत्त्वे डावलून जिल्हा परिषदेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या. याबाबत चौकशी अहवाल दडवून जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकांवर अन्याय करीत आहे. |
भंडारा / वार्ताहर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांतील सर्वाधिक अनुसूचित जाती व नवबौद्धांची संख्या भंडारा जिल्ह्य़ात सर्वाधिक असता भंडारा जिल्ह्य़ाला समाजकल्याण आयुक्तांनी रमाई घरकुल योजनेत फक्त २२५ घरकुलांचे उद्दिष्ट देऊन अन्याय केला आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सभापती हंसा खोब्रागडे यांनी केला आहे. |
शासकीय निधीचा गैरव्यवहार बुलढाणा/ प्रतिनिधी शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी खामगाव येथील पंचायत समितीचे तत्कालीन बीडीओ डी. आर. माडीवाले व नागापूर, वर्णा, जळका तेली ग्रा.पं.चे तत्कालीन सचिव पी. पी. डाखोले यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. |
संस्थेची परवानगी न घेता निवडणूक लढवली गडचिरोली / वार्ताहर गडचिरोली तालुक्यातील वसा-पोर्ला जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य विश्वास भोवते हे खासगी शिक्षण संस्थेद्वारा संचालित एका माध्यमिक शाळेत शिक्षक असतानाही त्यांनी संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र सादर न करताच निवडणूक लढवली. |
जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व्यापारी संकुल बांधकाम प्रकरण बुलढाणा/प्रतिनिधी, शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२ जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन व नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खोटय़ा दस्ताऐवजाद्वारे शासनाची फसवणूक करून कंत्राटदाराच्या फायद्यासाठी येथील जिजामाता प्रेक्षागारावर क्रीडा व्यापारी संकुलाचे अनाधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणास जबाबदार ३ जिल्हाधिकारी, २ जिल्हा क्रीडा अधिकारी, नगर परिषदेचे २ मुख्याधिकारी, तहसिलदार आणि संकुलाच्या बांधकामाचा कंत्राटदाराविरुध्द फसवणूक व अन्य कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. |
बोर अभयारण्यातील गावांना पाणीपुरवठा मंत्र्यांचा दिलासा वर्धा / प्रतिनिधी पाणीच पाणी चहूकडे, पिण्याला थेंबही नाही, असा अनुभव घेणाऱ्या बोरधरण परिसरातील गावकऱ्यांना राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी धरणालगतच पाण्याची टाकी बांधण्याची हमी देत मोठा दिलासा दिला आहे. |
डॉ. राणी बंग सरसावल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले चंद्रपूर / प्रतिनिधी समितीने अहवाल सादर केल्यानंतरही मुख्यमंत्री निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे बघून दारूबंदी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा दारूमुक्ती अभियान समितीने घेतला आहे. |
निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष अजूनही कायम अमरावती / प्रतिनिधी जिल्ह्य़ातील निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असले तरी भूसंपादनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तीन वर्षांपूर्वी थेट खरेदी पद्धतीत मिळालेल्या मोबदल्यापेक्षा कमी मोबदला आता मिळू लागल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष आहे. पुनर्वसनाचे कामही संथ गतीने सुरू आहे. |
भंडारा / वार्ताहर सत्तेतील मित्रपक्ष नेहमी काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. त्याने आघाडीचा धर्म पाळायला हवा. श्वेतपत्रिकेतून सिंचनक्षेत्रातील तथ्य लोकांसमोर आले पाहिजे, असे सांगून पक्ष मजबुतीकरिता एकजुटीचे आवाहन करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गावोगावी काँग्रेसचे अस्तित्व तपासण्याचे काम वेगात सुरू झाले असून, त्यात भंडारा जिल्हा मागे पडू नये, असे कार्यकर्त्यांना बजावून सांगितले. ते येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. |
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रथम वर्धापन दिनाचे उद्घाटन गडचिरोली/ वार्ताहर तरुणांना उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित विविध अभ्यासक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास, कामगार, लाभक्षेत्र विकास व फलोत्पादन राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी केले. |
वर्धा / प्रतिनिधी देशभरात अमलात येणाऱ्या निर्मल भारत योजनेच्या जनजागरण यात्रेचा शुभारंभ सेवाग्राम येथून उद्या ५ ऑक्टोबरला केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता होणार आहे. |
बुलढाणा / प्रतिनिधी युवतींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने खासदार सुप्रिया सुळे जिल्हा मेळावे घेत आहेत. त्यानुषंगाने ११ ऑक्टोबरला बुलढाणा येथे जिल्हा युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. |
अमरावती / प्रतिनिधी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ५१ वी आमसभा नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रा. प्रकाशराव काळपांडे होते. |
बुलढाणा/ प्रतिनिधी सामाजिक जाणिवेतून जिल्ह्य़ातील धडपडय़ा तरुणांनी स्थापन केलेल्या ‘स्पंदन जनसामान्यांचे’ या चळवळीच्या वतीने गडचिरोलीच्या जंगलात राहून आदिवासींना प्रकाशवाट दाखविणारे व त्यांचे जीवन सुखमय होण्यासाठी स्वत:चे जीवन वाहून घेणारे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई आमटे यांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी ७ ऑक्टोबर रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 Next > End >>
|
Page 16 of 17 |