भंडारा / वार्ताहर दि. भंडारा अर्बन को.ऑप. बँकेने २०११-१२ या वर्षांत े ३.३९ कोटी रुपये नफा मिळविला आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या ग्राहकांकरिता अनेक सोयी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड.जयंत वैरागडे यांनी भंडारा अर्बन बँकेच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. |
शिक्षक परिषदेकडून निर्णयाचे स्वागत गडचिरोली / वार्ताहर महाराष्ट्र शासनाने राज्यातील खाजगी अनुदानित शाळांना वेतन अनुदानाच्या ५ टक्के वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील संस्थाचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास ६२ हजार शाळांना होणार आहे. |
मोहन अटाळकर अमरावती, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या प्राधान्यक्रमाचा विषय ऐरणीवर आला असताना दहा वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या आंतरखोरे पाणी परिवहनाचे १३ प्रस्ताव मात्र पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पांसाठी लागणारा खर्च कोटय़वधींनी वाढला आहे. यादीत वाढलेल्या आणखी सात प्रस्तावांचे भवितव्यही टांगणीला लागले आहे. |
पालिका निवडणूक अमरावती / प्रतिनिधी चिखलदरा नगर परिषदेच्या सदस्यपदाच्या १७ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत नऊ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता हस्तगत केली आहे. काँग्रेसला ६ जागा, तर अपक्षांच्या वाटय़ाला दोन जागा आल्या. भाजप आणि शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवली होती. |
वर्धा / प्रतिनिधी सेवाग्राम आश्रमाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्य हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पावनस्थळ करण्याच्या हेतूने ३०० कोटी रुपये खर्चाचा ‘गांधी फॉर टुमारो’ हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली. |
गोंदिया / वार्ताहर दक्षिथ भारतात घोंघावत असलेल्या नीलम वादळाचा प्रभाव झाडीपट्टीलाही जाणवला. काही भागात जोरदार पावसाने धानाची कडपे तर कापणीसाठी आलेल्या उभ्या धानाला सर्वाधिक फटका बसला. |
नागपूर / प्रतिनिधी दिवाळीच्या सुटीत पुणे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. |
हल्ल्यात १२ जखमी, वनखाते ढिम्म बुलढाणा/प्रतिनिधी नजीकच्या जंगलात अन्न व पाण्याची वानवा असल्याने काही दिवसांपासून माकडांच्या टोळ्या शहरात घुसल्या असून त्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. या माकडांनी शहरातील तीन पोलिसांसह बाराहून अधिक नागरिकांना चावून जखमी केले आहे. |
वाशीम/वार्ताहर चोरटय़ा मार्गाने गुटखा विक्रीसाठी वाशीमच्या काळ्याबाजारात आणणारा ट्रक शुक्रवारी रात्री येथील स्थानिक गुन्हे शाखा व वाशीम शहर पोलिसांच्या पथकाने वाशीम-अकोला महामार्गावर पकडला. या गुटख्याची किंमत ८ लाख ४ हजार २४० रुपये असल्याची माहिती वाशीम शहर पोलीस ठाण्यात प्रभारी ठाणेदार परशुराम राठोड यांनी दिली. |
चंद्रपूर / प्रतिनिधी लगतच्या आंध्रप्रदेशातील आसिफाबाद येथून राजुरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या विरूर येथे बिबटय़ाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सोमा हनुमंतू जाभोर (५०) व मोहन तुकाराम रत्नम या दोघा जणांना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह नुकतीच अटक केली. |
जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी चंद्रपूर /प्रतिनिधी इतर मागासवर्गीयांकरिता राज्यघटनेत तिसरी अनुसूची तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती त्वरित वितरण करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. |
वाशिम जिल्ह्य़ात नवीन सदस्य नोंदणीस प्रारंभ वाशीम/ वार्ताहर ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मनसे जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये मनसेची शाखा आहे त्या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष नवीन आचार्य यांनी येथे रविवारी केला. |
गोंदिया/वार्ताहर गोंदिया शहराला आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सा देण्याकरिता सेंटल हॉस्पिटल येथे सेंटल आयुर्वेद व केरला पंचकर्म केंद्राचे उद्घाटन नुकतेच गोंदियातील आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. |
बुलढाणा/ प्रतिनिधी राहुल ऑटो पार्टस्मध्ये चोरी करणाऱ्याला चार वर्षे सश्रम कारावास आणि सहा हजार रुपयांचा आर्थिक दंडाची शिक्षा मलकापूर न्यायालयाने ठोठावली आहे. |
गोंदिया / वार्ताहर तिरोडा नगर पालिकेतील देवाजी पांडूरंग तिवडे कर्मचाऱ्याला एक हजार रुपयाची लाच घेताना ३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत खात्याने रंगेहाथ पकडले. |
बुलढाणा/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनाद्वारा आयोजित करण्यात आलेल्या शालेय क्रिकेट स्पध्रेत भारत विद्यालयाचे तिन्ही संघ जिल्हास्तरावर अजिंक्य ठरले असून या तिन्ही संघाची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा खामगाव, बुलढाणा व मलकापूर येथे पार पडल्या. |
यवतमाळ / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा १७ नोव्हेंबरला पुसद येथे आयोजित करण्यात आला असून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. |
कोटय़वधी रुपये खर्चूनही कुपोषणाचे भिजत घोंगडे मोहन अटाळकर / अमरावती ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
मेळघाटातील कुपोषणाच्या प्रश्नावर शासनाचे विविध विभाग गुंतलेले असताना सरकारी योजनांवर कोटय़वधी रुपये खर्चूनही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. गेल्या एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यात मेळघाटात २३३ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. |
महापालिका व महावितरणमधील संघर्षांचा परिपाक अकोला / प्रतिनिधी
महावितरणच्या मुख्य अभियंत्यांच्या घरावर महापालिकेने अशी कारवाई केली.
वीज बिलाच्या थकबाकीमुळे महापालिकेचे पथदिवे व पाणी पुरवठाचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला. या कारवाईच्या विरोधात महापालिका आयुक्तांनी महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याच्या घराच्या बांधकामाची परवानगी तपासली. ती नसल्यामुळे अखेर त्यांच्या घरावर महापालिकेने हातोडा चालविला. |
पावसाचे पाणी अडवून चौदा बंधारे आणि खोदले शंभरावर बोअर चंद्रपूर / प्रतिनिधी
जिवती या आदिवासी तालुक्यातील बहुतांश गावात अपारंपारिक पध्दतीने पावसाचे पाणी अडवून चौदा बंधारे व शंभरच्या जवळ बोअर खोदून उन्हाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागणारी पंधरा गावे टॅंकर मुक्त केली. भूजल सर्वेक्षण आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून हा यशस्वी प्रयोग राबविण्यात आलेला आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 3 of 17 |