गोंदिया जिल्ह्य़ात गरज ५० केंद्रांची उघडली मात्र तीनच! गोंदिया / वार्ताहर या जिल्ह्य़ातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळी गुण्यागोिवदाने साजरी करावी, याकरिता हलक्या प्रतीच्या धानाची कापणी करून ठेवली, परंतु राज्य मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून या धानाच्या विक्रीसाठी आधारभूत केंद्रच सुरू न झाल्याने शेतकऱ्यांवर घरात आलेला धान कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली. |
प्रशांत देशमुख / वर्धा काही पटवाऱ्यांना हाताशी धरून मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर लेआऊट टाकणाऱ्या भूमाफि यांविरोधात अखेर महसूल प्रशासनाने कारवाईचा फोस आवळला असून उद्या, ३ नोव्हेंबरला सर्व पटवाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वर्धा शहरालगत मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर लेआऊट टाकण्यात आल्याचे लोकसत्ताने यापूर्वीच निदर्शनास आणले होते. |
८५ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणी चंद्रपूर / प्रतिनिधी ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मृती स्मरणात राहाव्यात, या उदात्त हेतूने येथे ‘स्मृती लॉन’ व ‘साहित्यवन’ चे उद्घाटन आणि कोनशीला स्थापण्याचा कार्यक्रम उद्या, शनिवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या संमेलनस्थळी आयोजित केला आहे. |
वर्धा / प्रतिनिधी बालकामगार व वेश्याव्यवसायातील महिलांबाबत केंद्र व राज्य शासन पूर्णत: उदासीन असून स्वयंसेवी संस्थांचाच या घटकांना मोठा आधार आहे, असे मत समाजसेवी दांपत्य गिरीश व प्राजक्ता कुळकर्णी यांनी व्यक्त केले. तपोधन श्रीकृष्णदास जाजू स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. |
बुलढाणा/ प्रतिनिधी श्री बालाजी व लक्ष्मीच्या विवाह सोहळ्याचे प्रतीक असलेल्या विदर्भाचे तिरुपती देऊळगावराजाच्या श्री बालाजी महाराजांच्या ऐतिहासिक महोत्सवाची काल लळीत उत्सवाने शानदार सांगता करण्यात आली. |
अकोला / प्रतिनिधी जकात वसुलीच्या खाजगी अभिकर्त्यांस अकोला महापालिकेने मुदतवाढ दिली आहे. या संबंधीचा एक ठराव काल स्थायी समितीने मंजूर केला. दरम्यान, यास महापालिकेतील सत्तारूढ काँग्रेसमधील एका गटाचा विरोध होता. हा विरोध पाहता शिवसेनेने पुन्हा एकदा स्थायी समिती सभापतींना पाठिंबा देऊन भाजपला तोंडघशी पाडले. |
यवतमाळ/ वार्ताहर अपघातात जखमी झालेली एक मादी तडस बाजार समितीसमोरील पुलाच्या सिमेंट पाईपमध्ये फसल्याची घटना सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांच्या लक्षात आली आणि त्या तडसला वाघीण समजून पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी उसळली. |
भंडारा / वार्ताहर येथील गांधी विचार मंच आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गांधी विचारांचे यशाकरिता युवक शिबीर’ कोका (जंगल) येथे २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सुरू असून यात भंडारा जिल्ह्य़ातील १५० महाविद्यालयीन विद्यार्थी भाग घेत आहेत. |
चंद्रपूर / प्रतिनिधी येथील दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबर १९५६ साली धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला होता. त्या ऐतिहासिक घटनेला यावर्षी ५६ वर्ष पूर्ण झाली. या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्रच्या अंचल कार्यालयाद्वारे शीतपेयाचा व मार्गदर्शनपर स्टॉल लावून दीक्षाभूमीवर जाणाऱ्या बौद्ध बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. |
जिल्हा हिवताप अधिकारी निद्रावस्थेतच खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे १० रुग्ण चंद्रपूर / प्रतिनिधी - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२ महानगरपालिकेच्या कृपेने शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून त्यामुळे शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयांत डेंग्यूचे दहा रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. आयुक्त व सभापतींनी हिवताप अधिकाऱ्यांना पत्र लिहून फवारणी व धुरळणी करण्याचे निर्देश दिले असतानाही जिल्हा हिवताप अधिकारी निद्रावस्थेत आहेत. |
अमरावती / प्रतिनिधी संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाट कारीगर पंचायत, विदर्भ वैभव, ओलावा फाऊंडेशन, तसेच ‘एक पहल गाव के साथ’ या संस्था-संघटनांच्या संयुक्त सहकार्याने येत्या ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत मेळघाटात ‘सिपना शोधयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. |
चंद्रपूर / प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टतर्फे आरटीओच्या सहकार्याने शालेय व महाविद्यालयीन तरुणांना रस्ता सुरक्षेसंदर्भात जागरूक करण्यासाठी शहरातील विविध शाळांमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १२०० मुलांनी या अभियानाचा लाभ घेतला. |
वाशीम / वार्ताहर रिसोडच्या श्री. बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक प्रा. जयंतराव अमृतराव हेलाडे यांची भारतीय दलित साहित्य अकादमीद्वारा राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या २०१२च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी तीन मराठी नाटकांचे लेखन व विविध नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. |
यवतमाळ/ वार्ताहर अस्वलाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेंदूरशनी येथील अल्पभूधारक शेतकरी बंडू राठोड यांच्या कुटुंबीयांना सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश त्यागी यांच्या हस्ते १ लाख ९० हजारांचा धनादेश देण्यात आला. |
बुलढाणा/ प्रतिनिधी जिल्हास्तरीय धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली. मलकापूर रोडवरील भगवान बुद्ध, महात्मा जोतिबा फु ले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बहुजन महासंघाचे लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर, चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्याचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी सहभागी झाले होते. |
यवतमाळ / वार्ताहर अनतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या आपल्या बायकोचा खून करणाऱ्या पतीला दारव्हा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. संजय राठोड (२२) असे आरोपी पतीचे नाव असून तो आर्णी तालुक्यातील ितदोलीचा राहणारा आहे. |
बुलढाणा / प्रतिनिधी देशातील आणि आशिया खंडातील सर्वार्थाने प्रथम क्रमांकाची संस्था म्हणून नावलौकिक मिळविलेल्या बुलढाणा अर्बन बँकेची ए.टी.एम. सुविधा आता भारतातील विविध बॅंकांच्या ए.टी.एम.वर उपलब्ध झाली असून, यामुळे संस्थेच्या तमाम सभासद, ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. बुलढाणा अर्बन बँकेने मागील वर्षी कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांच्या वाढदिवसापासून संस्थेच्या ग्राहक, सभासदांसाठी ए.टी.एम. सेवेचा शुभारंभ केला होता. |
अमरावती / प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२ पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी उच्चाधिकार समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी एका ‘तपा’पासून प्रतीक्षेत असताना खारपाणपट्टा संशोधन केंद्रांचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे धूळखात पडून आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे या भागाच्या विकासाचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच ठरला आहे.
|
बुलढाणा / प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्य़ात डेंग्यूची भयावह साथ पसरली असून देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस खुर्द येथील डेंग्यूचा रुग्ण गजानन नामदेव पऱ्हाड याचा मृत्यू झाला आहे, तर खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा येथे डेंग्यूची साथ पसरली असून, सालीया सरफराज बेग या सात महिन्याच्या बालिकेला या रोगाची लागण झाल्याचे निदान खामगावच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. |
प्रशांत देशमुख / वर्धा सामाजिक कार्यक्रमात पाहुणे म्हणून जाताना वाढीव दराने प्रवास बिले उचलण्याचा आरोप झालेल्या ‘टीम अण्णा’च्या सदस्य किरण बेदी यांनी आता ताकदेखील फुं कून पिण्याचे ठरविले असून स्वखर्चाने हजेरी लावण्याची उपरती त्यांना झाल्याचे दिसून आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 17 |