मराठवाडय़ाच्या दबावापुढे नगरकरांचे लोटांगण? विखे वगळता नेत्यांचे मौन शेतीच्या मुळावर श्रीरामपूर/प्रतिनिधी भंडारदरा, निळवंडे, मुळा व नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर या धरणांतील १८ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. हे पाणी गेल्यास नगर जिल्ह्यातील शेतीसमोर व पुरक उद्योगांसमोर भर दिवाळीतच दिवाळे निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. |
माजी महापौरांचा ठिय्या प्रतिनिधी डेंगीसदृश आजाराने अखेर शहरातील एकाचा बळी आज घेतला. राहूल देवराम ठोकळ (वय २५) असे या युवकाचे नाव असून तो महापौर शीला शिंदे यांच्या प्रभागातील रहिवासी आहे. माजी महापौर संग्राम जगताप यांनी या मृत्यूबद्दल मनपा प्रशासन व पदाधिकारी यांना जबाबदार धरून आरोग्य विभागात सुधारणा झाली नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा दिला. |
प्रतिनिधी बहुचर्चित ठरलेली शिपाईभरती आणि संचालक मंडळाची नजिकच्या काळात संपणारी मुदत या पाश्र्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता व्यक्त होते. उद्या (शनिवार) नगरला ही सभा होणार आहे. |
खा. वाकचौरे यांची मागणी प्रतिनिधी खंडकरी जमीन वाटपाच्या प्रक्रियेत काही पैसेवाल्या टोळ्यांनी हस्तक्षेप सुरू केला असून तो थांबवावा व ही प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व्हावी, अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. |
मुख्यमंत्री करणार खंडकऱ्यांची दिवाळी गोड श्रीरामपूर/प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर गेली पन्नास वर्षे सुरू असलेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या लढय़ाची सांगता आता होत आहे. खंडकऱ्यांना जमिनीचे वाटप येत्या सोमवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होत असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. |
प्रतिनिधी महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक सचिन सुभाषचंद्र पारखी यांची निवड झाली. स्थायी समितीचे सभापती म्हणून निवड झाल्यावर बाबासाहेब वाकळे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता व त्यानंतर हे पद रिक्तच होते. |
पारनेर/प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील दुष्काळ नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित असल्याची टीका ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली. पुणे जिल्ह्य़ातील नेत्यांमुळेच तालुक्याचे वाळवंट झाले, असे ते म्हणाले. |
फसवणूक व १९ लाखांचा अपहार ग्राहक भांडारात दुसरी घटना प्रतिनिधी अहमदनगर मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार संस्थेतील सुमारे १९ लाख रुपयांच्या अपहार, फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून जिल्हा उपनिबंधक, तत्कालीन प्रशासक, तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. |
प्रतिनिधी शहर पाणी पुरवठा योजना अत्यंत नाजूक झाली असून मुळा धरणावरील उपसा केंद्रात अवघ्या ५ मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडीत झाला तरीही सगळ्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. पाणी पुरवठा विभागाच्या पत्रकातच तशी माहिती देण्यात आली आहे. |
वाहनांची हवा सोडून दिली कर्जत/वार्ताहर कर्जत तालुका शेतकरी संघटनेने उसाच्या दरासाठी आज राशीन येथील अंबालिका साखर कारखान्याच्या ५० बैलगाडय़ा व काही ट्रेलरची हवा सोडून देत आंदोलन केले व पोलिसांच्या मदतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापकाला चपराक दिली. |
जलसिंचन श्वेतपत्रिकेचा दणका श्रीरामपूर/प्रतिनिधी जलसंपदा विभागात चाऱ्या दुरूस्तीच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा गफला झाला आहे. अनेकदा तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. आता सिंचनावरील श्वेतपत्रिका तयार करण्याचे काम सुरू झाले. |
पदाधिकारी, अधिकाऱ्यांना कडक इशारा कोपरगाव/वार्ताहर सामान्य जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, तसेच अधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीसह सर्व नगरसेवकांनी आज कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिला. |
श्रीरामपूर/प्रतिनिधी शहरातील सुभाष कॉलनी येथे बांधण्यात आलेल्या साई मंदिरात माजी आमदार जयंत ससाणे व त्यांची पत्नी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. कलशारोहण सोहळा अडबंगनाथ आश्रमाचे मठाधिपती हभप अरुणगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. |
कोतकर बंधूंचा अर्ज फेटाळला प्रतिनिधी - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२ अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी, माजी महापौर संदीप कोतकरसह त्याचे बंधू सचिन व अमोल कोतकर या तिघांनी जिल्हाबंदी शिथील करावी या मागणीसाठी केलेला अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे या तिघांची जिल्हाबंदी कायम राहिली आहे. |
कुकडीचे आवर्तन सुरू कर्जत/वार्ताहर पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांसाठी कुकडीचे रब्बी आवर्तन आज सोडण्यात आले. मात्र, अद्याप पाणी कोणत्या तलावात सोडायचे, ते चौंडीपर्यंत जाणार की नाही, कर्जत तालुक्यातील कोळवडी उपविभागांतर्गत किती दिवस आर्वतन देणार, याबाबत कुकडीच्या अधिकाऱ्यांना कोणतेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाही. त्यामुळे अधिकारी संभ्रमात आहेत. |
‘व्यापाऱ्यांनी ओळखपत्र तपासावे’ प्रतिनिधी स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली करताना कर्मचाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांबाबत शंका आल्यास त्याच्याकडे ओळखपत्र मागावे किंवा मनपाच्या एलबीटी कार्यालयाशी संपर्क (मोबाईल-९५६११११९६७ ) साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. |
प्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्या परवानगीशिवाय जनावरांच्या छावण्या बंद करू नयेत तसेच थोडा पाऊस झाला म्हणून बंद करण्यात आलेल्या छावण्याही पुन्हा सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे पाचपुते यांनी सांगितले. बुऱ्हाणनगर (नगर) व मिरी-तिसगाव (पाथर्डी) या प्रादेशिक पाणी योजनांचे थकित ९५ लाख रुपयांचे वीज बील सरकारने भरावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. |
कोपरगावकरांची ‘दिवाळी!’ कोपरगाव/वार्ताहर दिवाळीच्या तोंडावरच अखेर कोपरगावकरांना गोदावरीच्या पाण्याने दिलासा दिला. नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी आज आवर्तन सोडण्यात आले. मात्र, कोपरगावकरांना ते येत्या सोमवारी मिळेल. |
प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१३-१४ या वर्षांच्या ३८३ कोटी ३८ लाख रूपयांच्या प्रारूप आराखडय़ास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. मागील वर्षीच्या प्रारूप आराखडय़ात यावर्षी ३७ कोटी ७७ लाख रूपयांची वाढ झाली आहे. |
कुकडीच्या वाहनांची तोडफोड कर्जत/वार्ताहर श्रीगोंदे तालुक्यात ऊसभावासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन आता चांगलेच चिघळू लागले आहे. त्यातूनच कुकडी कारखान्याच्या अनेक गाडय़ांचंी तोडफोड करून नुकसान करण्यात आले. या आंदोलनामुळे तालुक्यातील कारखानदार चांगलेच धास्तावले आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 1 of 21 |