शिक्षण संचालकांच्या कारवाईने खळबळ प्रतिनिधी वारंवार सूचना देऊनही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनुदान निर्धारणाचे काम अद्यापि पूर्ण न केल्याने शिक्षणाधिकाऱ्यांचे (प्राथमिक) वेतन, तसेच जिल्हा परिषदेचे वेतनेतर अनुदान थांबवण्याचे आदेश शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंके यांनी दिले आहेत. जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कार्यवाही करावी, |
राज्यात लागू करण्याचा आदेश प्रतिनिधी जिल्हा परिषदेने लोकसहभागातून केलेल्या कुपोषणमुक्तीच्या ‘नगर पॅटर्न’चे ‘युनिसेफ’ या अंतरराष्ट्रीय संस्थेने कौतूक केल्यानंतर आता या कामाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधानांच्या सल्लागाराचे पथक जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार आहे. कुपोषणमुक्तीचा ‘नगर पॅटर्न’ राज्यभर लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. |
प्रतिनिधी आमचे व्यवस्थापन आम्हाला करू द्या, त्यात बाहेरच्यांचा हस्तक्षेप नको या प्रमुख मागणीसाठी भारत संचार निगममधील सर्व कर्मचारी संघटनांनी संयुक्तपणे आज जिल्हाधिकारी कार्यालयार मोर्चा काढला. |
प्रतिनिधी नेवासे परिसरात बिबटय़ाचा धुमाकूळ सुरूच असून परवाच एका महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा बिबटय़ाच्या हल्ल्यात एक तरूण गंभीर जखमी झाला. तसेच बिबटय़ाचा शेळ्या फस्त करण्याचा सपाटाही सुरूच आहे. |
राहाता/वार्ताहर खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी वाटप करताना अधिकाऱ्यांनी कोणाचाही हस्तक्षेप सहन करू नये. शेतकऱ्यांना चांगल्या व वहिवाटीच्या जमिनी द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी देण्यासाठी काही मंडळी खंडणी मागत आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांनी केला. |
बोनसची चर्चा फिस्कटली प्रतिनिधी मनपा कर्मचारी युनियनच्या मागण्यांप्रमाणे कर्मचाऱ्यांना दिवाळीचे देणे द्यायचे झाल्यास मनपाला तब्बल १२ कोटी रूपये लागतील. एवढी मागणी पूर्ण करणे शक्यच नसल्यामुळे युनियन व प्रशासन यांच्यातील बोनससंबंधीची आजची बैठक अपेक्षेप्रमाणे फिस्कटली व नेहमीप्रमाणे युनियनने १ नोव्हेंबरपासून मनपाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याची नोटीस दिली. |
प्रतिनिधी फौजदारी, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दाखल झालेल्या फिर्यादीतील आरोपींपैकी संज्योती संजय मुथा यांना आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यांना काल (सोमवार) पुणे येथे अटक करण्यात आली होती. |
संगमनेर/वार्ताहर कामगार व शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त परवा (गुरूवार)विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मालपाणी लॉन्स येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन कडलग यांनी दिली. |
प्रतिनिधी कर्मचारी युनियनने बोनससाठी धरणे आंदोलनाचा दिला तसा काम बंदचा इशारा ठेकेदार युनियनने आज मनपाला त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मनपा काहीही करत नसल्याच्या निषेधार्थ दिला. |
पारनेर/वार्ताहर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अरूण ठाणगे यांची आज बिनविरोध निवड झाली.गंगाधर शेळके यांनी वैयक्तिक कारणासाठी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता. |
प्रतिनिधी जनसंघाच्या तत्कालीन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती शांताबाई देवगावकर यांचे आज पहाटे वृद्धत्वाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. जनसंघाचे दिवंगत नगरसेवक शांताराम देवगावकर यांच्या त्या पत्नी होत. |
प्रतिनिधी जिल्ह्य़ातील ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका काल जाहीर झाल्या. २६ नोव्हेंबरला मतदान व २७ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. या निवडणुकीची आचारसंहिता त्या त्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लागू झाली आहे. |
रामदास दिवेकर यांचे निधन |
|
|
प्रतिनिधी पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त लेखनिक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रामदास दिवेकर यांचे काल सकाळी मुंबईला मुलीकडे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, कन्या डॉ. संगीता दांडेकर, पाच भाऊ असा परिवार आहे. शहरातील ज्येष्ठ पत्रकार दा. वा. दिवेकर यांचे ते बंधू होत. |
भारतश्री किरण पाटीलची व्यायामशाळेला भेट भारतश्री किरण पाटील याने स्वामी विवेकानंद व्यायामशाळेला नुकतीच भेट दिली. जिल्ह्य़ाचा (शिर्डी) सुपुत्र असलेल्या किरणचे स्वागत राष्ट्रपती पुरस्कारविजेते मधुकर गायकवाड व महाराष्ट्र फूड सप्लीमेंटचे संचालक हनिफ शेख यांनी केले. |
मुख्य अभियंता पाटील यांचे आश्वासन प्रतिनिधी ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२ नगर एमआयडीसीच्या विस्कळीत पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी मुळा धरण ते एमआयडीसी दरम्यानची जलवाहिनी बदलून नव्याने टाकण्यात येईल, ८०० मिटरची जलवाहिनी तातडीने एक महिन्यात तर एका नवीन अतिरिक्त पंपिंग स्टेशनसह पूर्ण सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाची जलवाहिनी येत्या नऊ महिन्यात बदलली जाईल, |
नगर शहरात ७ जणांना बाधा प्रतिनिधी धामणगाव (ता. आष्टी) येथून नगर शहरातील नोबल रुग्णालयात दाखल झालेल्या सुमन ढोबळे या महिलेचे डेंगीच्या आजाराने आज निधन झाले. शहरात सध्या विविध खासगी रूग्णालयात डेंगीचे १२ रुग्ण दाखल असून त्यातील ७ शहरातील व ५ बाहेरगावचे आहेत. |
राजू इनामदार आंदोलन केले म्हणजे नगरसेवक असण्याचे कर्तव्य बजावले असा समज महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये पसरला आहे. काही नाही तर किमान आंदोलनाचा इशारा देणारे एखादे पत्रक तरी काढले पाहिजे, |
प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन’ राबवण्याचा व त्याअंतर्गत प्रकल्प सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. या समितीने पुढील सभेपर्यंत आराखडा सादर करण्याचे ठरले. |
पारनेरची दि. १५ ला निवड पारनेर/वार्ताहर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केला असून दि. १४ ते २४ नोव्हेंबर दरम्यान विविध ग्रामपंचायतींच्या नव्या सदस्यांची त्यासाठी बैठक बोलविण्यात आली आहे. पारनेरच्या सरपंच, उपसरपंचाची दि. १५ ला, तर भाळवणीची दि. २४ ला निवड होणार आहे. |
महसूल आयुक्तांनी केली पाहणी श्रीरामपूर/प्रतिनिधी राज्य शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना दिवाळीच्या धनत्रयोदशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमिनीचे वाटप केले जाणार असल्याने सरकारी यंत्रणेची लगीनघाई सुरू झाली आहे. नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त रविंद्र जाधव व जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी रविवारी उंदिरगावला भेट दिली. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 7 of 21 |