श्रीरामपूर/प्रतिनिधी येथील टिळकनगर इंडस्ट्रीजची मद्यविक्री व्यवहारात ६ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी हैदराबाद येथील मनोज रुपाले व रमेश बुद्रपूर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. |
सिंघमफेम अशोक समर्थची मुख्य भूमिका प्रतिनिधी ‘ट्रॅफिक जाम’ नावाच्या या चित्रपटाचा मुहूर्त आज सकाळी पाईपलाईन रस्त्यावरील प्रसिध्द शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत पार पडला. |
प्रतिनिधी शहरातील मे. सीताराम बिहाणी (बांगडीवाला) परिवाराच्या वतीने (स्व.) शेठ सुखदेव बिहाणी व (स्व.) शेठ शामसुंदरजी बिहाणी यांच्या स्मृतिनिमित्त दि. ३१ ऑक्टोबर ते २ नाव्हेंबर दरम्यान बाल व्यास जयाकिशोरी यांच्या ‘नानी बाई रो मायरो..’ या धार्मिक कथा आयोजित करण्यात आल्या आहेत. |
प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धा २०१२ साठी निवड झाल्याबद्दल महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे कर्मचारी रामदास ढमाले यांचा महापौर शीला शिंदे यांनी सत्कार केले व त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. |
कर्जत/वार्ताहर कर्जत व जामखेड तालुक्यातील भारत गॅस कंपनीचे वितरक सुभाष बावर हे प्रत्येक सिलेंडरमागे १७ रूपये जादा घेत आहेत. त्याची तक्रार करूनही या लुटीकडे जिल्हाधिकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार असे संबंधित सर्वच दुर्लक्ष करीत आहेत. |
श्रीरामपूर/प्रतिनिधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांच्या कुटुंबियांबद्दल खोटे आरोप करून बदनामीकारक वक्तव्य करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व रामदेवबाबा यांचा श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या बैठकीमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असा ठरावही बैठकीत करण्यात आला. |
श्रीरामपूर/प्रतिनिधी शहरातील वॉर्ड नंबर १ मधील गोपाळनगरमधील विनीत कोपनर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटय़ांनी सुमारे २० हजारांचा ऐवज लंपास केला. |
पोलीस प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन नगर- पोलीस भरतीत पूर्णत: पारदर्शकता असून परिपूर्ण उमेदवारांची निवड केली जाईल, उमेदवारांनी आपल्या जीवनात आयएएस, आयपीएस असे उच्च ध्येय ठेवावे, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व पारदर्शकता असेल तर यश निश्चितच मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले. |
जि. प. मध्ये विसंवादाचेच चित्र प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२ जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात डेंगी व स्वाईन फ्ल्यू रुग्णांचे प्रमाण वाढत असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग प्रतिबंधात्मक उपायांसाठी परस्परांवर जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र आहे. |
कामचुकारांवर कारवाईचा इशारा प्रतिनिधी महापालिकेच्या आरोग्य विभागावर सर्वानी कोरडे ओढून झाल्यावर आता खुद्द महापौर शीला शिंदे यांनीच या विभागाला धारेवर धरले आहे. विभागाच्या कामगीरीत सुधारणा झाली नाही तर शहरात अचानक फेरफटका मारून अस्वच्छचा दिसेल त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी आज दिला. आयुक्त विजय कुलकर्णी यांना महापौरांनी याबाबतचे लेखी पत्रच दिले. |
सावळीविहीर येथे २४ जणांना अटक राहाता/वार्ताहर दांडिया खेळण्याच्या कारणावरून तालुक्यातील सावळीविहीर येथे आज सकाळी दोन गटातील वाद मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत दंगल उसळल्याने सहाजण जखमी झाले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. |
जिल्हा रूग्णालयात महिलेची हेळसांड कर्जत/वार्ताहर स्वाईन फ्लूच्या साथीने श्रीगोंदे तालुक्यात आणखी एका रूग्णाचा बळी घेतला. विसापूर येथील महिलेचे या आजाराने काल (बुधवार) निधन झाले. या आजाराचा हा महिन्यातील दुसरा बळी असून आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी यामुळे मोठय़ा प्रमाणात नाराजी पसरली आहे. पालकमंत्र्यांच्याच तालुक्यात हा सलग दुसरा बळी गेला आहे. |
मनपात बोनसबाबत चर्चा सुरू प्रतिनिधी दिवाळीसाठी बोनस देण्याच्या विषयावर महापालिका आयुक्त व कर्मचारी युनियन यांच्यात आज चर्चा झाली. बोनससंबंधी काही निर्णय झाला नाही तर २९ ऑक्टोबरपासून मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा युनियनने दिला. |
ब्रिटनमध्ये वर्षभर संशोधन प्रतिनिधी जिल्ह्य़ाच्या सुकन्येने शिक्षणाच्या जोरावर थेट ग्रेट ब्रिटनमध्ये भरारी मारली. जगाच्या शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ फेलोशिप-२०१२ साठी सोनाली गणेश बऱ्हाटे यांची निवड झाली. वर्षभर त्या तिथे संशोधन करणार आहेत. |
प्रतिनिधी अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप कोतकर, तसेच त्याचे दोन भाऊ सचिन व अमोल कोतकर यांनी जिल्हाबंदी शिथील व्हावी यासाठी दाखल केलेल्या अर्जावर १ नोव्हेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे. |
कर्जत/वार्ताहर तालुक्यातील मांदळी येथील आत्मारामगिरी महाराज यांना अन्ननलिकेचा त्रास होऊ लागल्याने नगर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. |
प्रतिनिधी सत्ताधारी, विरोधक, नागरिक अशा सर्व स्तरांतून महापालिकेच्या कामकाजाबाबत ओरड होऊ लागल्याने आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आज मनपाच्या विभागप्रमुखांची बैठक घेतली व त्यांना कामात सुधारणा करण्याची तंबी दिली. कामचुकार कर्मचाऱ्यांची गय न करता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. |
उद्योगांच्या वीज दरवाढीचा निषेध प्रतिनिधी महावितरणने उद्योगांना लागू केलेल्या वाढीव दराचा महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअर्स असोसिएशनने निषेध केला आहे. |
प्रतिनिधी राजस्थानातील आदिवासी चित्रांच्या माध्यमातून आता नगरमार्गे थेट हैदराबादला (आंध्रप्रदेश) येथे पोहचतील. नगरच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांची ही चित्रझेप आहे. हैदराबादच्या नोवोटेल या पंचतारांकित हॉटेलच्या कलादालनात त्यांच्या या चित्रमालिकेचे प्रदर्शन होत आहे. |
प्रतिनिधी देशभरातील नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेले राष्ट्रीय कृषी प्रदर्शन नगरमधील स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावर दि. २३, २४ व २५ नोव्हेंबरला ड्रीम वर्क्स इव्हेंट कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 21 |