दक्षिणेत पावसाची प्रतिक्षाच प्रतिनिधी हस्ताच्या पावसाने हात दिल्याने जिल्ह्य़ाच्या उत्तर भागातील चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली आहे. उर्वरीत दोन तालुकेही सरासरीच्या जवळ पोहोचले आहेत. दक्षिण भागात मात्र हस्ताच्या पावसानंतरही बिकट स्थितीच आहे. जामखेड तालुका सरासरीच्या जेमतेम ५० टक्क्य़ांपर्यंत पोहोचला असुन उर्वरीत पाच तालुके दुष्काळाच्याच छायेत आहेत. |
प्रतिनिधी वादळी वारे व पाऊस यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून त्यामुळे पिण्याचे पाणी पुरवण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळवले आहे. |
खंडपीठाने अहवालही मागवला प्रतिनिधी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेला मरकडेय देवस्थान ट्रस्टने लावलेले कुलूप पोलीस बंदोबस्तात काढून त्याबाबतचा अहवाल उद्याच (गुरूवार) सकाळी १० वाजता सादर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज (दि. ३) सकाळी पोलीस अधीक्षकांना बजावला. या आदेशाची प्रत त्यांना सायंकाळी देण्यात आली. |
खा. वाकचौरेंची पंतप्रधानांकडे मागणी राहाता/वार्ताहर तीन वर्षांनी सन २०१५ मध्ये नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने याच पॅकेजमधून शिर्डीसाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे. वाकचौरे यांनी या संदर्भात पंतप्रधानांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, दर बारा वर्षांनी नाशिक येथे होणारा कुंभमेळा आता जवळ आला आहे. |
महेंद्र कुलकर्णी प्रशासनात राष्ट्रीय पातळीवर स्वत:च्या कामाची मोहोर उमटवलेले माजी जिल्हाधिकारी अनिलकुमार लखिना यांनी यथार्थ शब्दांत नगर शहराची व्यथा मांडली. त्याने नगरकर व्यथित झाले की नाही हे समजायला मार्ग नाही, नगरकरांना ताणे देताना लखिनांचा रोख स्पष्ट होता. मात्र, लेकीला बोलल्यानंतरही व्यासपीठावरील सुना मात्र ढिम्म होत्या, ही गोष्ट अधिक दुर्दैवी आहे. |
राहाता/वार्ताहर कॅगच्या अहवालाचा आधार घेत, विरोधक काँग्रेसच्या बदनामीची मोहीम राबवत आहेत. वास्तव मात्र वेगळे आहे. एफडीआय काय आहे हे कार्यकर्त्यांनी लोकांना समजावून सांगावे, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय जिल्ह्यातील मंत्र्यांनी लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून लगावला. |
आजपासून नोटिसा देणार प्रतिनिधी जकातीऐवजी सुरू झालेल्या स्थानिक संस्था करासाठी (एलबीटी) शहरातील ज्या व्यापारी, व्यावसायिकांनी अद्यापि नोंदणी केलेली नाही त्यांच्यावर आता मात्र महापालिका खरोखर कारवाईचा बडगा उगारणार आहे. या कराच्या कायद्यात कर जमा केला नाही तर जप्ती, सील लावणे, लिलाव करणे यासह दहापट दंड व २ वर्षांपर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद आहे. |
श्रीरामपूर/ प्रतिनिधी तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत असून सरासरी २ इंचापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसाने तालुक्यातील अनेक गावांची सरासरी ओलांडली आहे. शिवाय या पावसामुळे भंडारदरा धरणाचे एक आवर्तन वाचले आहे. |
प्रतिनिधी केंद्र सरकारच्या अन्न व प्रक्रिया मंत्रालयाची चौथी महापौर परिषद दि. ५ व ६ ला नगर येथे होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. चरणदास महंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणचे महापौर सहभागी होणार आहेत. |
पतीसह सासू-सासऱ्याला अटक श्रीरामपूर/प्रतिनिधी लग्न झाल्यापासून घरातील कटकटी वाढल्या, खर्च वाढले या कारणास्तव नवविवाहितेचा छळ करण्यात आला. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर सासू, सासरा व पतीने या विवाहितेला जिवंत पेटवून दिले. तालुक्यातील पढेगाव येथे घडलेल्या या घटनेत तरूणी ८० टक्के भाजली असून येथील कामगार रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तालुका पोलिसांनी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. |
कर्जत/वार्ताहर स्पर्धा परीक्षा मग ती केंद्रिय लोकसेवा आयोगाची असो किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, रोज वृत्तपत्र वाचणारा विद्यार्थीच ती उत्तीर्ण होणार, असे प्रतिपादन तब्बल नऊ वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा उर्तीर्ण झालेले रायगडचे सहायक निबंधक असणारे विठ्ठलराव सूर्यवंशी यांनी येथे केले. |
प्रतिनिधी अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्या (गुरुवारी) राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघाचे सचिव कॉ. सुरेश पिंपळे यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. |
पारनेर/वर्ताहर केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे टाकळी ढोकेश्वर येथील श्रीढोकेश्वर महाविद्यालयास १५० विद्यार्थ्यांंची इन्स्पायर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी दहा लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी दिली. |
|
|
<< Start < Prev 21 Next > End >>
|
Page 21 of 21 |