‘उसाच्या आंदोलनाने मजुरांवर उपासमार’ कर्जत/वार्ताहर ऊसदरासाठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातील हजारो ऊसतोडणी कामगांरावर उपासमारीची वेळ आली आहे, याचा विसर आंदोलकांना पडला आहे. शिवाय आता कारखाने सुरू झाल्याने आंदोलनाची वेळ चुकीची आहे.
‘सत्यजित तांबे कुस्तीचे स्वयंघोषित स्वागताध्यक्ष’ प्रतिनिधी यंदाची ‘भारत श्री’ राष्ट्रीय स्पर्धा ८ व ९ डिसेंबरला नगरच्या वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांना दिली. नगरमध्ये होत असलेल्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची स्वागताध्यक्षपदाची नियुक्ती स्वयंघोषित असल्याची टिकाही पाचपुते यांनी केली.
खासदार वाकचौरे यांची टीका कोपरगाव/वार्ताहर राज्य शासनाच्या उदासीनतेमुळेच महाराष्ट्राला केंद्राकडून निधी मिळण्यात अडचणी येतात. मिळालेला अब्जावधी रुपयांचा निधीही मुदतीत खर्च होत नसल्याने तो परत जात असल्याचा आरोप खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. वाकचौरे म्हणाले, महाराष्ट्रातील खासदार संघटित नाहीत.
प्रतिनिधी केडगाव पाणी योजनेतील जपेनगर येथील पाण्याच्या टाकीच्या कामाला महापौर शीला शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. केडगावच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून नवी पाणी योजना त्वरित पूर्ण करून हा प्रश्न कायमचा सोडवण्यास प्राधान्य दिले जात आहे, असे यावेळी महापौरांनी सांगितले.
प्रतिनिधी माहितीपट तयार करणे हे आनंदाचे काम असले तरी ते करत असताना कायम संशोधनाची वृत्ती ठेवायला लागते, तरच त्यातून प्रभावी माहितीपट तयार होतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध माहितीपट निर्माते, दिग्दर्शन मिलिंद भणगे यांनी केले.