सोलापूर /प्रतिनिधी जगात माहिती व तंत्रज्ञानाचा महास्फोट होत असताना काळाची पावले ओळखून देशात मौखिक शिक्षण न देता दृक्-श्राव्य माध्यमांचा वापर करून गुणवत्तेचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांनी केले. |
वाई/वार्ताहर महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना वेण्णा लेकमधून बहुआयामी योजनेच्या साहाय्याने पिण्याचे पाणी पुरवले जाते. या योजनेच्या बिघाडामुळे सध्या या शहरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. भविष्यकाळात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करून या योजनेला बळकटी देण्यासाठी आपण सुमारे सव्वाचार कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करणार असल्याची माहिती महाबळेश्वर-वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. |
कराड / वार्ताहर वीज वितरण कंपनीने नव्याने इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवल्यामुळे वीज बिलात प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने वीज कंपनीच्या येथील दत्त चौकातील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर मागणीचे निवेदन शाखा अभियंत्यांना देण्यात आले. |
कोल्हापूर/प्रतिनिधी ‘तिसरी भारतीय छात्र संसद’ १० ते १२ जानेवारी दरम्यान माईर्स एमआयटी पुणे येथे आयोजित केल्याची माहिती संचालक प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय छात्र संसदेत देशभरातून २८ राज्यांतील ४०० विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील सुमारे १२ ते १५ हजार विद्यार्थी उपस्थित राहतील. तसेच महाविद्यालयांचे ‘विद्यार्थी संसदेचे प्रतिनिधी’ संसदेत सहभागी होतील. |
कोल्हापूर/प्रतिनिधी इटालियन आणि मेक्सिकन फूडमधील प्रसिद्ध भारतीय चेन ‘हॉटेल लिटिल इटली’ कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. शिवाजी पार्क येथील हॉटेल पंचशील येथे ‘लिटिल इटली’चे हॉटेल शुक्रवारपासून करवीरकरांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. जगभरात इटालियन फूड बनवणारे आम्ही उत्तम भारतीय असल्याचा दावा ‘लिटिल इटली’चे राज मेहता यांनी केला आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी शहरात घरफोडी व चोरी करणाऱ्या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून दीड लाखांचा चोरीचा ऐवज हस्तगत केला. हरजितसिंग सिसपालसिंग टाक (२२, रा. हनुमाननगर, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. |
कोल्हापूर / प्रतिनिधी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने बालनाटय़ स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे, असे उद्गार कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. बालनाटय़ स्पर्धेच्या बक्षीस वितरण व गणवेश वाटप समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती शारदा देवणे होत्या. |
सोलापूर /प्रतिनिधी विधान परिषदेतील पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या चार वर्षांच्या विधिमंडळातील कार्याचा अहवाल येत्या शनिवारी, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. |
कोल्हापूर/प्रतिनिधी संशोधन वृत्ती आणि वैद्यकीय क्षेत्रातील नावीन्याची गरजेचा नेमका मेळ घालत शून्यातून विश्व निर्माण केलेल्या संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑथरेकेअर अँण्ड क्युअर’ ने आता इम्लांटस्-इन्स्ट्रमेंटस क्षेत्रात विदेशातही विस्तार करावा, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. |
कोल्हापूर/प्रतिनिधी कसबा बावडय़ातील झूम प्रकल्पातील कचऱ्याच्या प्रश्नामुळे सध्या जिल्हा प्रशासन, राजकीय नेत्यांवर ताशेरे ओढले जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रदूषण मंडळ व महापालिका आरोग्य विभागासह झूम प्रकल्पाची पाहणी केली. झूम प्रकल्पातील कचऱ्याचा उठाव करण्यासाठी निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ दिवसात कचरा उठावाचे काम सुरु होईल, असे माने यांनी सांगितले . |
शेतकरी संघटनेची सांगलीत ऊस परिषद कोल्हापूर / प्रतिनिधी उसाची उपलब्धता खूपच कमी प्रमाणात असलेल्या पुणे व अहमदनगर जिल्हय़ासाठी उसाची पहिली उचल ३ हजार १०० रुपये द्यावी आणि उर्वरित जिल्हय़ांसाठी २ हजार ९०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी मागणी बुधवारी सांगली येथे झालेल्या ऊस परिषदेत शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवि देवांग यांनी केली. परिषदेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे ठराव मंजूर करण्यात आले. |
कोल्हापूर / प्रतिनिधी, गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
पार्किंग घोटाळ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, वाढत्या कचऱ्यामुळे नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य या विषयावर कोल्हापूर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार वादावादी झाली. पार्किंग घोटाळ्यावरून प्रकाश नाईकनवरे व भूपाल शेटे यांच्यातील शाब्दिक वाद रंगला होता. तर नगरसेविका सरस्वती पोवार यांनी भागातील कचऱ्याचे ढीग असणाऱ्या फोटोचा फलक सभागृहात दाखवत आरोग्य विभागाचे धिंडवडे काढले. सभेच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर दिगंबर फराकटे होते. |
सोलापूर /प्रतिनिधी यंदाच्या गळीत हंगामात ऊसदर जाहीर करावा आणि मागणीप्रमाणे ऊसदर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी सोलापूर जिल्ह्य़ात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी सोलापूरच्या जिल्हा कारागृहात एका कच्च्या कैद्याने आत्महत्येचा तर दुसऱ्या कैद्याने आपणास कारागृहाबाहेर सोडले जाऊ नये म्हणून त्रागा करीत कारागृहातील दूरचित्रवाणी संच फोडला. या दोन्ही घटनांची दखल घेत प्रशासनाच्या वतीने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. |
उसाला पहिली उचल ३ हजार देण्याची मागणी कोल्हापूर / प्रतिनिधी चालू गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल ३ हजार रुपये द्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. |
सोलापूर /प्रतिनिधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सामान्य शेतक ऱ्यांचे हित जोपासत काम चालविले असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले जात आहेत. गडकरी हे प्रामाणिकच असून ते कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहेत. सरकारने त्यांची खुशाल चौकशी करावी, अशी मल्लिनाथी भाजपचे तरुण खासदार वरुण गांधी यांनी केली. |
गळीत हंगाम न करण्याचा इशारा कोल्हापूर / प्रतिनिधी उसाला पहिला हप्ता ३ हजार रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांवर बुधवारी भव्य दुचाकी रॅली काढली होती. कारखान्याच्या व्यवस्थापनाला मागणीचे निवेदन सादर केले. त्याची पूर्तता न केल्यास गळीत हंगाम सुरू करू दिला जाणार नाही, असा इशारा दिला. |
सोलापूर /प्रतिनिधी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्यात वाढ करावी या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली, तर लिपीकवर्गीय संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. |
कोल्हापूर / प्रतिनिधी गतवर्षी गाळपास आलेल्या उसास तिसरा हप्ता मे. टन १०० रुपये देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आणि राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणेरी मठाचे प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज होते. |
कराड/वार्ताहर कराड अर्बन बँकेने सेवकांसाठी योग शिबिराचे आयोजन करून नवा पायंडा पाडला असून, सेवक वर्ग आनंदी व निरोगी राहिले, तर संस्था सुद्धा प्रगतिपथावर जात असल्याचे कोल्हापूरच्या जी. जे. जी. योग अॅकॅडमीचे संस्थापक डॉ. धनंजय गुंडे यांनी सांगितले. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 6 of 22 |