कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूर शहरामध्ये अद्यापही बांगलादेशी नागरिकांचे रहिवासाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या गुरुवारी शिवसेनेच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. |
भूविकास बँकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव संमत कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर भूविकास बँकेला वैद्यनाथ पॅकेज लागू करावे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा महत्त्वाचा ठराव भूविकास बँकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने करण्यात आला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष बी. एन. पाटील होते. भूविकास बँकेची दहावी सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. |
कोल्हापूर / प्रतिनिधी शेतकरी संघटनेच्या तडजोडीतून जो दर निघेल त्यामध्ये इतरांपेक्षा वारणा साखर कारखान्याचा दर जास्तच असणार आहे. याचबरोबर गत हंगामासाठी जाहीर केलेल्या २०० रुपयांमध्येसुद्धा वाढ देण्यासंदर्भात विचार त्याची संपूर्ण रक्कम येत्या ५ तारखेपर्यंत सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे वारणा समूहाचे नेते आ. विनय कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. |
भूविकास बँकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव संमत कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर भूविकास बँकेला वैद्यनाथ पॅकेज लागू करावे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा महत्त्वाचा ठराव भूविकास बँकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने करण्यात आला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष बी. एन. पाटील होते. भूविकास बँकेची दहावी सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. |
कोल्हापूर / प्रतिनिधी वार्धक्यातील आरोग्य या विषयावर रविवारी (दि.४ )वैद्यकीय परिषदेचे आयोजन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ.व्ही.टी.पाटील स्मृतिभवन ताराराणी विद्यापीठ येथे केले आहे, परिषदेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगमहर्षी डॉ.संप्रसाद विनोद यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष कर्नल डॉ.मोहन जोशी व कार्यवाह डॉ रवींद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदे दिली. |
कराडकरांनी अनुभवला सुरेल कर्नाटकी नृत्याचा आविष्कार कराड/ वार्ताहर पुण्याची प्रसिद्ध कलावर्धिनी विश्वस्त संस्था व येथील ‘अंकुर नृत्यांजली’तर्फे आयोजित भरतनाटय़म अरंगेत्रममध्ये नृत्यांगना अमृता बुधकर, ऋतुजा देशपांडे, अनुजा जोशी व कपुरी कोल्हटकर या कराडच्या सुकन्यांनी कराडकर कलारसिकांना शुद्ध नर्तन, सूचक अभिनय तसेच सुरेल कर्नाटक संगीताचा अपूर्व अनुभव दिला. |
सोलापूर /प्रतिनिधी वृद्ध महिलेचे एटीएम कार्ड चोरून त्याचा वापर करून दोन लाख ५५ हजारांची रक्कम बँकेच्या एटीएममधून उकळणाऱ्या भामटय़ाचा शोध सोलापूरचे सदर बझार पोलीस घेत आहेत. |
कोल्हापूर/प्रतिनिधी श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ देण्यात आली. नवीन करारानुसार सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनासह शिल्लक, हक्काच्या रजेचा कालावधी, पगार तारण कर्जाच्या मर्यादेत वाढ होईल. तसा चार वर्षांचा करार भारतीय मजदूर संघाशी संलग्न बँक कर्मचारी संघाशी केला. |
० गळीत हंगाम सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी ० ऊसदर आंदोलन सुरूच कोल्हापूर / प्रतिनिधी ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२ ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत चालले असून, मंगळवारी जिल्हय़ात काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने थांबविण्यात आली. तर डावे पक्ष व जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उसाचा प्रश्न गंभीर होत चालला असून, राज्य शासनाने हस्तक्षेप करून हंगाम सुरळीत होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. |
सभासदांच्या विरोधाने विक्री थांबली वाई/वार्ताहर राज्य सहकारी बँकेच्या थकबाकीमुळे अडचणीत आलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना आता दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. त्याचपद्धतीने वसुलीच्या नोटिसा दिलेल्या परंतु शेतकरी सभासदांचा विरोध असल्याने विकता येत नाहीत असे ताब्यात असलेले कारखाने दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. |
सोलापूर / प्रतिनिधी स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या तीन खासगी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोलापूरचा दौरा केला. यात शेतकरी व कार्यकर्त्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा जिल्ह्य़ातील काँग्रेसला बळकटी देणारा असल्याचे मानले जात आहे. |
कोल्हापूर / प्रतिनिधी सध्याच्या कोल्हापूर शहराच्या मध्यभागी लक्ष्मीपुरी भागात जयंती नाल्यावरील दोन पुलांमध्ये महाराष्ट्रातील बुध्दस्तूप होता. त्यात भगवान बुध्दांच्या पवित्र अस्थी (रक्षा) होत्या. २७ ऑक्टोबर १८७७ रोजी उत्खननात त्याचा शोध लागला. |
मुख्यमंत्र्यांची ग्वाही सोलापूर /प्रतिनिधी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नियोजित अकरा कोटी खर्चाच्या महाप्रसादगृहाच्या उभारणीसाठी जागेचा अकृषक बदल होण्याकरिता नगर विकास आराखडय़ाच्या नकाशास अंतिम मंजुरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. |
कराड/वार्ताहर जयवंत शुगर्स बारा रिकव्हरी पडल्यास व तीन लाख गळिताचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास इतर कारखान्याबरोबर दर देणार आहे. दुसरा हप्ता शंभर रुपये देण्याचे ठरवले असून, योग्य वेळी अंतिम दर जाहीर करणार असल्याचे सांगताना, स्थापनेपासून सभासद व शेतकऱ्यांनी देऊ केलेले सहकार्य कायम राहावे, |
कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ तथा गोकुळ दूध संघाच्या वतीने या वर्षी दूध उत्पादकांना ४३ कोटी ६५ लाख रुपयांची दिवाळी फरकाची भेट देण्यात येणार असून सुवर्णमहोत्सवी वर्षांत प्रतिदिन १० लाख लिटर दूध संकलन करण्याचा संचालक मंडळाचा निर्धार असल्याचे अध्यक्ष अरु ण डोंगळे यांनी भोगावती येथे सांगितले. |
कोल्हापूर/प्रतिनिधी एस.टी. कर्मचारी दररोज आठ तासापेक्षा जादा काम करून वर्षांकाठी किमान चार ते पाच महिने जादा काम करतात. कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी हा काही दोन संघटनेतील वाद नसून, तो एसटीतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा सन्मानाचा प्रश्न आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी अस्वच्छ व्यवसायातील कामगारांच्या पाल्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीमध्ये एक कोटी २९ लाखांचा घोटाळा झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील तत्कालीन दोन कर्मचाऱ्यांना शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. |
कोल्हापूर इंडस्ट्रियल एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर / प्रतिनिधी लवकरच पूर्णत्वास येणाऱ्या सातारा-पुणे सहापदरी रस्त्यानंतर सातारा-कोल्हापूर महामार्गही सहापदरी होईल. त्याचा लाभ कोल्हापूरच्या उद्योगविश्वाला निश्चितपणे होणार आहे, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. |
कोल्हापूर/प्रतिनिधी आगामी गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल रक्कम ठरविण्यासाठी, गत हंगामासाठी एकूण ३ हजार ५० रुपये मिळावे, साखर उद्योग र्निबधमुक्त करावा या मागणीसाठी उद्या बुधवारी सांगली येथे राज्यव्यापी ऊस परिषद आयोजित केली आहे. |
कराड/वार्ताहर ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन जगन्नाथ मोहिते व नूतन मोहिते यांनी जुळेवाडी (ता. कराड) गावास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून पाणीपुरवठा तोडल्याचा आरोप जुळेवाडीचे सरपंच डी. एस. सोमदे व ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 7 of 22 |