सोलापूर /प्रतिनिधी शहरात पोलीस आयुक्तांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना व्होरे यांच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. |
कराड/वार्ताहर रेठरे बुद्रुकच्या माहेरवाशीण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. २) सकाळी होणार आहे. |
सोलापूर विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा सोलापूर/प्रतिनिधी-सोलापूर विद्यापीठाचा आठवा दीक्षान्त सोहळा येत्या गुरुवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ‘नॅक’चे संस्थापक संचालक डॉ. अरुण निगवेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. |
विजय पाटील , कराड ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्याच कर्मभूमीतील कराडच्या कृष्णा नदीवरील नवीन पुलाच्या झालेल्या उद्घाटन कार्यक्रमावर निमंत्रण पत्रिकेवरील १४ पैकी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह ९ मान्यवरांनी बहिष्कार टाकल्याने राज्यातील आघाडी सरकारमधील मुंबई, दिल्लीतील भांडण आता नेते मंडळींच्या गावपातळीवर अगदी गल्लीबोळात पोचल्याचे मानले जात आहे. |
पहिली उचल ३ हजार रुपये देण्याची मागणी कोल्हापूर/प्रतिनिधी चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल ३ हजार रुपये द्यावी यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी साखर उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांची प्रथम पोलिसांशी तर नंतर साखर उपसंचालकांशी जोरदार शाब्दिक वाद झाला. |
चर्चासत्रात विविध तज्ज्ञांची मागणी सोलापूर /प्रतिनिधी भारतातील माता व बालमृत्यूंचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे सामाजिक व आरोग्यदृष्टय़ा भारताची मागासलेल्या देशात गणना केली जाते. त्यासाठी शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांनी सामूहिकपणे प्रयत्न करून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत, |
वाई/वार्ताहर किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने गेल्या अनेक वर्षांत कमी दर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कारखान्याने शेतकरी सभासदांची फसवणूक करू नये व ठेवी परत द्याव्यात यासाठी सभासदांनी मोर्चा काढून कारखाना व्यवस्थापनास आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. |
कोल्हापूर / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रसचे नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह पक्षाच्या मंत्र्यांवर बेभान टीका केल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन सोमवारी करण्यात आले. |
चाळिसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोलापूर /प्रतिनिधी सोलापूरचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्य़ातील अन्य साखर कारखान्यांच्या दरापेक्षा प्रतिटन उसाला २५ रुपये जादा दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. |
वाई/वार्ताहर सामाजिक विषमता आणि जातीयता नष्ट करण्यासाठी सामाजिक परंपरांचा व प्रबोधनकारी चळवळीचा समग्र इतिहास लिहिण्याची आज गरज आहे असल्याचे मत समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक व राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले. |
सातारकरांतर्फे गुलाबभाईंचा सत्कार कराड/वार्ताहर धर्म, जातीच्या नावाखाली निर्माण झालेल्या टोळय़ांनी संपूर्ण जगच ताब्यात घेतले असून, भारतात त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही. त्यामुळे समाजप्रबोधन व विचारांची बांधिलकी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती आमदार विलासकाका उंडाळकर यांनी व्यक्त केली. |
कराड/वार्ताहर शाळांना पोषण आहारासाठी घरगुती दराने गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावा असा ठराव कराड पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला. जोपर्यंत शाळांना घरगुती दराने गॅस देण्याचा निर्णय होत नाही, |
कोल्हापूर/प्रतिनिधी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अजित पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोन प्रमुख नेते उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनामा नाटय़ानंतर बुधवारी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीने आयोजित वस्त्रोद्योग परिषदेच्या निमित्ताने प्रथमच एकत्रित उपस्थित राहणार आहेत. |
कोल्हापूर / प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा व विद्वत सभा सदस्यांसाठी उद्या मंगळवार (दि. ३०) ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये शाहू सिनेट हॉल येथे उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. |
पंढरपूर / वार्ताहर अपंगांसाठी विविध शासकीय योजना असून त्या योजनेचा गैरफायदा घेऊन अपंगांसाठी विविध योजनेच्या सवलतीचे बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. |
सोलापूर /प्रतिनिधी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक येत्या शनिवारी, ३ नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या कृषी भवनात आयोजित करण्यात आली आहे. |
आर्थिक मदतीचे आवाहन कोल्हापूर / प्रतिनिधी- शिये (ता.करवीर) येथील कु. सावणी सर्जेराव चौगले (वय ९ महिने) ही हृदयविकाराने आजारी आहे. तिच्यावरील गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
यंदा दुष्काळाची भीषण परिस्थिती ओढवली असताना मोहोळ तालुक्यातील तलावात सत्ताधारी राजकीय पुढारी व हितसंबंधियांच्याच विद्युत मोटारी सुरू असून त्याद्वारे रात्रंदिवस पाण्याचा उपसा बेकादेशीरपणे केला जात असल्याचा आरोप करीत सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन केले. |
वाई/वार्ताहर दलितमित्र रा. ना. चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष सोमवार २९ पासून सुरू होत आहे. या निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. |
सोलापूर,/प्रतिनिधी ईश्वराप्रति असीम निष्ठा, त्याग आणि बलिदानाचा संदेश देणारी ईद-उल-जुहा (बकरी ईद) सोलापुरात शनिवारी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी सर्व मशिदी व ईदगाहांमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. यात हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 8 of 22 |