कोल्हापूर / प्रतिनिधी ‘सेराटेक समूहा’ तर्फे कोल्हापूरमध्ये सर्व विख्यात ब्रँन्डस्च्या सिरॅमिक्स आणि सॅनिटरी वेअरचे अद्ययावत दालन सुरू करण्यात आले आहे. |
कोल्हापूर/प्रतिनिधी कागल येथील श्रीमंत छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या २०११-१२ मधील उसास प्रतिटन १५० रु पयाचा तिसरा हप्ता जाहीर झाला. |
पालिका पदाधिकाऱ्यांच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री निमंत्रित कराड/वार्ताहर - यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड पालिकेतर्फे आयोजित पुणे विभागातील नगरपालिका व नगरपंचातींच्या पदाधिकारी सदस्यांच्या दोन दिवसीय अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले आहे. |
उसाला पहिला हप्ता ४ हजाराचा द्या, अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नाही शेतकरी संघटनेचा इशारा कराड/वार्ताहर, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
उसाला पहिला हप्ता ४ हजार रुपये मिळालाच पाहिजे, साखरेवरील लेव्ही व मोलायसेसवरील राज्यबंदी उठवली जावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. आमच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते येथे पत्रकारांशी बोलत होते. संघटनेचे नेते शंकरराव गोडसे उपस्थित होते. |
कोल्हापूर/प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गत हंगामासाठी अंतिम दर २५०० रुपये मिळावा, चालू हंगामासाठी प्रतिटन ३५०० रुपये द्यावेत, त्यातील पहिला हप्ता २८८० रुपये द्यावा या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याशी आंदोलकांनी या प्रश्नी चर्चा केली. |
किसन वीर कोरखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ वाई/वार्ताहर
साखर उद्योग तसेच सहकोर चळवळ एको संक्र मण अवस्थेतून जात असून सहकोरी साखर चळवळ शाश्वत ठेवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण आगामी काळात शासन अवलंबणार असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले. भुईंज येथील कि सन वीर सातारा सहकोरी साखर कोरखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. |
सत्ताधारी असूनही आंदोलनाची वेळ सोलापूर /प्रतिनिधी महापालिका कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह इतर नागरी विकासप्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी पालिका कामगार महासंघाचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी गुरुवारी महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर प्रशासनाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण केले. अॅड. बेरिया हे अभ्यासू व जागरूक नगरसेवक म्हणून ओखळले जातात. परंतु त्यांच्यावरच उपोषणास बसण्याची वेळ आल्याबद्दल हा पालिकेच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. |
खरात दाम्पत्याचे पक्षांतर वाई/वार्ताहर वाई तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही नगरपालिका निवडणुकीनंतर नोंदविण्यात आली असून या वेळी वाईच्या नगराध्यक्षांनी व त्याच्या पतीने कोठेही सह्य़ा केल्या नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. |
कृष्णा पूल उद्घाटनावर राष्ट्रवादीचा बहिष्कार कराड/वार्ताहर दळणवळणाच्या सुविधांना प्राधान्य देण्याची राज्य शासनाची भूमिका असून ग्रामीण भागातील गावजोड रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली गेली आहे. आता पूल व रस्त्यांसाठी केंद्राकडून भरीव निधी येईल. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मोठय़ा प्रमाणातून कामे हाती घेतली जातील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. |
दक्षता जनजागृती सप्ताह वाई/वार्ताहर भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण क रण्याच्या उद्देशाने २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कोलावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा क रण्यात येणार असून त्याअंतर्गत २९ ऑक्टोबर रोजी नियोजन भवन येथे जिल्हाधिकोरी डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय अधिकोरी, कर्मचारी तसेच नागरिकोंच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस.बी. पाटील यांनी दिली आहे. |
सातारा जि.प.अध्यक्षांचे आवाहन वाई/वार्ताहर एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीस्तरावर ३ वर्ष ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना स्थानिक बचतगटांमार्फत शासनमान्य दरानुसार दररोज आहारपुरवठा होत असून, सध्या महागाईमुळे आहार वाटप करण्यास परवडत नाही म्हणून २५ ऑक्टोबरपासून आहार वाटप बंद ठेवण्यात येणार अशा वृत्ताच्या अनुषंगाने अंगणवाडी कार्यकर्तीनी बालकांना आहारापासून वंचित ठेवू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ आणि महिला व बालविकास सभापती नीलम पाटील पार्लेकर यांनी केले आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विहाळ येथील भैरवनाथ खासगी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात ऊसपुरवठा केलेल्या सभासद शेतकऱ्यांना शंभर रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर करून तो सभासदांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांनी दिली. |
कराड/वार्ताहर रौप्यमहोत्सवानिमित्त येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था सभासदांना १ ग्रॅम सुवर्ण नाण्याची भेट देणार असून, सभासदांचा १ लाख रुपयांचा अपघाती विमाही उतरवला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिली. |
सोलापूर /प्रतिनिधी एका जड वाहनाने ठोकरल्यामुळे घडलेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावच्या शिवारात सायंकाळी हा अपघात झाला. अपघातानंतर जड वाहन जागेवर न थांबता तसेच भरधाव वेगात निघून गेले. |
सोलापूर /प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक स्वरूपाचा चालण्यासाठी ई-गव्हर्नन्स सेवा सुरू करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असताना लवकरच त्यास मूर्त स्वरूप प्राप्त होणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. |
सीमोल्लंघन, पालखी मिरवणूक आणि सोने लुटण्यासाठी गर्दी कोल्हापूर / प्रतिनिधी ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
शमीपूजनाचा सोहळा झाल्यानंतर ऐतिहासिक दसरा चौकात श्रीमंत शाहूमहाराज, युवराज मालोजीराजे, युवराज संभाजीराजे यांना सोने व शुभेच्छा देण्यासाठी करवीरकरांची गर्दी झाली होती. (छाया- राज मकानदार)
करवीरनगरीतील ऐतिहासिक शारदीय नवरात्रोत्सव सोहळय़ाची सांगता शाही सीमोल्लंघनाने व पालखी मिरवणुकीने झाली. छत्रपती घराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळय़ावेळी परंपरेनुसार सोने लुटण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. साडेतीन शक्तिपीठापैकी एक महत्त्वपूर्ण पीठ म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराचा उल्लेख केला जातो. गेले ९ दिवस येथे विविध प्रकारचे धार्मिक विधी उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडले. |
सोलापूर/प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीनिमित्त सोलापूर शहरात शानदार संचलन करण्यात आले. (छाया-विजयदत्त, सोलापूर)
गेले नऊ दिवस विविध व्रतवैकल्ये करून आदिशक्ती मातेची मंगलमय वातावरणात मन:पूर्वक आराधना केल्यानंतर बुधवारी विजयादशमीदिनी शक्तिदेवी मंडळांच्या सवाद्य मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. पार्क मैदानावर शमीच्या वृक्षाभोवती सीमोल्लंघन करण्यासाठी व सोन्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपटय़ांची पाने लुटण्यासाठी आबालवृध्दांची एकच गर्दी उसळली होती. नवरात्र महोत्सवात शक्तिदेवीमातेची आराधना करण्यासाठी शहर व परिसरात भक्तीचा सागर लोटला होता. |
कोल्हापूर / प्रतिनिधी महागाईने कळस गाठला असला तरी कोल्हापूर शहरामध्ये खरेदीचा उत्सवही रंगात आला होता. जिल्ह्य़ातील अन्य बाजारपेठेमध्येही ग्राहकराजाने गर्दी केल्याचे चित्र कायम होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या विजयादशमीला खरेदी करण्यासाठी वाहन दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी वस्तू इथे ग्राहकांची वर्दळ होती. |
इचलकरंजी गिरिभ्रमण संघटनेची मोहीम कोल्हापूर / प्रतिनिधी
सायंकाळच्या सुमारास दाटलेले दाट धुके..एका बाजूला तटबंदी तर दुसऱ्या बाजूला खोल दरी..त्यातूनच वस्तीचे ठिकाण शोधताना हरवलेली वाट..अखेरीस चाचपडत वेध घेत शोधलेली जागा..हा थरार अनुभवताना सकाळच्या सुमारास हाकेच्या अंतरावर असलेले वस्तीचे ठिकाण म्हणजे रांगणाई देवीचे मंदिर पाहून मनाला मिळालेले समाधान असा थरारआणि उत्साहाचा दुहेरी |
कोल्हापूर / प्रतिनिधी वस्त्रनगरी इचलकरंजी येथे बुधवारी सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात पार पडला. मराठा विकास संघटना व सार्वजनिक दसरा महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी नागरिकांनी नाटय़गृहचौक परिसरात गर्दी केली होती. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 10 of 22 |