पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
बेळगावात मराठी भाषकांची गळचेपी करण्याचा कुटिल डाव - माणिकराव ठाकरे Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
सीमावर्ती बेळगाव परिसरात कर्नाटक सरकार व कन्नडिगांकडून मराठी भाषकांची गळचेपी करण्याचा कुटिल डाव खेळला जात असल्याचा आरोप करीत, या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस बेळगावच्या मराठी भाषकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

 
तेरा महिन्यांच्या चिमुरडीवर विकृत तरुणाचा बलात्कार Print E-mail

जनवादी महिला संघटनेची निदर्शने
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापुरात लष्कर भागातील फक्रुद्दीननगर झोपडपट्टीत एका विकृत तरुणाने शेजारी राहणाऱ्या अवघ्या तेरा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. संबंधित तरुणाला सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

 
अजय देवगण, काजोल महालक्ष्मीच्या दर्शनास Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी    

शारदीय नवरात्रोत्सव सुरू होण्यास तीन दिवसांचा अवधी राहिला असतानाच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी आत्तापासूनच होऊ लागली आहे. शुक्रवारी सुप्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण व त्याची पत्नी चित्रतारका काजोल यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. देवगण दाम्पत्याचा दौरा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे नियोजनावर अखेरचा हात फिरविण्यामध्ये प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व श्रीपूजक व्यग्र झाले आहेत. अशातच शुक्रवारी अभिनेता अजय देवगण हा पत्नी काजोलसह श्री महालक्ष्मी मंदिरात दाखल झाला.त्यांच्या कोल्हापूर भेटीची तसेच दर्शनाची कोणालाही कल्पना दिलेली नव्हती.
 
सोलापूर शहराला ‘फ्लेक्स’चा वेढा Print E-mail

जाहिरात फलकांवरही अतिक्रमण
सोलापूर /प्रतिनिधी
शहराचे सौंदर्य नष्ट करणाऱ्या ‘फ्लेक्स’ फलकांचे सध्या सर्वत्र मोठय़ा प्रमाणात पेव फुटले आहे. यावर पायबंद घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने धोरण आखले असले तरी त्यात कृतीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे ‘फ्लेक्स’ फलकांचे फुटलेले पेव कमी न होता उलट, अधिकृत वाणिज्य जाहिरात फलकांवरही आता मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे करू लागले आहे. यात दंडेलशाही तथा गुंडगिरी बळावत चालली आहे. मात्र, यासंदर्भात पालिका व पोलीस प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने संबंधितांवर कारवाई करणार का, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

 
फेरफार नोंदीची पुस्तके गहाळ झाल्याने शेतक ऱ्यांची गैरसोय Print E-mail

आंदोलनाचा इशारा
सोलापूर /प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील देगाव येथे जमिनीच्या फेरफार नोंदीची सहा पुस्तके मोहोळ तहसील कार्यालयातून गेल्या सहा महिन्यांपासून गहाळ झाली आहेत. याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.

 
इचलकरंजीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा शहराध्यक्षांकडे सादर Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
इचलकरंजीच्या नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत यांनी शहराध्यक्ष अशोक आरगे यांच्याकडे राजीनामा सादर केला असला, तरी त्यांच्या राजीनाम्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या राजीनाम्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात वाच्यता होत नसल्याने त्याबाबत संभम्रावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, नगराध्यक्षा भागवत यांच्या राजीनाम्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी पक्षाची बठक होऊन पक्षश्रेष्ठी पुढील दिशा ठरवतील असे शहराध्यक्ष अशोक आरगे यांनी सांगितले.

 
आमदार जयंत पाटील यांचा उद्या सत्कार, Print E-mail

शेकापची सभा
कोल्हापूर / प्रतिनिधी
गेली १२ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची  सभागृहात पुन्हा बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्ताने जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रविवारी दुपारी १ वाजता सत्कार समारंभ व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केल्याची माहिती पक्षाचे राज्य सहचिटणीस व जिल्हा चिटणीस भाई संपतराव पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 
कृषी प्रदर्शनाचे आज कराडमध्ये उद्घाटन Print E-mail

शेतीविषयक  माहितीचा मोठा खजिना  
कराड/वार्ताहर
कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उद्या शनिवार (दि. १३ ) पासून तीन दिवस आयोजित कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते शेती प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून, प्रदर्शनात २०० दालने आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना घेण्यात आली आहे. प्रदर्शनासाठी ४० हजार सभासदांना घरपोच निमंत्रणे पाठवण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी दिली. कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील या वेळी उपस्थित होते.   

 
गरजू अपंगांना यंत्र-साहित्याचे वाटप Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन व आर्टिफिशियल लिब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जाई-जुई विचारमंचच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना  यंत्र-साहित्याचे वितरण करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे  पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात महापौर अलका राठोड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे विभागीय व्यवस्थापक आर.के. चतुर्वेदी, आर्टिफिशियल मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनचे कनिष्ठ व्यवस्थापक के. राजकुमार, सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज यलगुलवार, अमोल शिंदे सहभागी झाले होते.

 
सीमावर्ती भागातील कन्नड विद्यार्थ्यांचा उद्या सोलापुरात गुणगौरव सोहळा Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार (बंगळुरू) व सोलापूर जिल्ह्य़ातील नागणसूरच्या श्री गुरू बमलिंगेश्वर कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कन्नड माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयात आयोजिला आहे.

 
कार्तिकी यात्रेतील घोडाबाजार यंदा पंढरीत पुन्हा भरणार Print E-mail

पंढरपूर/वार्ताहर
कार्तिकी यात्रेतील आकर्षण असलेला घोडय़ांचा बाजार यंदा पूर्वीप्रमाणेच भरवण्याचा निर्णय पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला असून व्यापाऱ्यांनी आपले घोडे बाजारात घेऊन येण्याचे आवाहन सभापती भगवान चौगुले यांनी केले  आहे.
पंढरीत भरणाऱ्या कार्तिकी यात्रेतील घोडेबाजार हे आजवर आकर्षण राहिलेले आहे. पण काही कारणामुळे हा घोडेबाजार अकलूज येथे भरू लागल्याने कार्तिकी यात्रेची शानच लुप्त पावली होती.

 
पारंपरिक लोककलांच्या स्पर्धाना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Print E-mail

चार हजार महिलांचा सहभाग
कोल्हापूर / प्रतिनिधी
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्था पारंपरिक लोककला स्पध्रेला हजारो महिलांनी गर्दी करून, उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची परंपरा याही वर्षी कायम राखली. चार हजारांहून अधिक महिलांनी या स्पध्रेत सहभाग घेतला. फुगडी, झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, छुई फुई अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

 
‘कर्नाटक’च्या गळचेपीच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्रात कडकडीत बंद Print E-mail

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
कोल्हापूर / प्रतिनिधी, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

मराठी भाषकांची गळचेपी करण्याचा कर्नाटक शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्हय़ांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बंद काळात कोल्हापूरमध्ये बस, रिक्षा, दुकाने यांची मोडतोड करण्याचा प्रकार घडल्याने हिंसक वळण मिळाले. तर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी येथे शिवसैनिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायती बिनविरोध Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील ४३४ ग्रामपंचायतीपकी ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार असून, १५ हजार ४२१ उमेदवारांनी अर्ज भरले होते.

 
सतेज पाटील गटाचे ५९ उमेदवार ‘कोल्हापूर दक्षिण’ मध्ये बिनविरोध Print E-mail

ग्रामपंचायत निवडणूक
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे ५९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

 
सोलापूर जिल्ह्य़ात ग्रामपंचायत निवडणुका; ४७६ जागांसाठी ९०६ उमेदवार रिंगणात Print E-mail

अकरा ग्रामपंचायती बिनविरोध
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्य़ातील ५६ ग्रामपंचायत निवडणुकीत ४७६ जागांसाठी ९०६ उमेदवार रिंगणात आहेत. अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध ठरल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे केवळ एका जागेसाठी निवडणूक होत आहे.

 
ऊस उत्पादकांची २४ ऑक्टोबर रोजी नगरला परिषद Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने उस उत्पादकांची राज्यव्यापी परिषद अहमदनगर येथील सहकार सभागृहात २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.

 
कराड-बेळगाव रेल्वेमार्गाबाबत हरकती पाठविण्याचे आवाहन Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
इचलकरंजीहून जाणारा प्रस्तावित कराड-बेळगाव रेल्वेमार्गाचा नकाशा मुख्य अभियंता, सेंट्रल रेल्वे यांनी जाहीर केला असून याबाबत काही हरकती/सूचना असल्यास देण्याचे आवाहन केले आहे.

 
संख्याशास्त्र विषयावर कोल्हापुरात परिसंवाद Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त १२ व १३ रोजी संख्याशास्त्र विभागामार्फत रिसेंट डेव्हलपमेंट्स इन स्टॅटिस्टिकल मॉडेिलग विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

 
ऐन पावसाळय़ातही साताऱ्यात २४१ टँक रद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा Print E-mail

वाई/वार्ताहर
सातारा जिल्हयात २४१ टँक रद्वारे २११ गावे व ८७५ वाडय़ा-वस्त्यांतील एकूण ३ लाख ९१ हजार ४६१ लोकसंख्येला पिण्याचा पाणीपुरवठा क रण्यात येत असल्याची  माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कोर्यकोरी अधिकोरी अभिजित बांगर यांनी आज येथे दिली.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 16 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो