पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुखपृष्ठ >> पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पश्चिम महाराष्ट्र वृत्तांत
मुबारक शेख यांना अहिंसा प्रेरणा पुरस्कार Print E-mail

विलास शहा जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी
सोलापूर /प्रतिनिधी
भगवान महावीर सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने मातोश्री वरजूदेवी शंकरलाल मेहता यांच्या स्मरणार्थ अहिंसेच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार दिला जातो. यंदा दुसऱ्या वर्षांसाठी पुण्याचे गोरक्षक मुबारक शेख यांना अहिंसा प्रेरणा पुरस्कार, तर प्राणिमित्र विलास शहा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

 
‘सोलापूर पर्यटन केंद्र बनण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची गरज’ Print E-mail

सिंहगड बिझनेस स्कूल’ मध्ये पर्यटनावर राष्ट्रीय परिषद
सोलापूर/प्रतिनिधी
धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, वैद्यकीय आदी क्षेत्रात पर्यटन केंद्र म्हणून सोलापूरचा विकास निश्चित होऊ शकतो. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्याची गरज असल्याचा सूर येथील सिंहगड बिझनेस स्कूलमध्ये आयोजित पर्यटनाच्या राष्ट्रीय परिषदेत ऐकायला मिळाला.

 
महिला अत्याचाराच्या तक्रारींवर आता महिला महासंघाचे लक्ष Print E-mail

खोटय़ा तक्रारींना आळा घालण्यासाठीचे पाऊल
दयानंद लिपारे , कोल्हापूर ,८ ऑक्टोबर २०१२
निरपराध असतानाही वयोवृध्द सासू-सासऱ्यांना हुंडाबळीच्या प्रकरणात सुनेकडून गोवले जाणे, ज्या पुरुषाला कधी धडपणे पाहिले नाही त्यांच्यावर एखाद्या महिलेकडून थेट बलात्काराचीच तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणे या सारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी इचलकरंजी महिला महासंघ आता पुढे सरसावला आहे.

 
विजयनगर, निसरे टोलनाक्याला टाळे Print E-mail

कराड/वार्ताहर
बहुचर्चित कराडनजीकचा विजयनगर आणि निसरे (ता. पाटण) येथील टोलनाक्यांवरील टोलवसुलीअखेर आज दुपारी ३ वाजता बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या आदेशावरून अभियंता प्रवीण जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत हे टोलनाके पोलीस संरक्षणात सीलबंद केले. सध्या टोलनाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.  

 
महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवर शिवसैनिकांनी ओतले गटारीचे पाणी Print E-mail

शिवरायांच्या पुतळय़ाभोवती गलिच्छ पाणी
सोलापूर /प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनात व त्यांच्या खुर्चीवर शिवसैनिकांनी गटारीचे घाण पाणी ओतले. पांजरापोळ चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ाभोवती गेल्या बऱ्याच दिवसांपासून गटार तुंबून घाण पाणी वाहात असताना पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष चालवल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी त्यास प्रत्युत्तरादाखल पालिका आयुक्तांच्या खुर्चीवर गटारीचे काळे पाणी ओतून संताप व्यक्त केला.

 
कराड परिवहन कार्यालयाचा दररोजचा महसूल तब्बल १० लाखांवर! Print E-mail

विजय पाटील , कराड
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये गेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्यान्वित झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा पहिला वर्धापनदिन आज छोटय़ाखान्या कार्यक्रमाने उत्साहात साजरा झाला. विविध वाहतूक संघटना तसेच स्थानिक नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, कार्यालयीन अधीक्षक निळकंठ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

 
कर्नाटकच्या निषेधार्थ सेनेचा चंदगडमध्ये तिरडी मोर्चा Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
मराठी भाषकांवर सर्व प्रकारचा अत्याचार करणाऱ्या कर्नाटक शासनाने मराठी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बेळगाव येथे विधानसौध बांधलेले असून त्याच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित केले आहे.

 
मोटार खरेदीसाठी विवाहितेचा खून Print E-mail

एसआरपी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर /प्रतिनिधी
इंडिका मोटार खरेदी करण्यासाठी माहेरातून पाच लाखांची रक्कम आणत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मृत विवाहितेचा पती राज्य राखीव पोलीस दलातील शिपाई असून त्याचाही आरोपीमध्ये समावेश आहे.

 
कराड, पाटण तालुक्यातील रस्त्यांसाठी १७ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर Print E-mail

कराड/वार्ताहर
नाबार्डच्या माध्यमातून कराड व पाटण तालुक्यातील रस्त्यांसाठी १७ कोटी ७६ लाखांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यात कराड ते ढेबेवाडी या २२.८ किलोमीटरचा रस्ता सुसज्ज करताना त्याची रूंदी ५.५ मीटरवरून ८ मीटर करण्यात येणार आहे. या कामासाठी सर्वाधिक १५ कोटी २५ लाख रूपयांचा निधी नाबार्डने दिला आहे.

 
शिवाजी राऊत यांना नवलीनकुमार पुरस्कार Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकार शिवाजी राऊत यांना २०१२ चा नवलीनकुमार पुरस्कार जाहीर झाला आहे. पब्लिक कर्न्‍सन फॉर गव्‍‌र्हनन्स ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त दारा गांधी यांनी अलीकडेच या पुरस्काराची घोषणा केली.

 
साखर कामगारांच्या प्रश्नांवर आयुक्तालयासमोर शुक्रवारी धरणे Print E-mail

कराड /वार्ताहर
राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या शुक्रवारी (दि. १२) महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने साखर आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील यांनी दिली.

 
इचलकरंजी शहरातील दीड कोटींच्या विकासकामास मान्यता Print E-mail

कोल्हापूर /प्रतिनिधी
इचलकरंजी नगरपालिकेस नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत ६२ लाख रुपयांच्या कामास व १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत आरोग्य खात्याकडील १२५ कंटेनर खरेदी करण्यासाठी ५० लाख ६२ लाख असे मिळून १ कोटी ६२ लाख रुपयांच्या खर्चाच्या कामास जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी पत्रकारांना दिली.

 
गॅस दरवाढीतून शैक्षणिक उपक्रमांना वगळा Print E-mail

कराडमध्ये मुख्याध्यापकांची मागणी
कराड /वार्ताहर
केंद्र व राज्य सरकारने गॅस दरवाढ व अनुदान बंदचे धोरण जाहीर केल्याने महागाईचा सामना करत असताना या गॅस दरवाढीमुळे शाळांसमोर पुन्हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. तरी अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, अनाथाश्रम, रिमांड होम, मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहे व सर्वसाधारण वसतिगृहांना वगळावे आदीं मागण्यांचे निवेदन मुख्याध्यापकांच्या वतीने कराडचे तहसीलदार सुधाकर भोसले यांना देण्यात आले.

 
‘रेडक्रॉस सोसायटीचे एड्स जनजागृतीचे कार्य कौतुकास्पद’ Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या एच.आय.व्ही, एड्स युथ पिअर एज्युकेशन प्रोग्रॅमचे एड््स जनजागृतीचे कार्य कौतुकास्पद असून पथनाटय़ाच्या माध्यमातून समाजातील लोकांमध्ये एड्सविषयीचे गैरसमज दूर करण्याचे  काम समाजाला दिशा देणारे असल्याचे  प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष जैटालाल पटेल यांनी व्यक्त केले.

 
चित्रकला स्पध्रेस कराडमध्ये प्रतिसाद Print E-mail

कराड /वार्ताहर
वन्यजीव सप्ताह व के. राजा रवी वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र हायस्कूलतर्फे घेतलेल्या चित्रकला स्पध्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पध्रेत शहर परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

 
सिलिंडर मर्यादेच्या निषेधार्थ मोर्चा Print E-mail

कोल्हापूर/प्रतिनिधी
सहा सिलिंडरची मर्यादा रद्द करावी, बारा सिलिंडर द्यावेत, शिधापत्रिकाधारकांना धान्य कोठा वाढवावा या मागणीसाठी सोमवारी कामगार कल्याण संघटनेने इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

 
संक्षिप्त Print E-mail

शारदीय व्याख्यानमालेला १६ ऑक्टोबरपासून
 कराड /वार्ताहर-कराड नगरपालिका व नगर वाचनालयातर्फे प्रतिवर्षांप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित शारदीय व्याख्यानमालेस येत्या १६ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात २३ ऑक्टोबपर्यंत ही व्याख्यानमाला चालणार आहे.

 
विविध लोककलांमध्ये रंगला इचलकरंजी युवा महोत्सव! Print E-mail

कोल्हापूर / प्रतिनिधी , रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
इचलकरंजीतील दत्ताजीराव कदम कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत ३२ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात कोल्हापूरच्या न्यू कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. सांघिक वैयक्तिक अशा दोन्ही गटात या महाविद्यालयातील विद्यार्थी अग्रेसर ठरले.

 
‘लक्ष्मीबाई महिला महाविद्यालयाच्या वास्तूमुळे जयकुमारजींचे स्वप्न साकार’ Print E-mail

सोलापूर / प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावाने महाविद्यालय सुरू करून वंचित व उपेक्षित मुलींना शिक्षणाची दारे खुले करून देणारे दिवंगत जयकुमार पाटील यांचे महिला महाविद्यालयासाठी भव्य वास्तूचे स्वप्न साकार होत असून हे महिला महाविद्यालय गुणवत्तेत आघाडीवर राहील, असा विश्वास वन व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केला.

 
आलमट्टीच्या पाण्यासाठी अक्कलकोटमध्ये स्वाभिमानी शेतकरी ‘रास्ता रोको’ करणार Print E-mail

सोलापूर / प्रतिनिधी
कर्नाटकातील आलमट्टी धरणाचे पाणी तसेच अक्कलकोटच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचा ५३० रुपयांचा ऊस बिलाचा थकीत हप्ता मिळण्यासह दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांनी दिला.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 19 of 22

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो